खा.नवनित राणांची मतदारसंघाच्या विकासावर प्रधानमंत्र्याशी ४७ मिनिटे चर्चा

0
15

अमरावती,दि.४ः- अमरावती मतदारसंघाच्या खासदार नवनित राणा(कौर) यांनी आपल्या मतदारसंघातील विविध विकासात्मक बाबींवर तसेच विदर्भाच्या औद्योगिक विकासावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ४७ मिनिटे चर्चा केली.प्रधानमंत्री मोदी यांच्याशी प्रधानमंत्री कार्यालयात खासदार नवनित राणा आणि बडनेराचे आमदार रवी राणा यांनी आज भेट घेतली.या चर्चेत अमरावती जिल्हा आणि विदर्भाच्या विकासावर करण्यात आल्याची माहिती खा.राणा यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.चर्चेत अमरावती जिल्ह्याचे विभाजन करून अचलपूर जिल्ह्याची स्वतंत्र निर्मिती करणे, चिखलदरा पर्यटनस्थळाचा विकास महाराष्ट्रातील महाबळेश्वर,माथेरान या पर्यटन स्थळाच्या धर्तीवर करण्यासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देणे, अमरावती येथील बेलोरा विमानतल तातडीने सुरु करणे ,अमरावती येथील नांदगाव पेठ पंचतारांकित एमआयडीसी मध्ये मोठे उद्योग आणणे , संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱयांची सरसकट कर्जमाफी करून पेरणी पासून ते कंपनी पर्यंत शेतकऱ्यांना आलेल्या खर्चापेक्षा मूळ किमतीच्या दीडपट भावाने राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या शेतमालाची खरेदी करावी जेणेकरून शेतकरी आर्थिक दृष्ट्या मजबूत होईल, विदर्भातील बंद पडलेले सिंचन प्रकल्प लवकर सुरु करून सिंचन प्रकल्पामध्ये जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना आजच्या २ च्या गुणकाप्रमाणे मोबदला द्यावा तसेच त्यांच्या परिवारातील २ व्यक्तींना नोकरी द्यावी, संजय गांधी ,श्रावण बाळ ,अंध अपंग तसेच विधवा निराधार महिलांना शासनाच्या योजनेअंतर्गत मिळणारे ६०० रू. अनुदानावरून २००० रुपये अनुदान करणे या प्रमुख मागण्यांसह १२ मुद्द्यांवर जवळ जवळ ४७ मिनिटे केली सकारात्मक चर्चा झाल्याचे म्हटले आहे.