खासदार पटोलेनी घेतला भंडारा रोड रेल्वेस्थानकाचा आढावा

0
13

वरठी-दक्षिण मध्य पुर्व रेल्वेच्या नागपूर विभागातंर्गत येणाया भंडारा रोड रेल्वेस्थानकावरील विविध समस्यांच्या माहिती तसेच प्रवाशांच्या समस्या जाणून घेण्यासाठी भंडारा गोंदियाचे खासदार नाना पटोले यांनी आज सकाळी 11 वाजता भंडारा रोड रेल्वेस्थानकाला भेट दिली.खासदार पटोले यांचे विदर्भ एक्सप्रेसने नागपूरवरुन भंडारा रोड रेल्वेस्थानकावर आगमन झाले,त्यांच्यासोबत नागपूर विभागाचे रेल्वेप्रबंधक श्री कंसल,जीआऱपीएफचे वरिष्ठ पोलिस अधिकारी,पोलीस अधिक्षक दिलिप झलके,डीआरयुसीसीचे सदस्य निलम हलमारे आदी उपस्थित होते.खासदार पटोले यांनी सुरवातीला प्लटफार्मची पाहणी केली तसेच फ्लटफा्र्मवरील असुविधाबाबत प्रवाशांनी त्यांना आपल्या भावन्या सांगितल्या.तसेच महत्वाच्या रेल्वेगाड्यांच्या थांब्याचीही मागणी केली.भंडारा रोड ते भंडारा जवाहरनगर दरम्यान रेल्वेगाडीबाबतही विचार करण्यात आला.तसेच तिकीट विक्रीसाठी होणारी असुविधा,शौचालय,पाणी आदीबाबत प्रवाशांच्या तक्रारी होत्या.भंडारा जिल्ह्यासाठी भंडारा रोड किवा तुमसरला रॅक पाॅंईट तयार करम्याबाबत खासदार पटोले यांनी यावेळी चर्चा केली.