ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांच्या हस्ते गडचिरोलीत बांबू सेटमचे उद्घाटन

0
26

गडचिरोली, दि.७:: राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमास १ जुलैपासून सुरुवात करण्यात आली आहे.  ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते गडचिरोलीत बांबू सेटमचे उद्घाटन करुन वृक्ष लागवड करण्यात आली.गडचिरोली वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक १७० देवापूरमध्ये बांबू रोपवन घेण्यात येत आहे. या रोपवनात वनविभागाच्या वतीने बांबू सेटम तयार करण्यात येत आहे. विविध प्रजातींच्या बांबूची लागवड करणे, यास बांबू सेटम असे म्हणतात. या सेटमचे उद्घाटन सिंधूताईंच्या हस्ते करण्यात आले. बांबू सेटममुळे बांबूच्या विविध प्रजातींची सामान्य नागरिकांना ओळख होऊन रोजगाराभिमुख वापर करण्यास मदत होणार आहे. शिवाय पर्यटनालाही चालना मिळणार आहे.

याप्रसंगी पुणे येथील ममता बाल सदनचे व्यवसथापक दीपक गायकवाड, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे खासगी जनसंपर्क अधिकारी मुकेश चौधरी, मनिष बोपटे, विनोद येवले, अविनाश गवळी, वैद्यराज एस.बी.तडसे, उपवनसंरक्षक डॉ.कुमारस्वामी शि.र, सहायक वनसंरक्षक सोनल भडके, क्षेत्र सहायक जेनेकर, वनपाल कुंभारे, धुर्वे, बोढे, कु.कुळसंगे उपस्थित होते.