मोरगांव येथे आरोग्य शिबीर;१८९ रूग्णांचा आरोग्यलाभ

0
16

साकोली , दि. 15 : : स्व: शामरावबापू कापगते यांच्या १०१ व्या जन्मशताब्दी निमीत्ताने ता.१५ जुलैला मौजा मोरगांव/राजेगांव येथे आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबीरात एकुण १८९ रूग्णांनी आरोग्य लाभ घेतला.
जिजामाता विद्यालय मोरगांव येथे आरोग्य शिबीरात डोळे, रक्तदाब व इतर आरोग्य तपासणी शिबीराच्या उदघाटन प्रसंगी धनंजय ठाकरे, अध्यक्ष डॉ.गजानन डोंगरवार, अतिथी अँड.मनिष कापगते नगरसेवक, मनिष वंजारी मुख्याध्यापक, हेमचंद्र बोपचे, नारद लिचडे, भोजराम धारणे, पो.पा.सूरेश राऊत, चंद्रकुमार पटले, कृष्णशेखर येडे, गजेंद्र कोसलकर, बाबू कोचे, हर्षानंद बघेले, शिक्षिका सौ.शिवरकर, सौ.हटवार, रंधवा वालकर, धनिराम चांदेवार आदी उपस्थित होते. या आरोग्य शिबीरात एकुण १८९ रूग्णांनी लाभ घेतला, त्यात ७१ नेत्ररूग्णांना चष्मे वाटप व ३४ मोतियाबिंदू रूग्णांची शस्त्रक्रियेसाठी महात्मे नेत्रपेढी नागपूर येथे निवड करण्यात आली.शिबिरात आरोग्य सेवा डॉ.हेमकृष्ण कापगते, डॉ.किंजल शाह यांनी दिली. नागपूरचे श्रृती बडवाईक, प्रिती महामल्ला, प्रबुध्द कांबळे, मनोज तांबडे व शालीक कास्देकर यांनी सेवेत रूग्णांना सहकार्य केले. कार्यक्रमात महात्मे नेत्रपेढी नागपूर चमु ,श्याम रूग्णालय, ग्रामवासी यांनी विशेष सहकार्य केले. संचालन अँड.मनिष कापगते यांनी तर आभार डॉ.गजानन डोंगरवार यांनी केले.