निमगाव (आम्बेनाला ) प्रकल्पाला केंद्रीय वन्यजीव मंडळाची मंजुरी- आ.रहांगडाले 

0
10

तिरोडा,दि.१८   सन १९७२ पासून ते २००६ पर्यंत रखडलेला तालु्क्यातील निमगाव(आंबेनाला) प्रकल्पाला केंद्रीय वन्यजीव मंडळाच्या १७ जूलै रोजी झालेल्या बैठकीत मंजुरी मिळाल्याने प्रकल्पबांधकामाचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती आमदार विजय रहागंडाले यांनी दिली आहे. याकरिता मतदारसंघातील अनेक जनप्रतिनिधींनी प्रयत्न केले होते.भंडारा,नागपूर व भोपाल येथपर्यंत पत्रव्यवहार झालेला होता.मात्र २०१५ पासून आमदार विजय रहांगडाले यांनी पुढाकार घेत तिरोडा गोरेगाव विधानसभा मतदारसंघातील या प्रकल्पाच्या मंजुरीचे कागदपत्रे करण्याबाबत शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,वनमंत्री सुधीर मुनगंटीवार,केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय वनमंत्री हर्षवर्धन, केंद्रीय वन्यजीव मंडळाचे अध्यक्ष पंतप्रधान  नरेन्द्रजी मोदी यांच्या कार्यालयातून वेळो वेळी कार्यवाही करण्यात आली.

नुकतेच गेल्या महिन्यात 8 जूनला या प्रकल्पाच्या पाहणीसाठी भोपाळ येथून केंद्रीय समिती येऊन गेली होती.त्या समितीने पाहणी केल्यानंतर केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी करिता चित्रफितीसह संपूर्ण अहवाल सादर केला होता.त्यानंतर आमदार रहागंडाले यांनी 10 जून रोजी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री गडकरी व हर्षवर्धन यांची भेट या प्रकल्पामुळे 18 गावातील 500 हेक्टर जमिन सिंचनाखाली येणार असल्याची माहिती दिली होती.त्या प्रकल्पाला 17 जुर्लेच्या बैठकित मंजुरी मिळाल्याने प्रकल्पाच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे.