बाल हक्कांबाबत जन सुनावणी शुक्रवारला

0
7

 डचड द्वारे जिल्हयातील २.७० लक्ष लोकांना संदेश
 जिल्हयातील सर्व शासकीय विभागात लागले आवाहन पत्र
 डॉ. आर.जी. आनंद नवी दिल्ली यांच्या अध्यक्षते खाली होणार सुनावणी
 प्रवीण घुगे, अध्यक्ष राज्य बाल हक्क व सरंक्षण अधिकारी संरक्षण आयोग महाराष्ट्र यांची उपस्थिती
 सहा जिल्हे, सहा जिल्हाधिकारी ,पोलिस अधिक्षक यांची उपस्थिती
 बाल हक्क व संरक्षण आयोगापुढे तक्रारी मांडण्याची आज संधी
गडचिरोली,दि.१८:- आज दि.१९ जुलै रोजी नागपुर विभागातील सहाही जिल्हयातील बाल हक्कांबाबत सुनावणी नवी दिल्ली येथील आयोगाचे सदस्य डॉ. आर.जी. आनंद यांच्या अध्यक्षते खाली होत आहे. जिल्हयातील प्रशासनाच्या वतीने सर्व तयारी पुर्ण झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन नियोजन भवनाच्या सभागृहात सुनावणी होणार आहे. या सुनावणीला महाराष्ट्र राज्याचे राज्य बाल हक्क व संरक्षण अधिकारी संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रविण घुगे उपस्थित राहणार आहेत.तसेच यावेळी सहाही जिल्याचे जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षक उपस्थित राहणार आहेत.
बाल हक्क आयोगाच्या सुनावणी साठी सर्व तयारी पुर्ण झाल्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सांगितल. जिल्हयातील २.७० लक्ष्‍ा जनतेला एस.एम.एस. द्वारे आवाहन करुन तक्रारी असल्यास त्या आज दाखल करण्यासाठी त्यांनी आवाहन केले आहे.
समितीचे स्वागत सकाळी ९.०० वा. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये लेझिम पथकाद्वारे केले जाणार आहे. त्यानंतर ९.४५ वा. आयोग पत्रकार परिषद घेणार आहे. पुढे १०.३० वा. पाहूण्यांच्या स्वागतानंतर प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात होणार आहे. या जनसुनवाणीसाठी तक्रारी दाखल करण्यासाठी कार्यक्रमस्थळी मदत केंद्र सुरु करण्यात आले आहे. तक्रार दाखल करण्याचा अर्ज त्या ठिकाणी मिळेल. अर्ज कसा भरावा तो कोणाकडे द्यावा याबाबत त्या ठिकाणी मदत मिळेल. बाल हक्क व संरक्षणाबाबत कोणीही तक्रार मुलाच्या वतीने दाखल करु शकतो.
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी काल दि. १८ जुलै रोजी आयोगाच्या सदस्यांबरोबर विभाग प्रमुखांची नियोजन बैठक घेतली. यावेळी सुनावणीबाबत सर्व प्रक्रिया व व्यवस्था यावर चर्चा केली. जिल्हाधिकाऱ्यांनी आवश्यक सुचना यावेळी सर्व विभाग प्रमुखांना दिल्या. तसेच दि.१८ रोजी विविध ग्रामपंचायतींमध्ये दवंडी देण्याच्या सुचनाही दिल्या. जिल्हयातील बाधित मुलांना न्याय देण्यासाठी सर्व स्तरावरुन तक्रारी येणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत असे ते म्हणाले.