खोब्रागडेंना गोंदिया पं.स.त घेण्यास सभापतींचा नकार;दुर्लक्ष केल्यास मुकाअ जबाबदार

0
40

गोंदिया,दि.०२ः-गोंदिया जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे सहाय्यक प्रशासन अधिकारी डी.टी.खोब्रागडे यांच्यावर महिलांच्या पिळवणूकीचे आरोप असल्याने तसेच नुकतेच झालेल्या परिचर बदलीमध्ये नियमबाह्य काम केल्याच्या ठपका असतांना आज त्यांची चौकशी राज्य महिला आयोगाचे पथक करणार आहे.या चौकशीच्या पाश्र्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी ज्यांनी स्थायी समिती व सर्वसाधारण सभेच्या ठरावानंतरच नव्हे तर अध्यक्षांच्या लेखी पत्रावरही कारवाई न करता वेळकाढू धोरण राबविले होते.त्यांनी राज्य महिला आयोगाचे चौकशी पथक येताच आपल्या अंगलट हे प्रकरण येऊ नये यासाठी तात्पुरते सामान्य प्रशासन विभागातून खोब्रागडे यांची सेवा सलंग्नता गोंदिया पंचायत समितीमध्ये केली होती.परंतु गोंदिया पंचायत समितीमध्ये खोब्रागडे यांच्या सेवा सलंग्नतेचे पत्र येताच पंचायत समितीच्या सभापती माधुरी हरिणखेडे यांनी अतितत्काळ प्रभावाने पत्राची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना १ ऑगस्ट रोजीपत्र लिहून खोब्रागडे यांना गोंदिया पंचायत समितीतून तत्काळ हटविण्याची मागणी केली आहे.
सभापती माधुरी हरिणखेडे यांनी पत्रात खोब्रागडे यांच्याविरुध्द तक्रारी असून त्यांना चौकशी निष्पक्ष करण्याच्या दृष्टीने गोंदिया पंचायत समितीत हलविण्यात आले असल्याचा उल्लेख करतांनाच यापुर्वी सदर कर्मचारी विरुध्द गोंदिया पंचायत समितीर्तंगत कार्यरत लपा विभागाच्या महिला कर्मचारीने लैंगिक छळ प्रकरणात केलेल्या तक्रारीवर प्रशासकीय कारवाई करण्यात आलेली होती.त्यातच या पंचायत समितीमध्ये मोठ्या प्रमाणात महिला कर्मचारी असल्याने ग्रामीण भागातूनही महिलांचे येण्याचे प्रमाण अधिक असल्याने पुन्हा घटनेची पुनर्वृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने बेजाबदार व चारित्र्यहिन कर्मचाèयास गोंदिया पंचायत समितीच्या महत्वपुर्ण पदावर पाठविणे अयोग्य असून गोंदिया पंचायत समितीतून तत्काळ हटविण्याची मागणी केली आहे.सोबतच सभापती हरिणखेडे यांनी सदर पत्राची दखल न घेता या ठिकाणी कुठलीही परिस्थिती निर्माण झाल्यास त्यास मुख्य कार्यकारी हे स्वतः जबाबदार राहतील असा उल्लेखच त्या पत्रात केल्याने खळबळ माजली आहे.