आरक्षण बचाव आंदोलनात संघर्ष वाहिनीचा सहभाग

0
28

गोंदिया,दि.03- ‘सेव्ह मेरिट,सेव्ह नेशन’ असे भ्रामक अभियान काही श्रीमंत आणि तथाकथित अभिजन वर्गाने सुरू केले असून यामागील त्यांचा मुख्य हेतू सामाजिक आरक्षणाला विरोध करणे हाच आहे.या असंविधानिक कृतीचा विरोध करण्यासाठी गोंदिया येथे एस डी ओ. कार्यालयासमोर १० ऑगस्टला सकाळी ११ वाजता नियोजित असलेल्या आंदोलनात गोंदिया जिल्हा संघर्ष वहिनी,भटक्या-विमुक्तांची परिषद ही सामाजिक संस्था सहभागी होणार आहे.
संघर्ष वाहिनीचे गोंदिया जिल्हा संघटक परेश दुरुगवार यांच्या म्हणण्यानुसार वंचितांसाठी असलेल्या सामाजिक आरक्षणामुळे देश बुडत असल्याची अफवा मनुवादी मानसिकतेचे लोक सर्वत्र पेरीत आहेत. ही अत्यंत गंभीर बाब असून सामाजिक न्यायविरोधी आहे.
याचा विरोध करण्यासाठी एस.सी.,एस.टी., ओ.बी.सी.,व्ही.जे. एन.टी., विशेष मागास प्रवर्ग, माब लिंचिगलचा बळी अल्पसंख्यक समूह यांचा सहभाग असलेल्या आंदोलनात संघर्ष वाहिनीचा सहभाग आहे.करिता जिल्ह्यातील सर्व भटके-विमुक्त समाजाने या आंदोलनात बहुसंख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संघर्ष वाहिनीचे परेश दुरुगवारसह अनिल मेश्राम,हनसलाल वालथरे, विनोद कागदिमेश्रम यशवंत दिघोरे, काशिनाथ कांबळे,सुनील काळे,महेश अहिरकर, श्रावण मडावी,तुलाराम कुराडे, सौ.रंजना सोनवाणे, सौ.सुषमा वालथरे,सौ.रेखा मोहनकर,सौ.पुष्पा मेश्राम,सोमनगिरी चव्हाण, भगवाननाथ ठाकरे,मनीराम मौजे, सुंदरलाल लिल्हारे,कोमेश कांबळे,माणिक गेडाम आदींनी केले आहे.