कारंजा (लाड) येथील विद्यार्थ्यांची ‘गणित भवनला’ भेट

0
18

यवतमाळ दि.20- अनेक विद्यार्थ्यांचा गणित हा विषय नावडता आहे तर काहींना हा विषय भेडसावतो. विद्यार्थ्यांची गणिताची भीती दूर करून त्यांना सोप्पा सुलभरित्या गणित कसे समजावून सांगता येईल या हेतूने कारंजा (लाड) येथील आर.जे.चवरे हायस्कूल च्या पाच शिक्षकांनी 32 विद्यार्थ्यांसह येथील गणित भवनाला नुकतीच भेट दिली. यावेळी ‘गणित भवन’ चे प्रमुख संचालक नरेंद्र पवार यांनी त्यांचे स्वागत केले.
गणितातील सूत्रांच्या आधारे गणित सोडवावे लागते पण हे सूत्रच विद्यार्थ्यांना अवघड वाटतात. त्यामुळे गणित विषयाची आवड त्यांना निर्माण होत नाही. गणित सोप्या सुलभ पद्धतीने समजून देण्यासाठी काही वस्तू, साहित्य, उपकरण याचा उपयोग कसा करता येतो. याबाबत नरेंद्र पवार यांनी माहिती दिली. यानंतर गणितांची सूत्राची सांगड घालून काही वस्तू, उपकरणाच्या साह्याने गणित सोप्या भाषेत प्रयोगाद्वारे करून दाखविले. यावेळी शिक्षकांची व विद्यार्थ्यांची उत्सुकता दिसून आली.
यानंतर अभिजीत ढाकुलकर, अनुज चांडक, अर्थव गाडगे, हर्षल खाडे, कु. कीर्ती चौधरी, कु.रसिका रविशंकर, कु.सोनिया गावंडे आदि इयत्ता 9 वी त शिकणार्या या विद्यार्थ्यांनी पवार सरच्या मार्गदर्शनाखाली वस्तू,उपकरणाद्वारे गणितांचे प्रयोग करून पाहिले. शाळेचे गणित शिक्षक अनुपम इंगोले, संदीप दुबे, गणेश सोनार, शिक्षीका कु.मनिषा सुर्वे यांचे समवेत शिक्षीका सौ.आरती मनोज राठोड, लोकेश भेलंड उपस्थित होते. विद्यार्थ्यांना गणित समजवून दिल्याबद्दल आर.जे.चवरे विद्यालयाच्या मु‘याध्यापिका सौ.चोपडे यांनी पत्राद्वारे नरेंद्र पवार यांचे आभार मानले.