पर्यटकांसाठी ताडोबात सफारीकरीता खुल्या गाड्या

0
17

चंद्रपूर : राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या जंगल सफारीसाठी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात टाटा मोटर्स कंपनीच्या तीन गाड्या दाखल झाल्या आहेत. त्याचे लोकार्पण पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते येथील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कार्यालयाच्या झाले.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई गुरुनुले, आमदार नाना शामकुळे, ताडोबाचे क्षेत्र संचालक जी.पी.गरड, चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे, एफडीसीमचे महाव्यवस्थापक एस.एस.डोळे, ताडोबा बफरचे गजेंद्र नरवने आदी उपस्थित होते.
ताडोबा-व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पर्यटकांना कुठलीही अडचण जाऊ नये यासाठी ताडोबा-व्याघ्र प्रकल्पात सर्व सोई सुविधा निर्माण कराव्या तसेच निधीच्या खर्चाचे प्रस्ताव तयार करण्यात यावे, अशा सूचना श्री. मुगंटीवार यांनी केल्या.
सेवानिवृत्त व वयोवृद्ध वनकर्मचारी महादेव डाखरे व पी.एम.भाले यांच्या हस्ते गाडीची पूजा करुन वनमंत्र्यांनी या गाडीला हिरवी झेंडी दाखविली. यानंतर सुधीर मुनगंटीवार यांच्यासह सर्व उपस्थितांनी गाडीमधून जनता महाविद्यालयापर्यंत सफारीचा आनंद घेतला.
या गाड्या पूर्ण दिवस सुरु राहणार असून गाडीद्वारे ताडोबात सफारी करण्यासाठी मोहूर्ली येथून सोमवार ते शुक्रवार पर्यंत प्रती पर्यटक 350 रुपये दर पडेल तर शनिवारी व रविवारी जाणाऱ्या प्रती पर्यटकांना 400 रुपये प्रमाणे पैसे द्यावे लागणार आहे. पर्यटकांना आगाऊ बुकींगशिवाय वेळेवर सफारी करणे सहज शक्य होणार आहे. या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन ताडोबाचे क्षेत्र संचालक जी.पी.गरड यांनी केले आहे.