ओबीसींचे आरक्षण निर्धारीत करा;ओबीसी क्रांती मोर्चा

0
18

भंडारा,दि.23ः-भारतीय संविधानाच्या कलम ३४0 मध्ये संशोधन करून ओबीसींची निश्‍चित परिभाषा व त्यांच्या आरक्षणाची टक्केवारी निर्धारीत करण्यात यावी, या मागणीचे निवेदन ओबीसी क्र ांती मोर्चाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदनातून करण्यात आली आहे.
ओबीसी प्रवर्गाची निश्‍चित परिभाषा नसल्याने व आक्षरणाची टक्केवारी निर्धारीत नसल्याने या प्रवर्गावर सातत्याने अन्याय होत आलेला आहे. ओबीसींमध्ये नवनव्या जातींचा समावेश होत असल्याने मूळ ओबीसींच्या वाट्याला काहीच येत नाही. केंद्र सरकारच्या सुचीमध्ये ओबीसी प्रवर्गात साडेचार हजार जाती आहेत. विविध राज्य सरकारच्या सुचींमध्ये वेगवेगळ्या जातींचा समावेश आहे. ज्या जाती महाराष्ट्रात ओबीसीमध्ये आहेत त्या अन्य राज्यात खुल्या प्रवर्गात आहेत. तर ज्या महाराष्ट्रात खुल्या प्रवर्गात आहेत त्या अन्य राज्यात ओबीसी प्रवर्गात येतात. ज्या जाती केंद्र सरकारच्या सुचीमध्ये ओबीसीमध्ये येतात त्या राज्य सरकारच्या सुचीमध्ये खुल्या प्रवर्गात येतात. एकाच देशात असा हा भेदभाव आहे. ओबीसींची संख्या ५२ टक्के असताना आणि मंडळ आयोगाने त्यांना २७ टक्के आरक्षण दिले असताना आज ओबीसींना १९ टक्के आरक्षण तर कधी २ टक्के आरक्षण मिळत आहे. या अन्यायामुळे ओबीसी प्रवर्गात कमालीचा असंतोष आहे. त्यामुळे कलम ३४0 मध्ये संशोधन करून ओबीसींची निश्‍चित परिभाषा व त्यांचे आरक्षणाची टक्केवारी निर्धारीत करण्यात यावी, अशी मागणी ओबीसी क्र ांती मोर्चाने पंतप्रधानांना निवेदनातून केली आहे. निवेदनावर मुख्य संयोजक संजय मते, संयोजक सुकराम देशकर, तालुकाध्यक्ष मंगेश वंजारी, शहर अध्यक्षा शोभा बावनकर यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

ओबीसींच्या समस्यांवर संसदेत आवाज उठवा

साकोली-युवा स्वाभिमान पक्षाच्या नेत्या तसेच अमरावती लोकसभा क्षेत्राच्या खासदार नवनीत राणा साकोली येथील विर्शामगृहात थांबल्या असता पोवार समाजबांधवांनी त्यांची भेट घेत ओबीसींच्या समस्यांविषयी संसदेत आवाज उठवावा, असे आवाहन केले. खा. राणा यांनी सम्राट राजाभोज यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले. यावेळी समाजबांधवांनी ओबीसींच्या नेत्या असल्यामुळे संसदेत ओबीसींच्या समस्यांविषयी आवाज उठवावा, संसदेत समस्या मांडून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावा, असेही आवाहन त्यांना करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय पोवार महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष मोतीलाल चौधरी उपस्थित होते. यावेळी डॉ. ओमेंद्र येळे, देवयानी राहांगडाले, आत्माराम पटले, टी. आय. पटले, घनश्याम पटले, हिरालाल पारधीकर, के. पी. बिसेन, संदिप बावनकुळे, छाया पटले, प्रल्हाद पटले, एच. बी. भेंडारकर, नेपाल कापगते, यशपाल कर्‍हाडे उपस्थित होते.