अर्जूनी/मोर नगरपंचायतीचे कामकाज रामभरोसे

0
39

विकास की भकास .नगरपंचायत मस्त नागरिक त्रस्त
अर्जूनी/मोर (संतोष रोकडे):- २०१५ मध्ये शासनाने काही ग्रामपंचायतींचे रुपांतर नगरपंचयतमध्ये केले. त्यामुळे शासनाकडून भरपूर निधी मिळेल व नगरातील सर्व प्रकारच्या समस्या दूर करण्यासाठी मदत होईल या आशेने नगरातील नाल्या.पाणी.वीज तलाव सुंदरीकरण होऊन नगराचा विकास होईल.या आशेने नागरिकांनी नगरसेवक निवडले. मात्र गत चार वर्षे पूर्ण झाली आहेत तरी नागरिकांच्या स्वप्नांचा चुराडा करण्याचे काम अर्जूनी/मोर नगरपंचायतीने केल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.
या नगरपंचायछमध्ये एकूण १७ प्रभाग आहेत. नगरसेवक विकास निधी खेचून आणण्यात व विकासकामे करण्यात पूर्णता अपयशी ठरले आहेत असे अनुभव नगरवासिय जनतेला येत आहे
दोन वर्षापूर्वी प्रभाग एक मध्ये मुख्य रस्त्याच्या मधोमध.पाईपला दोन ठिकाणी भगदाड पडले मात्र नगरपंचायतला दुरुस्तीची गरजच वाटली नसल्याने या ठिकाणी आतापर्यत अनेक अपघात घडले आहेत. विशेष म्हणजे याच प्रभागाला प्रथम नगराध्क्ष होण्याचा मान मिळाला होता. जाँयस्वाँल दारू दुटानासमोर नगरपंचायतीने ओला व सुखा कचरा गोळा करण्यासाठी कचरा कुंडी ठेवली होती. ती जमीनदोस्त अवस्थेत आहे पावसाळा सुरू असुनही डास निर्मुलनासाठी फाँगिंग करण्याचे औचित्य नगरपंचायत दाखवायला तयार नाही अनेक प्रभागामध्ये अजूनही पक्के रस्ते.नाल्या नाहीत. पिण्याच्या पाण्याची स्वतंत्र नळ योजना नाही.अनेक समष्यांनी नगर ग्रासले असतांनाही नगरपंचायत दुर्लक्ष करीत आहेत. सर्वपक्षीय सत्ता असणारी ही महाराष्टातील एकयेव नगरपंचायत असेल विकासाच्या दृष्टीने नगरसेवक एकत्र येत नाहीत मात्र एकमेकांवर कुरघोडी करण्यातच नगरसेवक धन्यता मानत आहेत.
४वर्षात २० च्या वर मुख्याधिकारी
महाराष्टातील ही नगरपंचायत एकमेव असेल जेथे ४ वर्षात २०च्या वर मुख्याधिकारी झालेत. एकमात्र मुख्याधिकारी किरण बगडे सोडले तर उर्वरित कुणीच या ठिकाणी का टिकले नाही हा संशोधनाचा विषय आहे. सतरा नगरसेवकांच्या सतरा भानगडीमुळे कोणीही मुख्याधिकारी येथे रहायला तयार नसल्याची चर्चा आहे.
२० दिवसांपासुन नळयोजना बंद
महाराष्ट जीवन प्राधीकरणाची नळयोजना नगराला पाणी पाजते. जिल्हा परिषदेच्या निधीवर योजना सुरू होती नगरपंचायत निर्मितीनंतर शासनाच्या निधीतून व नगरपंचायत उत्तपन्नातून योजना सुरू असायला हवी होती या योजनेतून पाणी पुरवठा चे काम नवेगावबांध येथील सुजल बहुउद्देशीय संस्थेकडे आहे ही संस्था तीन वर्षापासुन नगरपंचायतीकडे हस्तांतरणाचा प्रस्ताव सादर करीत आहे परंतु नगरपंचायत लक्ष दिले नाही त्यामूळे १ आँगपासुन नळयोजना बंद झाली आहे असे संस्थाध्क्ष किशोर तरोणे यांनी सांगितले आहे.
लोकप्रतिनिधींना चार वर्षात निधीच नाही
नगरपंचायत चार वर्षे झाली मात्र दुर्भाग्य की नगरपंचायतला लोकप्रतिनिधींचा निधी मिळाला नाही. फेबुवारी महिण्यात पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती आहे काही दिवसात आचारसंहिता लागू होईल मग या निधीचा फायदा काय? असा प्रश्न निर्माण होत आहे.
मुख्याधिकारी नसल्याने कामे खोळंबली
नगरपंचायतीला आजपर्यत पूर्ण वेळ मुख्याधिकारी मिळाले नाही जे मिळाले ते प्रभारी होते अधिकार्याविना नगरपंचायत असल्याने निधी असूनही खर्च अरता येत नाही कायम स्वरूपी मुख्याधिकारी मिळावाअसे नगराध्यक्ष किशोर शहारे यांनी सांगितले