भंडारा येथून पूरग्रस्त जिल्ह्यातील पशुधनासाठी हिरवा चारा रवाना

0
23

भंडारा : पशुसंवर्धन विभाग, भंडारा येथील अधिकारी व कर्मचारी यांच्या सहकार्यातून पुरग्रस्त जिल्हयातील पशुधनासाठी हिरवा चाऱ्याने भरलेला एक ट्रक  रवाना करण्यात आला. या ट्रकला जिल्हाधिकारी यांनी हिरवी झेंडी दाखविली. हा चारा शिरोड जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी पाठविला जाणार आहे. या ट्रकमध्ये १० मेट्रीक टन हिरवा चारा आहे. हा चारा तिथे पशुधनासाठी उपयोगी पडणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे झालेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. नरेश गिते, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जगताप, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सतीश राजु, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नितीन फुके, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. सुरेश कुंभरे व पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. पूरग्रस्तांसाठी अन्य विभागाने सढळ हाताने मदत पाठवावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.