क्षत्रिय कलार समाजाचा सामूहिक विवाह सोहळा

0
18

परसवाडा : अक्षयतृतीयेच्या पर्वावर क्षत्रिय मरठा कलार समाज महिला समितीच्या पुढाकाराने मंगळवार (दि.२१) रोजी समाजभवन, वाजपेयी वार्ड, मर्ूी रोड, गोंदिया येथे सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
उद््घाटन खा. प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते, डॉ. रामनारायण भोयर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. अतिथी म्हणून आ. गोपालदास अग्रवाल, आ. राजेंद्र जैन, बालाघाटचे नगराध्यक्ष अनिल धुवारे, केशवराव मानकर, दुर्गा तिराले, उपसभापती चमनलाल बिसेन उपस्थित राहणार आहेत.
सदर सामूहिक विवाह सोहळ्यात चार वर-वधूंना आशीर्वाद देण्याची जबाबदारी महिला समितीने घेतली आहे. त्यांनीच समाजात जावून सामूहिक विवाह सोहळ्यात विवाह करण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. यात सुनील नारायण डोहरे रा. आसोली याचे विवाह योगेश्‍वरी फाल्गुन धपाडे रा. गोंदिया, संदीप मुन्ना बारेवार रा. हिरडामाली याचे विवाह मोना गजेंद्र कावळे रा. गोंदिया, अनिल तिलकचंद चौरागडे रा. नागपूर याचे विवाह लीना छोटेलाल विजयवार रा. भोपाल, अरविंद जंगलसिंह गंगभोज याचे विवाह आराधना दिनेश चौरावार रा. नागपूर हिच्यासह लावण्यात येणार आहे. सदर सामूहिक विवाह सोहळ्याला मोठय़ा संख्येने समाजबांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन महिला समितीचे अध्यक्ष निता धपाडे, सचिव निशा नारायण जमईवार, कमल कावळे, ज्योती तपन कावळे, पुनम डहाके, रिता चौरागडे, नेहा धुवारे, संगीता डोहरे, रेखा कावळे, सीता दियेवार, सिंधू पिपरेवार, जयश्री सिरसाटे यांनी केले आहे.