जेष्ठ सहकार नेते वसंतराव गुर्जर यांचे निधन

0
13

भंडारा-भंडारा गोंदिया जिल्ह्याचे सहकार क्षेत्रातील वरिष्ठ नेते व भंडारा अर्बन को आॅफरेटिव्ह बँकेचे संस्थापक सदस्य राहिलेले माजी अध्यक्ष वसंतराव गुर्जर यांचे आज बुधवारी वृध्दापकाळाने निधन झाले.गुर्जर यांच्या निधनाने दोन्ही जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे सर्वात मोठे नुकसान झाले आहे.त्यांच्या मागे बराच मोठा आप्त परिवार आहे.

सहकार क्षेत्राला मोठा धक्का- खा.प्रफुल पटेल
भंडारा गोंदिया जिल्ह्यातील सहकाराचे जनक राहिलेले आमचे वरिष्ठ व आदरणीय वसंतरावजी गुर्जर यांच्या निधनाने दोन्ही जिल्ह्यातील सहकार क्षेत्राला मोठ्ठा धक्का बसला आहे.आज जे कााही सहकार क्षेत्रात विशेष करुन अर्बन बँकेंची वाटचाल सुरु आहे त्यात च्यांचा खारीचा वाटा असून त्यांच्या निधनाने सहकारातील एक हिरा हिरावला असून आपले मार्गदर्शक हरपल्याची भावना खासदार प्रफुल पटेल यांनी व्यक्त केली.

सहकाराची दिशा देणारे मार्गदर्शक -खा.नाना पटोले
आपल्या सामाजिक कायार्तच नव्हे तर राजकिय क्षेत्रातील कारकिर्दीत वसंतराव गुर्जर यांचे मोलाचे योगदान होते.भंडारा अर्बन बँकच नव्हे तर को अा्रपरेटिव्ह क्षेत्रात त्यांचे योगदान महत्वाचे राहिले असून त्यांच्या निधनाने मोठे नुकसान सहकार क्षेत्राचे झाल्याची खंत खासदार नाना पटोले यांनी व्यक्त केली.