एक दिवस मजूरासोबतग्राम रोजगार दिवस साजरा

0
12

गोंदिया, दि ७ : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत एक दिवस मजूरासोबत उपस्थित राहून ग्राम रोजगार दिवसाचे महत्व जाणून घेण्याच्या दृष्टीकोनातून शासकीय योजनांची माहिती सडक/अर्जुनी तालुक्यातील उशिखेडा व गिरोला/हेटी या ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या ग्रामस्थांना नुकतीच देण्यात आली.
आम आदमी विमा योजना व कामगार कल्याण मंडळाच्या योजनेबाबत माहिती देण्यात आली. ज्या मजूरांनी १००‍ दिवस काम केले अशा मजूरांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यात येतो. असे सांगितले. यावेळी मजूरांची नेत्र तपासणी, मधुमेह, अस्थिरोग तपासणी करण्यात आली. महसूल विभागाकडून मजूरांना आधारकार्ड, ज्येष्इ नागरिक ओळखपत्र, जातीचे प्रमाणपत्र, वयाचे व उत्पन्नाचे दाखले, ७/१२, गावं नमुना नकाशे देण्यात आले. पशूवैद्यकीय विभागाकडून पशू आरोग्य व देखलभाल विषयक माहिती देण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते मजूरांना वेतन चिठ्ठी आणि रोजगार पत्रकाचे वाटप करण्यात आले. सन २०१५-१६ मजूराची तरतूद व नियोजन आराखडा सरपंचाना देण्यात आला.
कार्यक्रमाला जि.प.सदस्य श्री मिलन राऊत, पं.स.सदस्य मीना राऊत, सरपंच सरीता टेकाम, ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी, उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे, तहसिलदार एन.जे.उईके, गटविकास अधिकारी श्री.धांडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. ब्राम्हणकर, डॉ. नाझ, डॉ. पाटील, डॉ. खंडाते, विस्तार अधिकारी एस.व्ही.झामरे, सहायक कार्यक्रम अधिकारी भारत बोदेले, विस्तार अधिकारी आर.एस.राऊत, आर.पी.उगले, मंडळ अधिकारी एस.आर.पवार, एस.व्ही.साखरे, आर.एस.नान्हे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाला २०० च्या मजूरवर्ग उपस्थित होता. संचालन व उपस्थितांचे आभार के.व्ही.बिसेन यांनी मानले.