जलयुक्त शिवार अभियान अपर आयुक्तांनी केली कामाची पाहणी

0
10

गोंदिया,दि.९ : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत तिरोडा तालुक्यातील अत्री येथे सुरु असलेल्या नाला सरळीकरणाच्या कामाला आज (ता.९) नागपूर विभागाचे अपर आयुक्त हेमंत पवार यांनी भेट देऊन पाहणी केली. कामावर उपस्थित असलेल्या मजुरांशी संवाद साधला. यावेळी कामावर १६७ मजूर काम करीत होते. यामध्ये ११४ महिला व ५३ पुरुष मजूरांची उपस्थिती होती. १ कि.मी. लांबीच्या नाला सरळीकरणाच्या या कामांवर १७ लक्ष ७ हजार २०० रुपये खर्च करण्यात येणार आहे. कामाबाबत आपण समाधानी असल्याचे मजूरांनी सांगितले. योग्य मजूरी मिळत असल्याचे मजूरांनी यावेळी सांगितले. जलयुक्त शिवार अभियानातून शेततळे, मजगी, भात खाचरे, शोषखड्डे व विहिरी पुनर्भरणाच्या कामाचे नियोजन करण्यात आल्याचे सांगितले.
यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण महिरे, जिल्हा नियोजन अधिकारी बकूल घाटे,खंड विकास अधिकारी नारायण जमईवार, तहसिलदार श्री.कोकवार,जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, तालुका कृषी अधिकारी श्री.पोटदुखे, सहायक लेखा अधिकारी कुलदीप गडलिंग, विस्तार अधिकारी श्री.निमजे, अत्रीचे सरपंच डॉ.धनराज माहुरे, सचिव श्रीमती एस.बी.पारधी यांची उपस्थिती होती.