खोडशिवनी उपसा सिंचन योजनेचे पालकमंत्र्यांचे हस्ते भूमीपूजन

0
9

गोंदिया, दि.९ : जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाअंतर्गत सडक अर्जुनी तालुक्यातील खोडशिवनी येथील मोठ्या नाल्यावर २० लक्ष ९४ हजार रुपयाच्या उपसा सिंचन योजनेच्या कामाचे भूमीपूजन पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. ४६ लक्ष ६८ हजार रुपये किंमतीचा हा प्रकल्प असून यावर १९ लक्ष १७ हजार रुपयाचे काम पूर्ण झाले आहे. या उपसा सिंचन योजनेमुळे परिसरातील ९० हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष शामराव शिवणकर, उपविभागीय अभियंता एस.सी.कापगते, शाखा अभियंता व्ही.जी.गायधने, शिलाताई चव्हाण, राजू परशुरामकर, भृंगराज परशुरामकर, राजेंद्र परशुरामकर, सी.के.बिसेन, परमानंद बडोले, रोशन बडोले, देवानंद वंजारी आदी मान्यवर व गावकरी उपस्थित होते.