शिवद्रोही पुरंदरेला दिलेला पुरस्कार शासनाने परत घ्यावा

0
10

गोंदिया : छत्रपती शिवाजी महाराज तथा राजमाता जिजाऊ यांच्याविरूद्ध बदनामीकारक लिखान करणाNया बाबासाहेब पुरंदरेला महाराष्ट्रातील युती सरकारने महाराष्ट्र भुषण पुरस्कार देऊन मानुसकीला काळीमा फासला आहे. असा आरोप करीत मराठा सेवा संघ, ओबीसी सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाउâ ब्रिगेड व अनेक संघटनांनी निषेध व्यक्त केला. दरम्यान आज (दि.११) दुपारी गोंदिया येथील जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करून पुरंदरेला देण्यात आलेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार शासनाने परत घ्यावा, अशी मागणी केली.
छत्रपती शिवाजी महाराज व जिजाऊ विरूद्ध बदनामीकारक लिखानाबद्दल यापूर्वीही महाराष्ट्रात रान पेटले होते. चारीत्र्यावर बोट ठेवणारे लिखान जेम्सलेनने केले होते. त्यावेळी बाबासाहेब पुरंदरे यांनीच खोटी माहिती पुरवीली होती. याामुळे छत्रपती शिवाजी महाराज व जिजाऊ विरूद्ध बदनामीकारक इतिहास समाजापुढे गेला. अशा शिवद्रोही व्यक्तीला शासनाने महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन शिवप्रेमींचा अवमान केल्याचा आरोप सामाजिक संघटनांनी केला आहे. शासनाच्या या निर्णयाविरूद्ध जिल्ह्यातील अनेक संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.
पुरंदरेला दिलेला पुरस्कार शासनाने परत घ्यावा या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाNयांमार्पâत महाराष्ट्र शासनाला पाठविण्यात आले आहे. निवेदन देतेवेळी रमेश ब्राम्हणकर, डी.एस.मेश्राम, पी.डी.चव्हाण, रतन वासनिक, वैâलाश भेलावे, माहूरे, प्रशांत बोरकुटे, प्रेमलाल साठवणे, एन.एस.भालाधरे, संतोष वैद्य, एन.एल.गेडाम, दिपेंद्र वासनिक, रंजीत बन्सोड, राजेश नागरिकर, राजेश कनोजिया, डी.एस.मेश्राम, सविता बेदरकर, धनेंद्र भुरले यांसह मराठा सेवा संघ, ओबीसी सेवा संघ, संभाजी ब्रिगेड आणि जिजाऊ ब्रिगेडचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. शासनाने योग्य निर्णय न घेतल्याच जिल्ह्यात आंदोलन उभारण्यात येईल. असा इशारादेखील निवेदनातून देण्यात आला आहे.