पोलिस कर्मचारी पत संस्थेची निवडणूक उत्साहात

0
8

गोंदिया दि.11: गोंदिया पोलीस कर्मचारी सहकारी पत संस्थेच्या संचालक पदाची निवडणूक आज ११ मे रोजी आज जिल्ह्यातील सहा मतदान केंद्रावर घेण्यात आली. एकूण ११ पदासाठी झालेल्या या निवडणूकीत ८ उमेदवार बहुमताने व ३ उमेदवार निर्विरोध निवडून आले.
निवडणुकीत विविध गटातील १२ उमेदवार उभे होते. पोलिस मुख्यालय कारंजा, देवरी पोलीस उपमुख्यालय, पोलीस ठाणे चिचगड, पोलीस दूरक्षेत्र गोठणगाव, पोलीस ठाणे तिरोडा, पोलीस ठाणे सालेकसा मतदान केंद्रावर एकूण ८९१ सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला. विजयी झालेल्या उमेदवारांमध्ये सर्वसाधारण गटातून गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्याचे श्रीराम मिश्रा यांना ८२४ मते मिळाली. याच गटातून राष्ट्रीय महामार्ग गोंदियाचे रविशंकर चौधरी यांना ८०४ मत, शहर पोलिस ठाण्याचे मिल्कीराम पटले यांना ७९३ मत, सालेकसा पोलीस ठाण्याचे ईश्वरदास माणिकपुरी यांना ७३२ मत, शहर पोलीस ठाण्याचे अरूण भंडारी यांना ७२३ मते, गोंदिया पोलीस मुख्यालयाचे शाहीद अंसारी यांना ६५५ मते मिळाली. तर अनुसूचित जाती जमाती गटातील गोंदिया पोलीस मुख्यालयाचे विनोद कल्लो यांना ४८१ मते व ओबीसी गटातून राष्ट्रीय महामार्ग गोंदियाचे श्रीधर शहारे यांना ६५५ मते मिळाली. तसेच वामन थाटकर, आशा मेश्राम व qबदू चोरवाडे हे उमेदवार निर्विरोध निवडून आले.