रेल्वेच्या धडकेने ट्रक्टरचे तुकडे

0
9

गोंदिया,दि.14-गोंदिया-चंद्रपूर रेल्वेमागार्वर सायकांळी गोंदिया-चंद्रपूर लोकल प्रवासी रेल्वेगाडीने सौदंडजवळील सिंदबीरी गावानजीच्या रेल्वेक्रासींगनजीक ट्रक्टरला दिलेल्या धडकेत ट्रक्टरचे दोन तुकडे झाल्याची घटना आज गुरुवारी सायकांळी साडेसहा ते सात वाजेच्या सुमारास घडली.या घटनेत कुठलीही जिवीत हानी झालेली नसून गोंदिया रेल्वे पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.घटनेनंतर काही काळ गोंदिया चंद्रपूर रेल्वेगाडी तिथेच थांबून होती,नतंर काहीवेळाने पुढे रवाना करण्यात आली.