फ्लाय अ‍ॅशच्या उपयोगासाठी दाखविले प्रात्यक्षिक

0
21

तिरोडा दि.2४: अदानी पॉवर महाराष्ट्र लिमिटेड तिरोडाच्या वतीने अदानी फाऊंडेशन तिरोडाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या गावातील प्रगत शेतकऱ्यांकरिता पिकांचे उत्पादन वाढीसाठी शेतजमिनीत फ्लॉय अ‍ॅशचा उपयोगाविषयी प्रात्यक्षिक व मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. सीएसआयआर, प्रगत पदार्थ व प्रकम अनुसंधान संस्थान भारत सरकार, भोपाल यांच्या सहकार्याने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रगत पदार्थ व प्रकम अनुसंधान संस्थान भारत सरकारचे वरिष्ठ संशोधक डॉ.मुरली तसेच अदानी पॉवर महाराष्ट्र लिमिटेड तिरोडाचे समीर मित्रा, ब्रजेशकुमार पांडे, सी.व्ही.एस. प्रताप, एस. चक्रवर्ती, मोहन पांडे, दिलीप आचार्य, अदानी फाऊंडेशनचे प्रकल्प समन्वयक सुबोधकुमार सिंग उपस्थित होते.

शिबिराच्या सुरुवातीला उपस्थित सर्व शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक क्षेत्र भेटीसाठी नेऊन शेतीची मशागत करतेवेळी फ्लॉय अ‍ॅश शेतीमध्ये कशाप्रकारे मिश्रीत केली जाते हे प्रात्यक्षिकाद्वारे समजविण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. मुरली यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना फ्लॉय अ‍ॅश ही शेतीसाठी फायद्याची आहे. फ्लॉय अ‍ॅशमध्ये मुख्यत: नैसर्गिक सुक्ष्म पोषक तत्वे असतात जसे की तांबे, जस्त, लोह, मॅगनीज, बोरॉन या पोषक तत्वांचा पिकांना फायदा होतो. तसेच शेतजमिनीत फ्लॉय अ‍ॅशच्या उपयोगामुळे पिकांच्या उत्पादनात वाढीत १५ ते २२ टक्के वाढ होते.
फ्लॉय अ‍ॅश मिश्रीत शेतजमिनीतून घेतलल्या पिकासंदर्भात राष्ट्रीय पोषण आहार संस्था हैद्राबाद, भारत सरकार यांनी सुद्धा आपली गुणवत्ता मानके यावर निर्धारित केली आहे.
डॉ. मुरली यांनी शेतकऱ्यांना प्रत्येक एकरात २० ते ४० टनापर्यंत फ्लॉय अ‍ॅशची मात्रा शेतजमिनीत दिल्यास पाणी रोखून धरण्यास उपयुक्त ठरते व पाण्याची बचत सुद्धा होते असे मार्गदर्शन केले.
त्यानंतर अदानी पॉवर महाराष्ट्र लिमिटेडचे समीर मित्रा यांनी मार्गदर्शन करताना शेतकऱ्यांनी तंत्रशुद्ध पद्धतीने शेती करुन व्यवसायीक दृष्टिकोनातून शेती करावी असा सल्ला दिला.
अदानी फाऊंडेशनचे प्रकल्प समन्वयक सुबोधकुमार सिंग यांनी आपल्या मार्गदर्शनातून शेतकऱ्यांसाठी अदानी पॉवर महाराष्ट्र लिमिटेड व अदानी फाऊंडेशनतर्फे शेतकऱ्यांकरिता जे कार्यक्रम राबविले जातात. कार्यक्रमामध्ये सक्रियरीत्या सहभागी होऊन यशस्वीतेसाठी करण्याकरिता सहकार्य करावे असे आवाहन केले. त्याचप्रमाणे अदानी पॉवर महाराष्ट्र लिमिटेड तिरोडा अडीच वर्षे स्वत: प्रात्यक्षिक यशस्वी करेल तदनंतर शेतकऱ्यांनी या पद्धतीने उत्पादन घेण्यास प्रेरणा देण्यात येईल असे सांगितले.
सदर क्षेत्र प्रात्यक्षिक यशस्वी करेल तदनंतर शेतकऱ्यांना या पद्धतीने उत्पादन घेण्यास प्रेरणा देण्यात येईल, असे सांगितले. सदर क्षेत्र प्रात्यक्षिक व प्रशिक्षण शिबिराला चिरेखनी, कवलेवाडा, करटी (बु.), पुजारीटोला, भिवापूर, मेंदीपूर, गराडा, खमारी, चिखली, मरारटोला, जमुनीया, धामनेवाडा, बेरडीपार इत्यादी गावातील प्रगत शेतकरी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संचालन ए.पी. सिंग व आभार उगम देशमुख यांनी मानले. यशस्वीतेसाठी कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.