सात कृषी केंद्रांवर विक्री बंदी

0
11

गोंदिया दि.२ : खरीप हंगामासाठी शेतकरी कामाला लागले असून बी-बियाणे विक्रीसाठी कृषी केंद्रचालकही सरसावले आहेत. मात्र शेतीसाठी लागणारे बियाणे, खते व कीटकनाशकांची विक्री करताना नियमांचे पालन न केल्याने आगमाव व सालेकसा तालुक्यातील सात कृषी केंद्रांवर सोमवारी भरारी पथकाने कारवाई करीत विक्रीबंद केली.
कृषी विभागाचे निरीक्षक मोहाडीकर, मडामे यांच्यासह इतर कर्मचार्‍यांच्या या भरारी पथकाने अचानक दोन्ही तालुक्यातील कृषी केंद्रांची तपासणी केली. त्यात आमगाव तालुक्यातील चेतन कृषी केंद्र आमगाव, परमात्मा एक कृषी केंद्र आमगाव आणि माँ बम्बलेश्‍वरी कृषी केंद्र आमगाव, सालेकसा तालुक्यातील अंबुले कृषी केंद्र सालेकसा, माँ बम्बलेश्‍वरी कृषी केंद्र सालेकसा, खरेदी विक्री सोसायटी सालेकसा आणि किसान कृषी साकरीटोला या केंद्रावर अनियमितता आढळली. स्टॉकची नोंदणी नसणे, रेट बोर्ड नसणे, मालाचा रेकॉर्ड नसणे अशा विविध कारणांसाठी दोषी ठरविले.