उपसंचालकाच्या आदेशाला आवाहन देणार-डॉ.दोडके

0
23

माझ्याविरूद्ध षडयंंत्र रचून हेतुुपुरस्पर तक्रार;

गोंदियाः- स्थानिक बाई गंगाबाई रूग्णालयातील वैद्यकीय अधिक्षक डॉ.संजीव दोडके यांनी बी.जे.डब्ल्लू रूग्णालयातील काही महिला कर्मचाèयांनी लावलेले आरोप हेतु पुरस्पर असून ते सुट्टीवर असतांना उपसंचालक डॉ.जायस्वाल यांनी त्यांची सेवा तुमसर येथील शासकीय रूग्णालयात संलग्न करून बदली केल्याप्रकरणी आपण आवाहन देणार असून आपल्यावर झालेल्या अन्यायाविरूद्ध वरिष्ठाकडे न्याय मागणार असल्याची माहिती डॉ.संजीव दोडके यांनी आयोेजित पत्रकार परिषदेत दिली.
बी.जे.डब्ल्यू रूग्णालयातील एनआरएचएम अंतर्गत कार्यरत प्रियंका उवाडा, रक्तपेढीतील नेहा जैसवार व एड्स विभागात कार्यरत एचआयव्ही काउन्सलर अर्पणा जाधव व तेथील तांत्रिक कर्मचारी यांच्या तक्रारीवरून डॉ.संजीव दोडके यांची तुमसर येथील शासकीय रूग्णालयात बदली करण्याचे आदेश आरोग्य विभागाच्या उपसंचालकानी काढले आहेत.या आदेशाला त्यांनी आवाहन दिले असून या मागे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रवि धकाते असून षडयंत्र रचून खोटी तक्रार करण्यात आल्याचा स्पष्ट आरोप त्यांनी लावला आहे.
या संदर्भात माहिती दिली की,२८ जानेवारी रोजी लता यादव या महिलेचा रूग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यु झाला असता प्रमोद गजभिये या गुंड प्रवृतीच्या इसमाने काही लोकांना सोबत करून त्यांच्या कार्यालयात येऊन शिविगाळ केली तसेच धक्काबु्नकी केली.या प्रकरणाची रितसर पोलीस स्टेशनला तक्रार केली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक ही तक्रार मागे घ्या म्हणून आपल्यावर दबाव टाकत होते.मात्र, ती तक्रार मागे घेतली नाही.त्यामुळे माझ्याविरूद्ध षडयंत्र रचण्यात आले असावे.रूग्णालयात ७२ कर्मचारी एनआरएचएम अंतर्गत कार्य करित आहेत.मात्र त्यापैकी फक्त ४ महिला कर्मचारीनी माझ्याविरूद्ध खोटी तक्रार केली त्यांची साधी शहनिशा व चौकशी न करता कार्यवाही करण्यात आली हे योग्य नाही. एनआरएचएम अंतर्गत बी.जे.डब्ल्यु रूग्णालयात कंत्राटी कर्मचारी भरती करण्याचे अधिकार वैद्यकीय अधिक्षकांचे असतांनाही जिल्हा शल्य चिकित्सक ही भरती करतात इतकेच नव्हे तर नियमाना बाजुला ठेवून नेमणूक दिली जाते असाही आरोप डॉ.दोडके यांनी लावला आहे.नवजात अतिदक्षता कक्षासाठी वैद्यकीय अधिकारी नियुक्त करतांना एमबीबीएस वैद्यकीय अधिकाèयांची नेमणूक करावी असे शासनाचे आदेश असतांनाही जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रवि धकाते यांनी आठही नेमणूका बी.एस.एम.एस डॉक्टरांच्या केल्या आहेत.कंत्राटी कर्मचारी नियुक्त करतांना जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना प्राधान्य देण्यात यावे असे शासनाचे निर्देश असतांनाही डॉ.धकाते हे हिगंणघाटचे असल्याने नेमणूक करतांना ते जिल्ह्या बाहेरील उमेदवारांना विशेषतः वर्धा व चंद्रपूर येथील उमेदवारांना प्राधान्य देतात असेही डॉ.दोडके यांनी सांगितले.माझ्याविरूद्ध तक्रार करणाèया प्रियंका उवाड या qहगणघाटच्या असुन त्यांना ऑफीस मधील कामाची जवाबदारी कमी केली म्हणूून माझ्या विरूद्ध खोटी तक्रार केल्याचे सांगितले. रक्तपेढीत काम करणाèया नेहा जैसवार यांच्यासंदर्भात अनेक तक्रारी होत्या त्याची चौकशी करता दोषी आढळल्यामुुळे त्यांचा कंत्राट संपल्याबरोबर कामावरून कमी केले.तरीही डॉ.धकाते यांनी त्यांचे काम चांगले नसतांनाही नियमबाह्यरित्या केटीएस मध्ये नेमणूक केली.तक्रार करणाèया एड्स विभागातील टेन्किशियन व काऊन्सलर यांचा माझाशी कुठलाच संबंध येत नाही तरीही त्यांच्या कडून खोटा आरोप लावण्यात आले व यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धकाते जवाबदार असल्याचा आरोप त्यांनी लावला. मागील एका वर्षापासून बीजेडब्ल्यू रूग्णालयातील व्यवस्था ताळ्यावर यावी यासाठी प्रयत्नशील असतांना जिल्हा शल्य० चिकित्सकांच्या ढवळाढवळीमुुळे रूग्णालयातील वातावरण गढूळ झाले असून त्याचा विपरीत परिणाम आरोग्य सेवेवर होत आहे. या संदर्भात वरीष्ठ अधिकाèयांना लेखी कळविले मात्र कुणीही दखल घेतली नाही असेही ते म्हणाले.