जिल्हा परिषद गटासाठी सर्वच राजकीय पक्षात बंडखोरी

0
9

गोंदिया दि. १६- जिल्हा परिषदेच्या ५३ आणि आठ पंचायत समित्यांच्या १०६ जागांवर निवडणूक लढू इच्छिणाèयांनी सोमवारी शेवटचा दिवस असल्याने नामांकन दाखल करण्यासाठी एकच झुंबड केली होती. ऑनलाईन नामांकन दाखल केल्यानंतर त्याची मुद्रित प्रत (प्रिंट कॉपी) निवडणूक निर्णय अधिकाèयांकडे दाखल करण्यासाठी ठिकठिकाणच्या उपविभागीय कार्यालय आणि तहसील कार्यालयात गर्दी उसळली होती.
नामांकनपत्र दाखल करण्यासाठी सोमवारी (दि.१५) शेवटची तारीख होती. रविवारपर्यंत जिल्हा परिषदेसाठी १९७, तर पंचायत समित्यांच्या गणांसाठी २६८ नामांकन दाखल झाले होते. गोंदिया जिल्हा परिषद क्षेत्रासाठी ९५, पंचायत समिती क्षेत्रासाठी १५० अर्ज, आमगाव तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी ३७, पंचायत समितीसाठी ६६, तिरोडा तालुक्यात जिल्हा परिषद क्षेत्रासाठी ५३, पंचायत समितीसाठी ८८, सालेकसा तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी २७, पंचायत समितीसाठी ४६, सडक अर्जुनी तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी ५८, पंचायत समितीसाठी ७० तर अर्जुनी मोरगाव तालुक्यात जिल्हा परिषद क्षेत्रासाठी ७९ तर पंचायत समिती क्षेत्रासाठी ९४ अर्ज दाखल करण्यात आले आहेत. सोमवारी ऑनलाईन नामांकनात गोंदिया व सडक अर्जुनी येथे गडबडी झाल्यामुळे अंतिम आकडा काढण्यासाठी प्रशासनाला कसरत करावी लागत होती. यातूनच अनेकांचे नामांकन रद्द होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस हे पक्ष सर्व जागी आपले उमेदवार उभे करणार असल्यामुळे यावेळी निवडणुकीतील रंगत वाढणार असून बहुकोणिय संघर्ष होण्याची शक्यता आहे. त्यातच पक्षाची तिकीट न मिळाल्याने असंतुष्ट उमेदवारांकडून बंडखोरीही होणार आहे. अदलाबदलीच्या राजकारणात एकमेकांचे उमेदवार पळविणे सुरू आहे.
गोंदिया येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने गप्पू गुप्ता यांच्या नेतृत्वात फुलचूर,qपडकेपार व नागरा जिल्हा परिषद गटातील व पंचायत समिती गणातील उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.फुलचुर जिल्हापरिषद गटासाठी बेबीबाई सुनिल सिडाम यांनी तर फुलचूर गणासाठी ज्योती राजकुमार पटले,कुडवा जिल्हा परिषद गटासाठी खुशबू जितेश टेंभरे व कटंगीकला पंचायत समिती गणासाठी अखिलेश सेठ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.एकोडी गटातून काँग्रेसचे रमेश अंबुले,भाजपचे सुरे़श पटले यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.खमारी गटातून भाजपकडून मुनेश्वर रहागंडाले,आसोली गटातून भाजपकडून अमित बुध्दे यांनी अर्ज दाखल केला.गोरेगाव तालुक्यातील सोनी गटासाठी भाजप प्रदेश युवा मोच्र्याचे सचिव रविकांत (गुड्डू)बोपचे यांनी पक्ष कार्यालयापासून मिरवणुक काढून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार डॉ.खुशाल बोपचे,जि.प.कृषी सभापती मोरेश्वर कटरे,समाजकल्याण सभापती कुसन घासले,म्हसगावचे सरपंच गुड्डू बोपचे,कवलेवाड्याचे ऋषीपाल टेंभरे,घोटीचे सरपंच विश्वजीत डोंगरे आदी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.जि.प.सदस्य सीता रहागंडाले,पकंज रहागंडाले यांनीही सोनी गटासाठी अपक्ष व भाजप असे अर्ज सादर केले आहेत.काँग्रेसकडून पी.जी.कटरे,ओमप्रकाश कटरे व दामु हरिणखेडे यांनी अर्ज सादर केले आहेत.सौदंड गटातून भाजपकडून सडक अर्जुनी पंचायत समितीचे उपसभापती दामोदर नेवारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.कवलेवाडा गटासाठी राष्ट्रवादीकडून मनोज डोंगरे यांनी तर शिवसेनेकडून सदालाल भोंडेकर,भाजपकडून राजेश डोंगरे,राष्ट्रवादीकडून सरांडी गटासाठी रिना पंचम बिसेन,भाजपकडून सविता चामट,सेजगाव जिल्हा परिषद गटासाठी राष्ट्रवादी कडून राजलक्ष्मी तुरकर,भाजपकडून श्रीमती चौधरी,अर्जुनी गटातून काँग्रेसकडून डॉ.योगेंद्र भगत,भाजपकडून चर्तुभूज बिसेन यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.सुकडी गटातून राष्ट्रवादीकडून छाया जगण धुर्वे,भाजपकडून रजनी सोयाम ,भर्रेगाव गटातून भाजपकडून सविता पुराम,नवेगावबांध गटासाठी भाजपकडून रघुनाथ लांजेवार,राष्ट्रवादीकडून किशोर तरोणे,डव्वा गटातून राष्ट्रवादीकडून गंगाधर परशुरामकर,जीवन लंजे,लिलेश रहागंडाले,काँग्रेसकडून छाया चव्हाण ,राजू पटले,भाजपकडून डॉ.भुमेश्वर पटले,दिनेश हुकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.सालेकसा तालुक्यात आमगाव खुर्दमध्ये भाजपकडून देवराज वळगाये,काँग्रेसकडून योगेश राऊत,राष्ट्रवादीकडून निकेश गावड.पिपरीयामध्ये भाजपकडून अजय वशिष्ट,काँग्रेसकडून ओमप्रकाश लिल्हारे,राष्ट्रवादीकडून दुर्गाबाई तिराले,शिवसेनेकडून कुलतारqसह भाटिया,भाजप बंडखोर राजकुमार दमाहे.झालीया गटातून भाजपकडून शंकर मडावी,राष्ट्रवादीकडून बिसराम चर्जे,काँग्रेसकडून टेकाम.कारुटोला गटातून भाजपकडून अनिता बोहरे,राष्ट्रवादीकडूनही श्रीमती बोहरे व काँग्रेसकडून श्रीमती दोनोडे.आमगाव तालुक्यात रिसामा गटातून भाजपचे हरिहर मानकर,राष्ट्रवादीकडून सुखराम फुंडे,काँगेसकडून टिनू पटेल,ठाणा गटातून भाजपकडून शोभेलाल कटरे,राष्ट्रवादीकडून तुंडीलाल कटरे,काँग्रेसकडून नविन तुरकर,पदमपुर गटातून भाजपकडून श्रीमती कोरे,राष्ट्रवादीकडून कविता रहागंडाले,काँग्रेसकडून उषा मेंढे,अंजोरा गटातून भाजपकडून हनवंत वट्टी,सितेपार गटातून भाजपकडून बाळकृष्ण बिसेन,राँकाकडून राजेश भक्तवर्ती,काँग्रेसकडून डॉ.गणेश हरिणखेडे.पुराडा गटातून भाजपकडून प्रमोद संगीडवार,भर्रेगाव गटातून काँग्रेसकडून माजी सभापती उषा शहारे रिंगणात उतरल्या आहेत.