ग्रामपंचायतींच्या १६०३ जागांसाठी ३८८८ नामांकन

0
11

गोंदिया दि.१५: जिल्ह्यातील १८२ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक येत्या २५ जुलै रोजी होत आहे. त्यासाठी १६०३ प्रभागांसाठी दाखल नामांकनांपैकी एकूण ३८८८ नामांकन वैध ठरले आहेत. सर्वात जास्त नामांकन गोंदिया तालुक्यात आले आहेत.

आमगाव तालुक्यात २३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका आहेत. या ग्रापंचायतींची सदस्य संख्या १९१ असून त्यासाठी ४७५ नामांकन पात्र ठरले आहेत. सालेकसा तालुक्यातील ९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका आहेत. या ग्रापंचायतींची ८१ सदस्य संख्या असून त्यासाठी २०४ नामांकन पात्र ठरले आहेत. देवरी तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका आहेत. तसेच तीन ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका आहेत. या ग्रापंचायतींची २६० सदस्य संख्या असून त्यासाठी ५१९ नामांकन पात्र ठरले आहेत, तर १० नामांकन अर्ज अपात्र ठरले आहे. सडक-अर्जुनी तालुक्यात १९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. या ग्रापंचायतींची सदस्य संख्या १७० असून त्यासाठी ३९४ नामांकन पात्र ठरले आहेत. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील २८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक तर चार ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका आहेत. या ग्रामपंचायतींची २५२ सदस्य संख्या असून त्यासाठी तीन हजार ८८८ नामांकन पात्र ठरले आहेत.

तिरोडा तालुक्यातील १९ ग्रामपंचायतींच्या नियमित तर एका ग्रामपंचायतची पोटनिवडणूक आहे. या ग्रापंचायतींची सदस्य संख्या १५६ असून त्यासाठी ३३९ नामांकन पात्र ठरले आहेत, तर १२ नामांकनपत्र अपात्र ठरले आहे. गोरेगाव तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका आहेत. या ग्रापंचायतींची सदस्य संख्या २३४ असून त्यासाठी ६१६ नामांकन पात्र ठरले आहेत. २१ नामांकनपत्र अपात्र ठरले आहेत.

गोंदिया तालुक्यातील २८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रित निवडणुका तर एका ग्रामपंचायतची पोटनिवडणूक आहे. या ग्रामपंचायतींची सदस्य संख्या २५९ असून त्यासाठी ७४२ नामांकन पात्र ठरले आहेत, नऊ नामांकन अपात्र ठरले आहेत. ग्रामपंचायतच्या एक हजार ६०३ जागांसाठी ३ हजार ८८८ लोक निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आपापल्या पक्षाचे वर्चस्व ग्रामपंचायतवर असावे यासाठी कार्यकर्ते कामाला लागले आहेत.