भंडारामध्ये काँग्रेस अध्यक्ष तर राकाँ उपाध्यक्ष होणार

0
5

भंडारा दि.१५: : कालपर्यंत सत्तेत असलेल्या भाजपला कोणत्याही परिस्थितीत सत्तेत बसू द्यायचे नाही, यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ गोटात मंगळवारला दिवसभर चर्चा झाली. त्यामुळे बुधवारला अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ता स्थापण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.अध्यक्षपदासाठी भाग्यश्री गिलोरकर, प्रणाली ठाकरे, चित्रा सावरबांधे यांच्यापैकी एकाच्या नावावर शिक्कामोर्तब होईल.माजी आमदार सेवक वाघाये हे गिलोरकर यांच्यासाठी तर बंडु सावरबांधे हे चित्रा सावरबांधे यांना अध्यक्ष करण्यासाठी अ़डले आहेत.राष्ट्रवादीकडून नरेश डहारे उपाध्यक्ष पदाचे उमेदवार राहणार आहेत.त्यांच्यानाववर प्रफुल पटेल यांनी शिकामोर्तब केले आहे.
भंडारा जिल्हा परिषदेत काँगे्रस १९, राकाँ १५, भाजप १३, अपक्ष ४, शिवसेना १ असे पक्षीय बलाबल आहे. १९ जागा जिंकून काँग्रेस मोठा पक्ष ठरला असला तरी एकाही पक्षाकडे स्पष्ट बहुमत नाही. त्यामुळे काँग्रेस, राकाँ, भाजप या तीन पक्षांपैकी दोन पक्षांना युती करणे नाईलाज आहे. अधिक संख्याबळाणमुळे काँग्रेसला अध्यक्षपद ठरलेले असले तरी युती कुणाशी करायची? हे पक्षश्रेष्ठीवर अवलंबून आहे.
गोंदिया जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसकडे सर्वाधिक २० जागा आहे. तरीसुद्धा काँग्रेसने अध्यक्षपदावर दावा केल्यामुळे जरतरच्या शक्यतांना बळ आले आहे. गोंदिया जिल्ह्यात काही पंचायत समितीमध्ये काँग्रेसने भाजपची साथ घेतल्यामुळे आता जिल्हा परिषदेत सत्ता स्थापण्यासंदर्भात रस्सीखेच वाढली आहे. त्याचे पडसाद भंडारा जिल्ह्यात उमटण्याची शक्यता लक्षात घेऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी नवनियुक्त सदस्यांना देवदर्शनासाठी रवाना केले.

६ जुलैला जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भंडाऱ्यात अध्यक्षपद काँग्रेसला व राकाँचा उपाध्यक्षपद मिळणार अशी चर्चा होती. मात्र चार दिवसात युती कुणाशी करायचे यावर दावे प्रतिदावे होऊ लागले. बुधवारला नवनियुक्त सदस्य भंडाऱ्यात पोहोचण्यापूर्वी त्यांना मंगळवारच्या दिवसभरात झालेल्या चर्चेचा अंतिम निर्णयसकाळी कळविला जाणार आहे. त्यामुळे उद्या युती नेमकी कुणाशी होईल या चर्चांना पूर्णविराम मिळणार आहे