गोंदियात काँग्रेसचे स्वार्थासाठीचे राजकारण

0
13

गोंदिया-जिल्हा परिषद अस्तित्वात आल्यापासून काँग्रेसच्या इतिहासाकडे बघितल्यास स्थानिक काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्या स्वार्थासाठीच काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्यांचा वापर केल्याचे दिसून येईल.विशेष म्हणजे पहिल्या जिल्हा परिषदेच्यावेळी सुध्दा अध्यक्षपद अॅड के.आर.शेंडे व उपाध्यक्ष पदासाठी डाॅ.योगेंद्र भगत रिंगणात होते.शेंडे निवडून आले मात्र काँग्रेसचे भगत पराभूत होऊन भाजपचे विजय शिवणकर पहिल्या का्यकाळात उपाध्यक्ष बनले होते.त्यांनतर रजनी नागपूरे यांच्या कार्यकाळात महिलासाठी अध्यक्षपद राखीव होते,तेव्हा दावेदार असलेल्या छाया चव्हाण यांच्या पराभवासाठी डव्वा मतदारसंघात त्यावेळी काँग्रेसच्या नेत्यांनी विरोधकांनी रसद पुरविली होती.आता 2015 च्या निवडणुकीकडे बघितल्यास राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असून तीनदा निवडून आलेल्या राजलक्ष्मी तुरकर या अध्यक्षपदी विराजमान दोन्ही काँगेसच्या आघाडीने होऊ शकतात.परंतु येथ ेसुध्दा कमी जागा असताना अद्यक्षपद किंवा एमएलसी जागा मागून राजलक्ष्मीला पदापासून दूर ठेवण्यासाठीच काँग्रेस ही खेळी खेळत असल्याचे स्पष्ट दिसून येते.या सर्व राजकीय परिस्थितीचा विचार केल्यास काँग्रेसने योगेंद्र भगत,छाया चव्हाण यांना आधी डावलून नंतर त्यांना पद देऊन गप्प करण्याचे प्रयत्न केले होते.यावेळी छाया चव्हाण यांनी उमेदवारी मागीतली परंतु नाकारण्यात आली कारण जिंकल्यास श्रीमती चव्हाण अध्यक्षपदासाठी दावेदार होऊ शकत होत्या.परंतु गोंदियाच्या काँग्रेसी नेत्यांना त्यांच्या घरुन जिल्हा परिषद चालविणारे आणि जसे सांगतिल तसे करणारे पदाधिकारी हवे हे आजपर्यतंचा इतिहास जिल्ह्यातील जनता विसरु शकत नाही.आता मात्र राजलक्ष्मी तुरकर यांना दुर करण्यासाठी भाजपच्या रचना गहाणे ना अध्यक्षपद व काँग्रेसकडे उपाध्यक्ष पद स्विकारण्यापर्यत विचार झाल्याचे बोलले जात असून सारासार विचार केल्यास काँग्रेस असो की राष्ट्रवादी पोवार समाजाच्या जिल्हा परिषद सदस्याला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान होण्यापासून राेखण्यासाठीच राजकीय खेळी खेळत असल्याचे सध्याच्या घडामोडीपासून दिसून येत आहे.आज दुपारनंतरच मात्र गोंदिया जिल्हा परिषदेतील राजकारण काय हे स्पष्ट होणार असून काँग्रेसने भाजपशी युती करणे म्हणजे गावपातळीवरील काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी याच्या स्वाभीमानाला धक्का देण्याचे काम सत्तेसाठी करते की राष्ट्रवादीशी आघाडी करते याकडे लक्ष लागले आहे.