कर्जवाजपात जिल्हा बँकेचा आखडता हात

0
5

वडेगाव दि.२५: येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या ५५ नवीन सभासद शेतकर्‍यांना गोंदिया जिल्हा सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँकेने कर्ज देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे येत्या १ ऑगस्टपासून बँकेच्या वडेगाव साखेसमोर शेतकर्‍यांसह उपोषणावर बसण्याचा इशारा संस्थेने दिला आहे.
प्राप्त माहितीनुसार, दरवर्षीप्रमाणे विविध कार्य सेवा सहकारी संस्थेमार्फत नियमित कर्जदार शेतकर्‍यांचे व नवीन सभासद शेतकर्‍यांचे प्रस्ताव संस्थेमार्फत को-ऑप. बँकेकडे पाठविण्यात आले. बँकेने नियमित कर्जदारांना कर्ज दिले, परंतु नवीन सभासद शेतकर्‍यांना मात्र कर्ज देण्यास नकार दिला आहे.शेतात रोवण्याची कामे सुरु झाली असताना अद्याप कर्ज न मिळाल्यामुळे शेतकर्‍यांनी बँकेसमोर उपोषणावर बसण्याचा इशारा दिला आहे. त्यांच्या उपोषणात संस्थेच्या संचालक मंडळाने बँकेविरुद्ध एल्गार पुकारत शेतकर्‍यांसह उपोषणात सामील होण्यास दुजोरा दिला आहे.
विशेष म्हणजे को-ऑप.बँकांची शिखर बँक म्हणून ओळखली जाणारी महाराष्ट्र राज्य बँकेने सर्व को ऑपरेटिव्ह बँकांना पत्रान्वये शेतकर्‍यांना विनाविलंब कर्जवाटपाचे निर्देश दिले असताना जिल्हा को-ऑप. बँक या कामी कुचराई करीत आहे.