31.9 C
Gondiā
Friday, May 16, 2025
Home Blog Page 5654

जि.प.च्या शाळेत लोकशाही प्रक्रियेची हत्या

0

पालकांचा आरोपःकारवाईची मागणी

गोंदिया- देवरी तालुक्यातील मुल्ला येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी समितीबाह्य व्यक्तीची निवड मुख्याध्यापिकेने स्वमर्जीने करून लोकशाही प्रक्रियेची हत्या केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. याविषयीची लेखी तक्रार शिक्षणविभागातील वरिष्ठांकडे करून राजकारण करणाऱ्या मुख्याध्यापिकेवर कडक कारवाईची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, देवरी तालुक्यातील मुल्ला येथील प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिकेने गेल्या १५ सप्टेंबर रोजी शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्य निवडीसाठी पालकसभेचे आयोजन केले होते. यासाठी सर्व पालकांना पालकसभेची नोटीस १२ तारखेला देण्यात आली. त्याप्रमाणे १५ तारखेला पालकांनी सभेच्या माध्यमातून १२ सदस्यांची निवड केली. यावेळी दुसऱ्या चार निमंत्रित सदस्यांची सुद्धा निवड करण्यात आली. या निवडीनंतर समितीच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया घेणे अनिवार्य असताना सदर मुख्याध्यापिकेने पदाधिकाऱ्यांची निवड नंतर करू, असे सांगून सभा समाप्त केली. यानंतर गावातील राजकीय मंडळीच्या सल्ल्याने निवड झालेल्या सदस्यांना अपात्र घोषित करून नवीन कार्यकारिणी तयार करणार असल्याची कुणकूण काही सदस्यांना लागताच त्यांनी देवरीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना याची माहिती दिली. परिणामी, सदर मुख्याध्यापिकेने गेल्या २२ तारखेला तातडीने सभेचे आयोजन केले. या सभेत व्यवस्थापन समितीवर नसलेल्या आणि १५ तारखेच्या सभेत पालकांनी नाकारलेल्या माजी अध्यक्षाला मुख्याध्यापिकेने अध्यक्ष करता येण्यासाठी काही सदस्यांची दिशाभूल करून आणि त्यांचेवर दबाव आणून माजी अध्यक्षांना कायम केले. शाळा चालविण्यासाठी पैशाची गरज पडते, ती गरज तुम्ही पूर्ण करू शकत नाही आणि शालेय कामानिमित्त वारंवार अध्यक्षांना बाहेर जावे लागते, त्यामुळे माजी अध्यक्ष हेच अध्यक्ष राहतील, असा वरूनच आदेश असल्याचे सांगत मुख्याध्यापिकेने नवनियुक्त सदस्यांची दिशाभूल केली. असे करताना काही नवनियुक्त सदस्यांना मुख्याध्यापिकेने स्वतःहून समितीतून बाद केल्याचे सुद्धा सांगण्यात येते.
दरम्यान, संतप्त पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत न धाडण्याचा निर्णय घेत जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणविभागातील वरिष्ठांकडे तक्रार करून शैक्षणिक वातावरण बिघडविणाऱ्या मुख्याध्यापिकेवर कारवाई करण्याची मागणी केली.

चौकशी करून कारवाई करू- गटशिक्षणाधिकारी, देवरी

या प्रकरणी देवरीचे गटशिक्षणाधिकारी किशोर भांडारकर यांना विचारणा केली असता त्यांनी तक्रार मिळाल्याचे सांगितले. एकदा निवड केलेल्या सदस्यांमधूनच पदाधिकाऱ्यांची निवड पहिल्याच दिवशी करणे आवश्यक असल्याचे गटशिक्षणाधिकाऱ्यांनी मान्य करून तक्रारीची शहानिशा करून पुढील कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ऍट्रॉसिटी कायद्यात बदल शक्‍य – रामदास आठवले

0
वृत्तसंस्था मुंबई दि. 23 – राज्यभरात मराठा मोर्चे लाखोंच्या संख्येने निघत असताना ऍट्रॉसिटी कायदा रद्द होणार नाही. मात्र, त्यात आवश्‍यक ते बदल करण्यात येऊ शकतात. त्याबाबत विचार केला जाईल, अशी ग्वाही केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी दिली. आज सह्याद्री अतिथीगृह येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राज्यभरातला मराठा समाज मूक मोर्चाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरला आहे. पहिल्यांदाच मराठा समाजाचे एवढ्या मोठ्या संख्येचे मोर्चे असले तरी या मोर्चामुळे दलित समाजात कोणतीही अस्वस्थता नाही. इतर समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता मराठा आरक्षणाला पाठिंबा असल्याचे आठवले यांनी सांगितले.

दलित आणि मराठा या दोन्ही समाजाला एकमेकांची गरज आहे, असं सांगत या दोन्ही समाजात ऐक्‍य निर्माण करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने सात ऑक्‍टोबरला शिर्डीत दलित मराठा ऐक्‍य परिषदेचं आयोजन करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. प्रत्येक राज्यात विविध समाजाकडून आरक्षणाची मागणी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर या सर्व समाजाला क्रिमिलिअरमध्ये आरक्षण देता येईल यासाठी घटनादुरुस्ती आवश्‍यक असून, त्यादृष्टीने केंद्रात प्रयत्न करणार असल्याचं ते म्हणाले. मराठा समाजाने आरक्षणाबाबत पूर्वीच्या मराठा समाजाच्या मुख्यमंत्र्यांना जाब विचारावा असं आठवले यांनी या पत्रकारपरिषदेत सांगितले.

 

भारत – फ्रान्समध्ये ३६ लढाऊ विमानांसाठी राफेल करार

0
नवी दिल्ली, दि. 23 – भारत आणि फ्रान्समध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून चर्चेत असलेला राफेल करार अखेर झाला आहे. शुक्रवारी दिल्लीत भारत आणि फ्रान्सच्या संरक्षण मंत्र्यांनी राफेल विमानासाठी करार केला. 7.8 बिलियन यूरोमध्ये (भारतीय चलनानुसार 59 हजार कोटी रुपये) हा करार करण्यात आला आहे. या कारारामुळे आगामी पाच वर्षात 36 राफेल विमान भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. या करारामुळे भारतीय हवाई दलाची ताकद अजून वाढली असून यामुळे चीनवर वचक ठेवण्यास फायदा मिळणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फ्रान्स दौ-यावेळी 36 लढाऊ विमाने विकत घेण्याची घोषणा केल्यानंतर 16 महिन्यानंतर हा करार झाला आहे. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर आणि फ्रान्सचे संरक्षणमंत्री ड्रायन यांनी राफेल करारावर सह्या केल्या.

पाच मान्यताप्राप्त राजकीय पक्षांची नोंदणी रद्द

0
मुंबई, दि. 23 –  वारंवार पत्राद्वारे विनंती करून आणि नोटीस बजावूनही वार्षिक विवरणपत्रे व लेखापरीक्षण लेख्याच्या प्रती सादर न केल्यामुळे पाच मान्यताप्राप्त राजकीय पक्षांची नोंदणी राज्य निवडणूक आयोगाने रद्द केली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांना आज येथे दिली.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, जनता दल (सेक्युलर), ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक, राष्ट्रीय जनता दल, ऑल इंडिया युनायटेड डेमॉक्रॅटिक फ्रंट आणि इंडियन युनियन मुस्लिम लीग या पाच इतर राज्यातील मान्यताप्राप्त राज्यस्तरीय पक्षांना 26 ऑगस्ट 2016 रोजी अंतिम नोटीस बजावण्यात आली होती. तत्पूर्वी अनेकदा त्यांना कागदपत्रे सादर करण्याबाबत लेखी विनंतीही करण्यात आली होती; परंतु त्यांनी संबंधित कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे त्यांची राज्य निवडणूक आयोगाकडील नोंदणी आता रद्द करण्यात आली आहे.

धोकादायक ब्रिटिशकालिन इमारतीत विद्यार्थी घेतात शिक्षण!

0

अकोला, दि. 23 – जिल्हा प्रशासन प्रशिक्षण संस्था(डीएड)ची प्रशस्त इमारत ब्रिटिशांनी बांधली असून, या इमारतीला अंदाजे दीडशे वर्ष पूर्ण झाले असून, इमारत ठिकठिकाणी जीर्ण झाली आहे. भिंतींना, छताला तडे गेलेले आहेत. इमारतीचा अर्ध्या भागाची पडझड झाली असून, अर्धी इमारत शाबूत आहे. या शाबूत इमारतीमध्ये डीटीएडचे विद्यार्थी शिक्षण घेतात. जीर्ण आणि पडझड झालेल्या इमारतीमुळे विद्यार्थ्यांसोबतच येथील शिक्षकांचे जीवन धोक्यात आले आहे. नवीन इमारत बांधण्यासंबधीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. इमारत शिकस्त आणि जीण झाली असल्याचे पत्र प्रशासनाला वर्षभरापूर्वीच ब्रिटिशांनी इंग्लंडहून पाठविले. परंतु त्या पत्राची अद्यापपर्यंत प्रशासनाने दखल घेतल्याचे दिसून येत नाही. 

करिनाच्या मृत्यूप्रकरणी संस्थेवर कारवाई करा-कोरेटी

0

देवरी ,दि.23: एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येणार्‍या सडक-अर्जुनी तालुक्यातील कोकणा येथील श्रीकृष्ण अवधूत आदिवासी अनुदानीत आश्रमशाळेतील ४ थ्या वर्गात शिकत असलेली करिना सुकलाल उईके हिचा रविवारी (दि.१८) सकाळी ११ वाजता मृत्यू झाला. तिचा मृत्यू आश्रमशाळेतील कर्मचार्‍यांच्या दुर्लक्षामुळे झाल्याचा आरोप मृत् विद्यार्थिनीचे वडील सुकलाल उईके यांनी केला असून या संबंधात प्रकल्प अधिकारी जितेंद्र चौधरी यांना सोमवारी (दि.१९) निवेदन देऊन योग्य चौकशीची मागणी केली आहे. तर या प्रकरणी संबंधीत आश्रमशाळेच्या व्यवस्थापक मंडळाची चौकशी करून त्वरीत कारवाई करण्याची मागणी जिल्हा काँग्रेसचे महासचिव सहषराम कोरोटी यांनी केली आहे.

गुप्तधनासाठी बाेदराईच्या जंगलात खोदकाम

0

सतिश कोसरकर

नवेगावबांध,दि.23: नवेगावबांध व्याघ्र प्रकल्पाच्या राखीव जंगलात बोदराईनजीक  मंगळवारच्या १0 इसमांना नवेगावबांध वनविभागाच्या गस्ती पथकाने खोदकाम करतांना रंगेहाथ पकडले. या आरोपींनी अनधिकृत राखीव जंगलात प्रवेश करुन गुप्तधन शोधण्याच्या नावावर खोदकाम करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले असले तरी वन्य प्राण्यांची शिकार करण्याचा त्यांचा प्रयत्न होता, की गुप्तधनाचा शोध याचा तपास सुरू आहे.याप्रकरणी वनविभागाने त्या १0 आरोपींना अटक केली. गुरुवारी यापैकी ६ आरोपींची जमानतीवर सुटका झाली तर ४ आरोपींची भंडारा कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
यामध्ये देवदास भिक्षू जनबंधू रा.रामपुरी, निकेश रामचंद्र गजबे रा.भुरसीटोला, करण शालीकराम गजबे रा.पिंडकेपार साकोली, विनोद मनोहर सावसाकडे रा.तर्िी (अड्याळ), किसनराव प्रभाकर टेंभरे रा.हौशंगाबाद (मध्यप्रदेश), मनोजकुमार भीमराव घोरमारे रा.मालेगाव भंडारा, कुंदन मेश्राम, शालीकराम गजबे, ज्ञानेश्‍वर विश्‍वनाथ वैद्य व उमेश गजबे सर्व रा.बिडटोला यांचा समावेश होता. गस्तीपथक तिथे जाऊन धडकले.घनदाट जंगलात हे लोक खड्डा खोदण्याचे काम करीत होते.वनकर्मचार्‍यांना बघून पाच आरोपी पळाले तर पाच आरोपी घटनास्थळावर सापडले. या पाच आरोपींना मंगळवारी अटक करुन बुधवारला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना दोन दिवसांची वनकोठडी मंजूर केली होती. बुधवारला पसार झालेल्या पाच आरोपींना अटक करुन गुरुवारला (दि.२२) पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. या सर्व आरोपींवर शस्त्रांसह वनकायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हे नोंदविण्यात आले. आरोपीतर्फे अँड.मोहन भाजीपाले तर वन विभागातर्फे अँड.राजेश पालीवाल यांनी युक्तीवाद केला.

सांईधाम गर्रा खुर्द में जगन्नाथ रामटेककर के हस्ते सांई पूजा व महाप्रसाद वितरण संपन्न

0

गोंदिया। सांईधाम गर्रा खुर्द में 22 सितंबर गुरूवार को दोपहर 2 बजे युवा सामाजिक कार्यकर्ता व जय अम्बे के संचालक श्री जगन्नाथ रामटेककर के हस्ते सांईबाबा की पूजा अर्चना व महाप्रसाद वितरण संपन्न हुआ। इसके पूर्व निशुल्क स्वास्थ्य जांच शिबिर व निशुल्क दवा का वितरण शिबिर दोपहर 12 से 2 बजे तक संपन्न हुआ।

अतिथीयों का स्वागत संस्था अध्यक्ष एड. वीरेन्द्र जायसवाल ने किया। संचालन हनसलाल हरिणखेडे ने व आभार प्रदर्शन अलीम खान ने किया। निशुल्क स्वास्थ्य जांच शिबिर एवं महाप्रसाद का लाभ लगभग पांच सौ से अधिक सांईभक्तों ने उठाया।

 

चिचेवाडा येथे केंद्र स्तरीय शिक्षण परिषद

0

देवरी- प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील चिचेवाडा केंद्रातील केंद्रस्तरीय शिक्षण परिषद काल गुरुवारी (ता.22) मुरदोली येथे आयोजित करण्यात आली होती.

मुरदोला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित या शिक्षण परिषदेच्या अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख जी.एम. बैस हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच हंसराज हुकरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जागेश्वर तवाडे, शिक्षण विस्तार अधिकारी साकुरे, विस्तार अधिकारी येटरे ,श्री दिघोरे, गटसमन्वयक लोकनाथ तितराम, विषयतज्ज्ञ धनवंत कावळे,संजय मस्के, शंकर वलथरे आदी मान्यवर उपस्थित होते. या परिषदेत अप्रगत मुलांना प्रगत कसे करावे या बाबतीत उपस्थित शिक्षकांना मान्यवर वक्त्यांनी मार्गदर्शन  केले. विषयतज्ज्ञ धनवंत कावळे यांनी गणित संबोधाची परिणामकारकता कशा प्रकारे टिकवुन ठेवता येईल व अप्रगत विद्यार्थ्यांसाठी वापर करता येईल याविषयी सखोल मार्गदर्शन केले.

या परिषदेतला चिचेवाडा केंद्रातील 16 शासकीय व 2 खासगी शाळेतील शिक्षकांनी हजेरी लावली.

 

युद्धाच्या ढगांनीच पाकचा बाजार गडगडला

0

इस्लामाबाद(यूएनआय) – इस्लामाबाद – उरीमधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत- पाकिस्तानवर हल्ला करण्याची शक्‍यता असून, पाकिस्तान त्या हल्ल्याचा सामना करण्याची तयारी करत आहे, या अफवांनी काल (ता. 21) पाकिस्तानचा शेअर बाजार गडगडला. पाकिस्तानचा काही हवाई भाग प्रवासी वाहनांसाठी बंद करणे आणि पाकिस्तान हवाई दलाच्या लढाऊ विमानांची उड्डाणे यामुळे ही अफवा पसरली होती. 
दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला असतानाच पाकिस्तानच्या हवाई दलाचा युद्धसराव असल्याने ही घटना घडल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यातच लढाऊ विमानांच्या उड्डाणांवर सोशल मीडिया आणि पाकिस्तानच्या वृत्तवाहिन्यांमध्येही चर्चा सुरू झाल्याने जणू युद्धच होणार, असे वातावरण निर्माण झाले. हा गोंधळ सुरू असतानाही पाकिस्तान सरकारने तातडीने या गोष्टीचा खुलासा केला नाही. त्यामुळे अफवा वेगाने पसरल्या. शिवाय, सरावासाठी म्हणून पाकिस्तानने हवाई हद्द बंद केल्याने माध्यमांवरील चर्चेला जोर आला. त्यामुळे छोट्या गुंतवणूकदारांमध्ये घबराहट पसरल्याचा परिणाम होऊन कराची स्टॉक एक्‍स्चेंजचा निर्देशांक 569 अंकांनी कोसळला.