34.8 C
Gondiā
Thursday, May 15, 2025
Home Blog Page 5658

पशुतस्करांचा पोलीसावर हल्ला,१२ आरोपी ताब्यात

0

महेश येळे रावणवाडी(गोंदिया),berartimes.comदि.२०-गोंदिया जिल्ह्यातील रावणवाडी पोलीस ठाणेर्तंगत येत असलेल्या चंगेरा येथील जनावर तस्करांनी उपविभागीय पोलीस व रावणवाडी पोलीसांच्या गाडीवर हल्ला करीत दगडबाजी केल्याने एक पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची घटना मंगळवारच्या पहाटे ३ वाजेच्या दरम्यान घडली.पोलीसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी आणि रावणवाडीचे पोलीस निरिक्षक हे चंगेरा येथे जनावरे घेऊन जाणाèया ट्रकला पकडण्यासाठी गेले होते.दरम्यान पोलीस आल्याची भनक लागताच तस्करांनी वाहनावर दगडफेकण्यास सुरवात केली.यात रावणवाडी पोलीसांच्या वाहनाची तोडफोड झाली.तरीही पोलीसांनी न भिता कारवाई करीत ३ ट्रमधील ४६ जनावरांना मुक्त करीत ट्रक ताब्यात घेतले.तसेच रात्रीला गस्त घालून १२ लोकांना ताब्यात घेतले आहे.

चुकीच्या धोरणामुळे विद्याथ्र्यांचे भविष्य अंधारात-प्राचार्य तायवाडे

0

नागपूर,दि.२० – बीएड, बीपीएड, एलएलबी, बीफॉर्म, एमबीए आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्यस्तरीय सेलच्या माध्यमातून परीक्षेची जाहिरात निवडक वृत्तपत्रांमधूनच देण्यात आली. त्यामुळे परीक्षेसंदर्भातील माहिती अनेक विद्याथ्र्यांपर्यंतच पोहोचू शकली नाही. शासनाच्या या चुकीच्या धोरणामुळे ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थी परीक्षा देण्यापासून वंचित राहिल्याचा आरोप प्राचार्य बबनराव तायवाडे यांनी पत्रकार परिषदेत केला.
ही प्रक्रिया ऑनलाइन असल्यामुळे अनेकांना याची माहिती मिळाली नाही. वंचित राहिलेले विद्यार्थी खासगी असोसिएशनची सीईटी देऊन किंवा शासकीय प्रक्रियेद्वारे रिक्त जागेवर महाविद्यालयस्तरावर पुन्हा संधी देऊन या अभ्यासक्रमांना संधी देत होते. मात्र, शासनाचे यंदापासून खासगी सीईटी संपूर्णत: बंद केली आहे. त्यामुळे प्रवेशासाठी काहीच विद्यार्थी परीक्षेला बसले. प्रवेशासाठी असलेली प्रथम फेरी ऑगस्ट महिन्यात सुरू झाली, तर आज अंतिम टप्प्यात आहे. एकीकडे राज्यातील शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये हजारो जागा रिक्त आहेत. दुसरीकडे, विद्यार्थी प्रवेश घेण्यासाठी इच्छुक आहेत. परंतु, शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे हजारो विद्यार्थी वंचित राहिले. विद्याथ्र्यांचे कुठल्याही प्रकारचे नुकसान होऊ नये, म्हणून संविधान चौकात गुरुवारी (ता. २२) साखळी उपोषण करण्यात येईल. या प्रकरणाची दखल न घेतल्यास उपोषण करण्यात येणार असल्याचे तायवाडे यांनी सांगीतले. राज्यातील शासकीय, अनुदानित व विनाअनुदानित अशा सर्व प्रकारच्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश क्षमतेच्या केवळ पंधरा टक्के प्रवेश झाले आहेत. अशा परिस्थितीत वीस-पंचवीस वर्षांपासून नोकरी करणाèया प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी यांच्या उपासमारीची पाळी येऊ शकते. त्याचप्रमाणे विद्यार्थी आणि वर्कलोड नसेल, तर शासकीय व अनुदानित महाविद्यालयांमधील प्राध्यापक अतिरिक्त ठरतील आणि नो-वर्क, नो-पे म्हणून त्यांचे नुकसान होईल.

ओबीसी विद्यार्थांनी हक्कासाठी लढा द्यायला सज्ज व्हावे

0

सालेकसा,दि.२०:गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समिती,ओबीसी सेवा संंघाच्यावतीने १७ सप्टेंबर रोजी जी.के.ज्युनीयर कॉलेज कावराबांध येथे ओबीसी विद्यार्थांसाठी ओबीसींचे आरक्षण,शिष्यवृत्ती आणि अधिकार या विषयावर कार्यशाळेचे करण्यात आले होते.यावेळी कावराबांध परिसरातील तीन कनिष्ट महाविद्यालयातील सुमारे २०० च्यावर ओबीसी विद्यार्थांनी कार्यशाळेला उपस्थिती दर्शवून ओबीसींच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला.त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना विद्यार्थांनी आपल्या सवैधानिक हक्कासाठी आणि शिष्यवृत्तीसह आरक्षणासाठी लढा देण्यास सज्ज राहावे असे आवाहन डॉ.गुरुदास येडेवार यांनी केले.आज आपल्या खेड्यापाड्यातील ओबीसी बहुजन शेतकरी वर्गाची परिस्थितीत हलाखीची झाली असून शेतीच्या उत्पन्नातून मुलाबाळांना चांगले शिक्षण देता येणे कठीण झाले आहे.त्यामुळे आपल्याला शिक्षण घेण्यासाठी सविधानाने दिलेल्या आरक्षणाचा आणि शिष्यवृत्तीचा लाभ घ्यावयाचे असेल तर त्यासाठी संघर्ष करण्याची क्षमता निर्माण करणे काळाची गरज असल्याचे विचार डॉ.येडेवार यांनी व्यक्त केले.
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा.बी.एम.करमरकर होते.तर प्रमुख मार्गदर्शक म्हणूून संघटक डॉ.गुरुदास येडेवार,ओबीसी संघर्ष कृती समितीचे जिल्हाध्यक्ष बबलू कटरे,सयोजंक खेमेंद्र कटरे,ओबीसी सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष सावन कटरे,ओबीसी संघर्ष कृती समितीचे संघटक कैलास भेलावे,हरिष ब्राम्हणकर,प्राचार्य मच्छिरके यांच्यासह इतर शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.यावेळी बोलतांना सावन कटरे यांनी पेरीयर रामास्वामी यांच्या जंयतीचे औचित्य साधून ही कार्यशाळा घेण्यात आली असून आपणापर्यंत सविधानात आपल्यासाठी काय काय आहे हे पोचू न शकल्याने मनुवाद्याच्या दुषित प्रचाराला बळी पडून आपण आपल्याच एससी,एसटी बांधवाबद्दल गैरसमज निर्माण करुन बसल्याचे सांगत ते आपले बंधू आपण ओबीसी एससी एसटी असा ८५ टक्के समाज हा एकच असल्याचे लक्षात आणून दिले.आपल्याला लोकसंख्येच्या आधारावर आरक्षणाची तरतूद असताना फक्त २७ टक्के आरक्षण दिले गेले.त्यातही पुर्ण पदे भरली गेली नाही.आमच्या आरक्षणाच्या जागेवर उच्चवर्णीयांनी कब्जा करुन ओबीसींच्या मुलांना आयएएस,आयपीएस होण्यापासून वंचित केल्याचा आरोपही त्यांनी केला.यावेळी बबलू कटरे यांनी घटनेच्या ३४० वी कलमाची माहिती देतांना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना लिहितांना ओबीसी समाजाला सर्वात आधी आरक्षणासह सर्व सोयी सवलती मिळाव्या यासाठी तरतुद केल्याचे सांगत ती माहिती आपल्यापर्यंत न पोचल्याने आपण बाबासाहेबाना चुकीचे समजून बसलो आणि ६५ वर्ष विकासापासून मागे राहिल्याचे सांगितले.बाबासाहेबाबद्दल आपल्या समाजात विषमतेचे ज्वर काही मनुवादी संघटनानी पेरुन ओबीसी विद्याथ्र्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र एका संघटनेच्या माध्यमातून चालविले आहे,तेव्हा आपण ओबीसी विद्याथ्र्यांनी खर काय आहे हे सत्यता जाणूनच निर्णय घेण्याची वेळ आल्याचे सांगितले.तत्कालीन पंतप्रधान व्ही.पी.सींग यांनी फक्त मंडल आयोगाची एक अट लागू करताच आपला ओबीसी समाज एवढा जागृत आणि शिक्षित झाला आहे.जर संपुर्ण मंडल आयोगच लागू झाला तर आपला ओबीसी विकासाच्या मुख्य प्रवाहात येऊ शकतो त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे विचार व्यक्त केले.यावेळी खेमेंद्र कटरे यांनी नॉन क्रिमिलीयरची ओबीसीवर लादलेली अट ही असैवधानिक असून ती रद्द करण्यासाठी त्याचप्रमाणे भारत सरकारची मिळणारी १०० टक्के मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती जी राज्यसरकार ५० टक्के देत आहे,ती १०० टक्के मिळाली पाहिजे तसेच ओबीसींच्या विकासासाठी ओबीसींचे स्वतंत्र मंत्रालयाची गरज असल्याचे विचार व्यक्त केले.कार्यशाळेच्या अध्यक्षीय भाषणात प्रा.करमरकर यांनी ओबीसीनी आत्ता आपल्या हक्कासाठी लढण्याची वेळ आली असून आज जर आपण जागे झालो नाही तर भविष्यात आपला समाज काही मनुवादी संघटना गारद करुन आपल्याला फक्त मोलमजुरी करण्यासाठी तयार आमच्या हक्काच्या पदावर उच्चवर्णीय बसतील हे लक्षात ठेवत आपल्या हक्कासाठी येत्या ८ डिसेबंरला आयोजित नागपूरच्या मोच्र्यात मोठ्या संख्येने विद्यार्थांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले.यावेळी परीसरातील ओबीसी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आयोजनासाठी ओ.एस.गुप्ता,जे.एस.बागडे,ह.भू.पटले,आय.टी.निनावे,ललीत बनोटे व महेंद्र उके यांनी सहकार्य केले.

धानोरा तालुक्यात आढळले नक्षली बॅनर

0

धानोरा (गडचिरोली) : तालुक्यातील मुरूमगाव, बेलगाव व सावरगाव परिसरात सोमवार, १९ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास नक्षली मजकूर नमूद असलेले बॅनर आढळून आले. मुरूमगाव, बेलगाव व सावरगाव हा परिसर नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील आहे. या परिसरात आढळून आलेल्या बॅनरमध्ये २१ ते २७ सप्टेंबरदरम्यान पार्टीचा १२वा वर्धापनदिन सप्ताह साजरा करा, आदिवासी, दलित, महिला व अल्पसंख्याकांच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करून व्यापक जनआंदोलन उभारा, अशा आशयाचा मजकूर नमूद आहे. सदर बॅनरमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे

२२0 केव्हीच्या सबस्टेशनला भीषण आग

0

वर्धा,दि.20 : महावितरणच्या बोरगाव (मेघे) येथील २२0 बाय ६६ केव्ही सबस्टेनधील दोनपैकी एका मोठय़ा ट्रान्सफॉर्मरला सोमवारी दुपारी अचानक आग लागली. या आगीमुळे वर्धेसह यवतमाळ जिल्ह्यातील विद्युत पुरवठा प्रभावित झाला आहे. आगीचे नेमके कारण कळू शकले नसले तरी ट्रान्सफॉर्मर क्षमतेपेक्षा अधिक गरम झाल्याने आग लागल्याची शक्यता वर्तविली जात आहे. आग विझविण्याकरिता सायंकाळपर्यंत शर्थीचे प्रयत्न सुरूच होते.
वर्धा शहरालगत बोरगाव (मेघे) येथे महावितरणचे २२0 केव्हीचे सबस्टेशन आहे. कोराडी येथून येणारी वीज थेट याच केंद्रावर येत असल्याची माहिती महावितरणने दिली. या सबस्टेशनवरून वर्धासह यवतमाळ जिल्ह्यात वीज पुरवठा करण्यात येतो. केंद्रावर असलेल्या दोन मोठय़ा ट्रान्सफॉर्मरपैकी एक ट्रान्सफॉर्मर जळाला. यामुळे वर्धा जिल्ह्यातील पुलगाव, देवळी, वायगाव (निपाणी), भूगाव, सेलू यासह यवतमाळ जिल्ह्यात रात्रभर काळोख राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
आगीची माहिती मिळताच महावितरणच्या कार्यालयात एकच धावपळ सुरू झाली. सर्वच अधिकारी सबस्टेशनवर पोहोचले. या आगीवर नियंत्रण मिळविण्याकरिता वर्धा नगर परिषद, भूगाव येथील लॉयड्स स्टील कंपनीतील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. भडकलेल्या ट्रान्सफॉर्मरवर पाण्याचा मारा करूनही आग आटोक्यात येत नसल्याचे दिसून आले. या ट्रान्सफॉर्मरमध्ये असलेल्या ऑईलला लागलेली आग भडकतच होती. अखेर आगीवर नियंत्रण मिळविण्याकरिता भूगाव येथील फोम असलेल्या अग्निशमन यंत्राचा वापर करण्यात आला. यामुळे सायंकाळी आगीवर ताबा मिळविण्यात यश आले.

मोतेंच्या आंदोलनापुढे सरकार झुकले;पण 100 टक्के निकालाची अट लादली

0

मुंबई,दि.20- विनाअनुदानित शाळातील शिक्षकांच्या वेतनासाठी मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानंतर शालेय शिक्षण विभागातील उच्चस्तरीय अधिकारी मंत्र्यांचे ऐकत नसल्याने कोकण विभागातील शिक्षक आमदार रामनाथ मोते यांना सोमवारी शिक्षण सचिवांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करून आपला संताप व्यक्त करावा लागला. मोते यांच्या आंदोलनामुळे खडबडून जागे झालेल्या शिक्षण विभागातील अधिका-यांनी पाच तासांच्या आत शिक्षकांच्या वेतनाचा जीआर काढून मोते यांना सुपूर्द केला. या निमित्ताने या सरकारच्या निर्णयालाही अधिकारी गुमानत नसल्याचे स्पष्ट झाले असून दुसरीकडे या जीआरसाठी करण्यात आलेल्या आंदोलनामुळे सरकारची पुरती नाचक्की झाल्याचे सोमवारी मंत्रालयात दिसून आले.दरम्यान, सदर शासन निर्णयामध्ये अनुदान देतांना शैक्षणिक गुणवत्तेच्या संदर्भात व १०० टक्के निकालाची टाकलेली अट अन्यायकारक असून शाळांना वेतन अनुदानापासून वंचित ठेवणारी आहे या व अन्य काही जाचक अटींच्या संदर्भात आपण आक्षेप नोंदविला आहे. हा निर्णय आता निघाल्याने सरकारची भूमिका आपल्या निदर्शनास आली आहे. यासाठी आपल्याला पुन्हा संघर्ष करावा लागेल व तो आम्ही करू असा इशारा आमदार रामनाथ मोते यांनी यावेळी दिला.

राज्यात सुरू असलेल्या व मुल्यांकनास पात्र ठरलेल्या विनाअनुदानितच्या प्राथमिक, माध्यमिकच्या शाळांना सरसकट २० टक्के अनुदान देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ३० ऑगस्ट रोजी घेण्यात आला होता. या निर्णयामुळे राज्यातील १ हजार ६२८ शाळांतील १९ हजार २४७ शिक्षक आणि शिक्षकेतरांना वेतन मिळणार होते, मात्र निर्णय झाल्यानंतर आत्तापर्यंत त्यासाठीचा जीआर काढण्यासाठी शिक्षण विभागातील अधिकारी चालढकलपणा करत असल्याचे दिसून आल्याने याविषयी राज्यातील शिक्षकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाला वेळोवेळी विचारणा करूनही त्यावर निर्णय होत नसल्याने शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी सोमवारी थेट मंत्रालय गाठून शिक्षण सचिवांच्या दालनासमोरच ठिय्या आंदोनल सुरू केले. यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारेसह अनेक शिक्षकही सहभागी झाले होते. ‘जीआर काढा अन्यथा आपण इथून उठणार नाही, त्यासाठी प्राणांतक उपोषणही करू’ असा सज्जड इशारा मोते यांनी अधिका-यांसह सरकारला दिला. त्यामुळे सरकारची आणि आपलीही होत असलेली नाचक्की लक्षात घेऊन पाच तासांच्या आतच जीआर तयार करून शिक्षण विभागाच्या उपसचिव सुवर्णा खरात, रा. ग. गुंजाळ यांनी मोते यांच्या हाती सोपवला. यामुळे सकाळी ११ वाजता सुरू झालेले मोते यांचे आंदोलन दुपारी ३ वाजता जीआर हाती आल्यास सुटले. या जीआरमुळे राज्यातील हजारो शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून मोते यांनी केलेल्या धाडसी आंदोलनाचे राज्यभरातून शिक्षकांकडून स्वागत करण्यात येत आहे. तर शिक्षक आमदार हा असाच असला पाहिजे अशा प्रकारच्या प्रतिक्रियाही जीआरच्या निर्णयावरून उमटल्या आहेत.

 

या जीआरमध्ये टाकण्यात आलेल्या जाचक अटीत शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी नववी आणि दहावीचा निकाल १०० टक्के आवश्यक असल्याचे सांगण्यात आल्याने त्यावर कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत रेडीज यांनीही आक्षेप घेतला आहे. याविरोधात आपण आक्रमक भूमिका घेणार असल्याचे रेडीज म्हणाले.

विदर्भाचा लढा तीव्र करावा लागेल-राम येवले

0

तिरोडा,दि.20 : १९0५ पासून स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी असून त्यासाठी लढा सुरू आहे. २८ सप्टेंबर १९५३ ला विदर्भाला जनतेची सम्मती न घेता जबरन महाराष्ट्रात सामील केले. तेव्हापासून वैदर्भीय जनतेवर अन्याय सुरू आहे. यामुळे आता विदर्भाचा लढा तिव्र करावा लागणार असल्याचे प्रतिपादन विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य निमंत्रक राम येवले यांनी केले.
जवळील ग्राम कवलेवाडा येथील विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या जाहीर सभेत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. पुढे बोलताना येवले यांनी, नागपूर करारानुसार २३ टक्के नोकरी विदर्भातील युवकांना द्यायची होती. फक्त आठ टक्के दिल्याने चार लाख नोकर्‍यांचा बॅकलॉग विदर्भात तयार झाला व बेरोजगारी वाढली. भारनियमन विदर्भात, वीज तयार होते विदर्भात व ३४ टक्के गळतीही विदर्भात, ६३00 मेगावॉट वीज तयार होऊनही विदर्भाला फक्त २२00 मेगावॉट दिली जाते. विदर्भाला विजेची गरज नसतानाही १३२ वीज प्रकल्प आणून ८६ हजार ४0७ मेगावॉट वीज तयार करून दिल्ली व मुंबई इंडस्ट्रीयल कॉरीडोर करिता पुरवठा केला जाणार. यासाठी एक लाख एकर सुपीक जमीन प्रकल्पाला जाईल. ९0 हजार एकर टॉवरलाईनमुळे शेतीचे उत्पादन घटणार व उष्णतामान वाढणार आहे. संपूर्ण विदर्भ कँसर, टिबी व ह्दयरोगाने ग्रस्त होणार. शेतीमालाला भाव मिलत नसल्याने कर्जापोटी ३६ हजार पेक्षा जास्त शेतकर्‍यांनी आत्महत्या केली. वीज नाही, पाणी नाही, शेतीपर्यंत रस्ते नसल्याचे सांगीतले.
अशात वेगळे झालो तर १00 टक्के नोकर्‍या विदर्भाच्याच तरूणांना मिळणार. गडकरी व फडणवीस यांनी निवडणुकीच्या वेळी आश्‍वासन दिले. जनतेने शिक्ला मारताच सत्तेत आल्यावर त्यांना भान राहिले नाही. यासाठी विदर्भातील जनतेने ३ व ४ ऑक्टोबर ला तिव्र आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी माजी आमदार दिलीप बंसोड, आनंद वंजारी, जिल्हाध्यक्ष टी.बी.कटरे, अर्चना नंदघळे, अँड. पराग तिवारी, अँड.हेमलता पतेह, अँड. माधुरी रहांगडाले, सुरेश धुर्वे, शामराव झरारिया, कृष्णकुमार दुबे, मोसीन खान, योगेश अग्रवाल, सरपंच देवल पारधी, ईश्‍वर रहांगडाले यांनीही मार्गदर्शन केले.
प्रास्तावीक जिल्हाध्यक्ष कटरे यांनी मांडले. संचालन हुपराज जमईवार यांनी केले. आभार शामराव झरारिया यांनी मानले. कार्यक्रमासाठी संजय मेश्राम, मनोज तुरकाने, मंदाकिनी गाडवे, सरिता चव्हाण, पुरनलाल भैरम, क्रांतीकुमार सावळे, सोनू पारधी आदिंनी सहकार्य केले.

बिहारमध्ये बस अपघातात 35 जणांचा मृत्यू

0

पाटणा, दि. १९ – मधुबनी जिल्ह्यातील बसैथ गावाजवळ बस तलावात कोसळून झालेल्या अपघातात 35 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, खासगी प्रवासी बसमधून 50 जण प्रवास करत होते. बसैथ गावाजवळ असलेल्या सुंदर कुंडामध्ये दुपारी साडेबाराच्या सुमारास बस कोसळली. यावेळी झालेल्या अपघातात 35 जणांचा मृत्यू झाला. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

एक सायकल स्वार आपला मार्ग सोडून बस समोर आला. त्याला वाचविण्याच्या नादात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले.

गोंदियाचे नवे जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे

0

गोंदिया,दि.19-गोंदियाचे जिल्हाधिकारी डाॅ.विजय सुर्यवंशी यांची नवी दिल्ली येथे केंद्रीय सरक्षणराज्यमंत्री यांचे खासगी सचिव म्हणून बदली झाल्याने त्यांच्या रिक्त जागेवर नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांची बदली करण्यात आली आहे.काळे यांना तत्काळ कार्यमुक्त होऊन गोंदिया जिल्हाधिकारी पदाची सुत्रे स्विकारण्याचे आदेश देण्यात आले आहेत.तर नांदेडच्या मु्ख्य कार्यकारीअधिकारी पदावर ए.ए.शिनगारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

अकोल्यात मराठा मोर्चाला मोठा प्रतिसाद

0

अकोला  berartimes.com दि. १९ –– कोपर्डीप्रकरणाचा निषेध, अॅट्रासिटीमधील बदल आणि मराठा समाजाला आरक्षण या प्रमुख मागण्यांसाठी अकोला शहरात आज (सोमवार) निघालेल्या सकल मराठा मूक क्रांती मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाला. अत्यंत शिस्तबद्धपद्धतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले. कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशी देण्यात यावी, अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर थांबवावा, मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागण्यांसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने आज जालना, लातूर आणि अकोला शहरात मूकमोर्चेे काढण्‍यात आले. लाखो मराठा बांधव या मोर्चात सहभागी झाले होते. संयोजकांनी दिलेल्‍या आकडेवारीनुसार, तीन शहरांमध्‍ये सुमारे 49 लाख मराठा बांधव एकवटले होते. तर, पोलिस म्‍हणतात तीन्‍ही शहरात 22 लाख मराठा बांधव एकत्र आले होते. लातूर, जालना आणि अकोला या तिन्‍ही मोर्चांचा समारोप झाला आहे.

मोर्चातून मागण्‍या..
– कोपर्डी प्रकरणातील आरोपींना तत्काळ फाशी देण्यात यावी.
– अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर थांबवून योग्य तो बदल करण्यात यावा.
– मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे.
– शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी.
– स्वामिनाथन आयोगाच्या सर्व शिफारशी लागू कराव्यात.