34 C
Gondiā
Thursday, May 15, 2025
Home Blog Page 5669

अधिकार को लेकर आदिवासी विद्यार्थियों का आंदोलन

0

छात्रावास मे विद्यार्थियों से शैक्षणिक खिलवाड़
berartimes.com,गोंदिया –एकात्मिक आदिवासी विभाग की ओर से गोंदिया में छात्र-छात्राओं की ४ छात्रावास शुरू है। लेकिन इन छात्रावासों में शिक्षा का पाठ पढऩेवाले आदिवासी विद्यार्थियों के साथ शासन के अधिकारी ही अधिकार छिनकर शैक्षणिक खिलवाड़ कर रहे हैं। अपना हक पाने के लिए आदिवासी विद्यार्थियों ने ९ सितंबर को विभिन्न मांगों को लेकर छात्रावास क्रमांक २ के सामने ही ठिय्या आंदोलन शुरू कर दिया है। मांग है कि जब तक प्रकल्प अधिकारी आंदोलन स्थल पर नहीं आते एवं समस्या नहीं सुलझाते तब तक आंदोलन जारी रहेगा। इस तरह की भूमिका छात्रों द्वारा अपनाने से प्रशासन भी सख्ते में आ गया है। आंदोलन में सैकड़ों की संख्या में छात्र-छात्राएं शामिल थे। 

यह बता दें कि एकात्मिक आदिवासी प्रकल्प देवरी के नियंत्रण में गोंदिया में ४ छात्र-छात्राओं के छात्रावास चलाए जा रहे हैं। लेकिन भौतिक सुविधा उपलब्ध नहीं होने से विद्यार्थी मानसिक, शारीरिक रूप से परेशान हो गए हैं। बताया गया है कि छात्रावास क्रमांक २ में ८० छात्रों की क्षमता है। शैक्षणिक  सत्र शुरू होने के बावजूद भी विद्यार्थियों को छात्रावास में प्रवेश नहीं दिया गया है। ८० छात्रों के लिए ६ कमरे तथा एक ही शौचालय एवं स्नानगृह है। मजबुरन उन्हें खुले में शौच एवं स्नान के लिए जाना पड़ रहा है। विद्यार्थी अधिक और सुविधा कम होने से फर्श पर ही विद्यार्थियों को सोना पड़ रहा है। सफाई का अभाव होने से पुरा छात्रावास का वातावरण दुर्गंधयुक्त बन गया है। जिससे छात्रों का स्वास्थ्य खतरे में आ गया है। शैक्षणिक सत्र शुरू होने को २ माह बित चुके हैं लेकिन अभी तक प्रशासन ने शैक्षणिक सामग्री वितरित नहीं की है। जिससे उनका शैक्षणिक नुकसान हो रहा है। छात्रावास के गृहपाल तथा सफाई कर्मचारी द्वारा असभ्य व्यवहार कर मानसिक यातनाएं दी जा रही है। इसलिए गृहपाल एवं सफाई कर्मचारी का स्थानांतरण करें, इमारत छोटी होने से नई इमारत में छात्रों का छात्रावास शुरू करें, प्रतिक्षित सूची में शामिल विद्यार्थियों को प्रवेश नहीं दिए जाने से उन पर शिक्षा से वंचित रहने की बारी आ चुकी है। इस संदर्भ में अनेकों बार विद्यार्थियों द्वारा वरिष्ठ अधिकारियों को अवगत कराया गया। लेकिन इस ओर वे ध्यान देने की बजाय समस्या को बढ़ाने का कार्य कर रहे हैं। आखिरकार परेशान होकर ९ सितंबर से छात्रावास क्रमांक २ के सामने चारो छात्रावास के छात्र-छात्राओं ने अपनी विभिन्न मांगों को लेकर ठिय्या आंदोलन शुरू कर दिया है। जिससे प्रशासन सख्ते में आ गया है। 


८० विद्यार्थी बाथरूम एक
आदिवासी विद्यार्थियों के कितना खिलवाड़ किया जाता है। इसका प्रत्यक्ष उदाहरण देखा जाए तो छात्रावास क्रमांक २ में जाकर देखा जा सकता है। २ मंजली इमारत में स्थित ६ कमरे एवं २ हॉल में ८० विद्यार्थी निवास करते हैं। इन ८० विद्यार्थियों के लिए सिर्फ १ ही शौचालय एवं स्नानगृह है। इसका उपयोग करने में कठिनाई होने से छात्र रात ३ बजे से ही जाग जाते हैं। इस तरह की गंभीर समस्या का सामना यहां के विद्यार्थियों को करना पड़ रहा है। 


समस्या को सुलझाएंगे
आंदोलन की जानकारी मिलते ही आंदोलन स्थल पर अधिकारी को लेकर पहुंचे। उनकी समस्या से अवगत होकर ध्यान में आया कि समस्या गंभीर है। उपरोक्त समस्या जल्द ही सुलझाने का प्रयास किया जाएगा। जिसकी जानकारी प्रकल्प अधिकारी को प्रेषित की गई है। वहीं १५ सितंबर तक छात्रावासों में विद्यार्थियों को प्रवेश देने की प्रक्रिया पूरी की जाएगी। 
पी.एम. खंडारे, सहायक प्रकल्प अधिकारी, देवरी

कृषीसेवक सरळ सेवा पदभरती परीक्षेच्या निकालात घोळ

0

सीआयडी चौकशी करण्याची काँग्रेसची मागणी


भंडारा, (दि.१०) -कृषीसेवक सरळ सेवा पदभरती परीक्षेच्या निकालात राज्यातील सर्वच विभागात मोठ्याप्रमाणात घोळ झाल्याचे लक्षात येते. त्याचप्रमाणे भंडारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांवर सुद्धा अन्याय झाल्याचे लक्षात येते. राज्यात कृषी सेवकांच्या ७३० पदांसाठी परीक्षा ६ ऑगस्ट २०१६ रोजी घेण्यात आली. सदर परीक्षेत ६५ हजारावर विद्यार्थ्यांनी  दाखल केले होते. त्यापैकी ५७ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली या परीक्षेचा निकाल ६ सप्टेंबर २०१६ रोजी जाहीर करण्यात आला.
परंतु, सदर निवड प्रक्रियेमध्ये पुढीलप्रमाणे घोळ आढळून आलेत. विशाल उखा पाटील (अर्ज क्रमांक १३६६४, बैठक क्रमांक ५१२७१४६३९६) हा विद्यार्थी औरंगाबाद विभागातून OBC प्रवर्गातून १८२ गुण प्राप्त करीत ह्याची निवड ओपन जनरल – १३ मध्ये झाली. हाच विद्यार्थी ठाणे विभागातुन (अर्ज क्रमांक ४८१७, बैठक क्रमांक १५२११०९०२०) OBC प्रवर्गातून १८२ गुण प्राप्त करीत ह्याची निवड ओपन जनरल – ९ मध्ये झाली.  पुणे विभागातून हरीश कैलास देवरे व नरेश कैलास देवरे  भाऊ उत्तीर्ण झाले. या दोन्ही भावांना १८३ गुण प्राप्त झाले. विशेष म्हणजे या दोन भावांच्या वयात केवळ ६ महिन्याचे अंतर आहे. औरंगाबाद विभागात प्रथम क्रमांकाच्या विद्यार्थ्याला १८७ गुण त्याखालोखाल १८४ गुण प्राप्त केलेले पाच विद्यार्थी, १८३ गुण प्राप्त केलेले सहा विद्यार्थी,१८२ गुण प्राप्त केलेले तीन विद्यार्थी व त्यानंतर थेट १३७ गुण प्राप्त केलेला परीक्षार्थी. कोल्हापूर विभागात प्रथम क्रमांकाच्या विद्यार्थ्याला १८२ गुण त्याखालोखाल १८१ गुण प्राप्त केलेले चार विद्यार्थी व त्यानंतर थेट १५० गुण प्राप्त केलेला परीक्षार्थी.
अमरावती विभागात सर्वसाधारण गटात फक्त १२४ गुणांवर प्रथम क्रमांकाचा विद्यार्थी आहे. नागपूर विभागात १६५ ते १८२ गुणांच्या दरम्यान १६ मुले आहेत व १४८ ते १६२ गुणांच्या दरम्यान एकही उमेदवार नाही व नंतर थेट १४८ गुणांच्या खाली इतर परीक्षार्थी आहेत. मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादीतील गुणांमध्ये मोठी तफावत आहे. निवड यादीत ओपन प्रवर्गातील पुरुष निवड यादी ९२ गुणांवर तसेच महिला निवड यादी ९१ गुणांवर झाली. यांच्या तुलनेत OBC महिला यादी ११३ व OBC पुरुष यादी १२९ गुणांवर अंतिम निवड करण्यात आली. OBC उमेदवारांना जास्त गुण असूनसुद्धा डावलण्यात आल्याचे स्पष्ट होते व ओपन प्रवर्गातील विद्यार्थ्यांची निवड कमी गुणांवर सुद्धा करण्यात आली. सर्वसाधारण गटात गुणवत्ता यादीत १८६ गुणांचा विद्यार्थी पहिला आला आहे परंतु प्रश्न पत्रिकेचे अवघड स्वरूप बघता मेरिटचे आकडे संशयास्पद आहेत. करीता सदर विद्यार्थ्यांची परीक्षाकेंद्रावरील व्हिडिओ रेकॉर्डिंग तपासण्यात यावी जेणेकरून कुणी यांना मदत तर करीत  किंवा अत्याधुनिक उपकरणाचे वापर तर करीत नाहीत तसेच सादर प्रकरणाची CID चौकशी करण्यात यावी व त्यात भंडारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे मत सुद्धा नोंदविण्यात यावे अशी मागणी नगरसेवक महेंद्र निंबार्ते, शमीम शेख, धर्मेंद्र गणवीर, पृथ्वी तांडेकर, नगर अध्यक्ष सचिन घनमारे, डॉ. विनोद भोयर, प्रसन्न चकोले, अजय गडकरी, मनोज बागडे,  इम्रान पटेल, दिलीप देशमुख, कोमल कळंबे, मुकुंद साखरकर, मोहीस कुरेशी, पराग भुतांगे, शीतल भुरे, राहुल शामकुवर,सतीश वैरागडे, गीता रेहपाडे, यांनी केली.

वसतिगृहातील समस्यांना वाचा फोडण्यासाठी विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन

0

गोंदिया- एकात्मिक आदिवासी विभागाच्या वतीने गोंदिया येथे सुरू असलेल्या चारही वसतिगृहातील अनागोंदी कारभाराविरुद्ध स्थानिक वसतिगृह क्र.२ समोर काल पासून विद्याथ्र्यांनी ठिय्या आंदोलनाला सुरवात केली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी येऊन समस्यांचे निराकरण करावे, अशी भूमिका आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी घेतल्याने प्रशासनाचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
सविस्तर असे की, देवरीच्या एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या मार्फत गोंदिया येथे चार वसतिगृह सुरू आहेत. परंतु, या वसतिगृहात वास्तव्यास असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना कोणत्याही भौतिक सुविधा पुरविल्या जात नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. येथील वसतिगृह क्र. २ मध्ये एकूण ८० विद्यार्थी क्षमता असताना आदिवासी विद्यार्थ्यांना येथे प्रवेशापासून वंचित ठेवण्यात आले. या वसतिगृहात ६ खोल्या आणि केवळ एका स्वच्छतागृहाची सोय आहे. परिणामी, आपल्या दैनंदिन क्रिया आटोपण्यासाठी विद्यार्थ्यांना उघड्यावर जावे लागते. झोपण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसल्याने विद्यार्थ्यांना खाली झोपावे लागते. याशिवाय वसतिगृह अस्वच्छतेने कळस गाठला असून विद्याथ्र्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
शैक्षणिक सत्राची सुरवात होऊन २ महिन्याचा कालावधी लोटला तरी प्रशासनाने अद्यापही शैक्षणिक साहित्याचे वाटप केले नाही. परिणामी, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. वॉर्डन व सफाई कर्मचाऱ्यांकडून विद्यार्थ्यांचाा छळ केला जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. या कर्मचाऱ्यांचे स्थानांतरण करणे, प्रतीक्षा यादीतील विद्याथ्र्यांना वसतिगृहात प्रवेश देणे, नवीन वसतिगृह सुरू करणे या विषयी वरिष्ठ अधिकाऱ्यांना वारंवार विनंती करूनही विद्यार्थ्य्याच्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. परिणामी, आंदोलनाचा पर्याय विद्यार्थ्यांनी निवडल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

समस्यांचे निराकरण केले जाईल- पी. एम. खंडारे

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची माहिती मिळताच देवरीचे एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी पी. एम. खंडारे यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची घटनास्थळी जाऊन विचारपूस केली. त्यांच्या मागण्या रास्त असल्याचे सांगत श्री खंडारे यांनी या समस्यांचे लवकरच निराकरण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन विद्यार्थ्यांना दिले. येत्या १५ सप्टेंबर पूर्वी विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया पूर्ण करणार असल्याचेही त्यांनी सांगितले

चालकाला मोबाईलवर बोलणे भोवलेः 11 प्रवाश्यांचा मृत्यू

0

अंगूल- मोबाईलवर बोलणा-या बसचालकाचे सायकलस्वाराला वाचवण्याच्या नादात बसवरील नियंत्रण सुटल्याने बस पुलावरुन खाली कोसळल्याची दुर्दैवी घटना ओडिशात घडली. या अपघातात २१ जणांचा मृत्यू झाला असून सुमारे ३० जण जखमी झाले आहेत. यातील १५ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जाते.
ओडिशामधील महाराजा ट्रॅव्हल्सची खासगी बस अंगूल जिल्ह्यातील अथामलिककडून बाँधकडे जाण्यासाठी निघाली होती. जुन्या मानिंत्री पुलाजवळ बस आली असता बसचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि बस पुलाचा कठडा तोडून ५० फुट खाली कोसळली. यात १४ जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर ७ जणांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. उर्वरित जखमींना अंगूल आणि कटकमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बाँधपासून ४० किलोमीटर अंतरावर हा भीषण अपघात झाला.

दप्तरविरहित उपक्रमाचे साक्षीदार ठरले जिल्हाधिकाऱ्यांचे आईवडील

0

खेमेंद्र कटरे berartimes.com
गोंदिया,दि.८ : विविध शैक्षणिक उपक्रम राबवून राज्यात नावलौकीक मिळविलेल्या गोंदिया जिल्ह्याने आज ८ सप्टेबर रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी दप्तरविरहित दिन साजरा करुन वाचनाचा आनंद अनुभवला. शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेमधूनच वाचनीय पुस्तके उपलब्ध करुन देण्यात आली. या पुस्तकामध्ये थोर पुरुषांचे जीवनचरित्र, छोट्या छोट्या गोष्टींची पुस्तके उपलब्ध करुन देण्यात आली. विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमाच्या पुस्तकांना दप्तरविरहित दिनामुळे सुट्टी देण्यात आली असली तरी आजचा दिवस पदमपूरवासियांसाठी मात्र एक वेगळी पर्वणी देणारा ठरला.ते असे की,जिल्ह्याचे उपक्रमशील व लोकाभिमुख जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांच्याच संकल्पनेतून जो दप्तरविरहित दिवस आज जिल्ह्यातील शासकीय व खाजगी शाळांमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.त्याउपक्रमाचे साक्षीदार ठरले जिल्हाधिकारी साहेबांचे वडील नामदेवराव सूर्यवंशी आणि आई सुशिलाबाई सूर्यवंशी.ते नुसते सहभागीच झाले नाही,तर त्यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळेपणाने सवांद साधत आपले बालपणाच्या आठवणींना वाट मोकळी करुन दिली.
जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांचे आईवडील देखील या दप्तरविरहित दिनाचे साक्षीदार म्हणून उपस्थित होते. त्यांची उपस्थिती तर अनेकांना प्रेरणादायी ठरली. नामदेवराव सूर्यवंशी हे सेवानिवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी तर आई सुशिलाबाई हया राज्य शासनाच्या आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार मिळालेल्या सेवानिवृत्त मुख्याध्यापीका आहेत.त्यामुळे दोघांचेही मन शाळेतील विद्यार्थांत असे रमले की,आई सुशिलाबाईंना तर त्यांच्या शाळेतील विद्यार्थांचे चेहरे पदमपूरच्या विद्यार्थांना बघून आठवू लागल्याचे त्यांच्या चेहर्यावरील हावभावावरुन दिसत होते.त्यांनी मनमोकळपणाने विद्यार्थ्यांच्या वर्गात जावून त्यांच्याशी संवाद साधून मार्गदर्शन केले.तेव्हा विद्यार्थांनाही आपण कुणा अधिकार्याच्या आईवडीलासोंबत सवांद साधत असल्याचे नव्हे तर आपल्याच गावातील प्रतिष्ठित नागरिकांशी सवांद साधत असल्याची अनुभूती वाटली.
शालेय विद्यार्थ्यांना अवांतर पुस्तक वाचनाची आवड निर्माण व्हावी, विविध वैचारीक स्वरुपातील पुस्तके वाचून विद्यार्थ्यांची सकारात्मक विचारसरणी तयार व्हावी तसेच त्यांच्या ज्ञानात भर पडावी यासाठी विद्यार्थ्यांनी दप्तरविरहित दिनाच्या निमित्ताने पुस्तके वाचनाचा आनंद घेतला. शाळेमध्ये उपलब्ध असलेल्या पुस्तकांसोबतच गावात व शेजारच्या गावात असलेल्या सार्वजनिक वाचनालयातून वाचन आनंद दिवसासाठी पुस्तके उपलब्ध करुन देण्यात आली होती. विद्यार्थ्यांमध्ये वाचानाची आवड निर्माण होऊन वाचन चळवळ भक्कम करण्यासाठी दप्तरविरहित दिवस उपयुक्त ठरल्याचा अांनद बघावयास मिळाला.unnamed-5
जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांनी ८ व्या वर्गातील विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना आपले अनुभव कथन केले. विद्यार्थ्यांना पदमपूर गावाचे वैशिष्ट्य विचारले. महाकवी भवभूतीचा इतिहास सुध्दा विद्यार्थ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितला. कोणकोणती पुस्तके वाचता, शाळा सुटल्यानंतर काय करता, सकाळी किती वाजता उठता, कोणाच्या घरी शौचालय नाही याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांकडून जाणून घेतली. फुटबॉलपटू रोनाल्डो, मेसी, ऑलिम्पीक स्पर्धेत पदक विजेत्या भारतीय खेळाडूंची माहिती, संत पद मिळालेल्या मदर टेरेसा यांची माहिती देखील विद्यार्थ्यांना त्यांनी दिली.याचवेळी एका विद्यार्थांने जिल्हाधिकारी पदावर जाण्याची प्रेरणा कोणापासून मिळाली असा प्रश्न बिनधास्त विचारले असता जिल्हाधिकाऱ्यांनीही आईवडील हे सांगताच आईवडील हे प्रेरणादायी आणि पहिले गुरु असतात हे विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून दिले.

नीती आयोग गांगरले; आरबीआयचे गर्व्हनर समजून स्वागत केले भलत्याचेच

0

नवीदिल्ली- रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) गर्व्हनर पदावरून रघुराम राजन पायउतार झाले. यानंतर दोन दिवसांपूर्वी उर्जित पटेल यांनी पदभार घेतला आहे. पटेल हे आपल्या साधेपणासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या याच साधेपणामुळे नीती आयोगाच्या अधिकाऱ्यांचा गैरसमज झाला आणि दुसऱ्याच व्यक्तीला उर्जित पटेल समजून त्यांचे त्याचे ‘स्वागत’ केले. उशिराने त्यांना आपली चूक लक्षात आली. झालं असं की, मंगळवारी उर्जित पटेल यांनी आरबीआयच्या २४ व्या गर्व्हनरपदाची धुरा आपल्या हाती घेतली. पदभार घेतल्यानंतर त्यांची पहिलीच बैठक ही नीती आयोगाबरोबर होती. त्यावेळी हा सगळा प्रकार घडला.
पटेल यांची नीती आयोगाचे अध्यक्ष अरविंद पनगढिया यांच्याबरोबर मंगळवारी सांयकाळी बैठक होती. नीती आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी पटेल यांच्या स्वागताची तयारी केली होती. आयोगाचे एक वरिष्ठ अधिकारी पटेल यांची वाट पाहत प्रवेशद्वारावर थांबले होते. पटेल यांच्या आगमनावेळीच एक महागडी कार कार्यालयासमोर आली. संबंधित अधिकाऱ्याला कारमधील व्यक्ती उर्जित पटेल असल्याचे वाटले. त्यांनी लगेचच पुढे येऊन त्यांचे स्वागत केले. पुष्पगुच्छ दिला आणि त्यांना कार्यालयाकडे नेले. त्यानंतर त्या अधिकाऱ्याला आपल्या हातून चूक झाल्याचे लक्षात आले. तोपर्यंत खूप उशिर झाला होता.
त्याचदरम्यान उर्जित पटेल हेही आपल्या कारने नीती आयोगाच्या कार्यालयात पोहोचले. त्यांच्या हातात फाईलींचा गठठा होता. प्रवेशद्वारावर केंद्रीय औद्योगीक सुरक्षा दलाच्या जवानाने त्यांना ओळखले नाही. त्याने लगेच पटेल यांना अडवले व ओळखपत्राची मागणी केली. पटेल यांनी लगेचच त्याला ओळखपत्र दाखवले. ओळखपत्र पाहिल्यानंतरच जवानाने पटेल यांना आत जाऊ दिले.

विद्यार्थ्यांनी उपलब्ध सुविधांचा लाभ घेवून यशाची शिखरे गाठावी- उषा मेंढे

0

गोंदिया,दि.८ : विद्यार्थ्यांनी जीवनात वेळेला महत्व दयावे. गेलेली वेळ पुन्हा येत नाही. आज मुलांना शिक्षणाच्या चांगल्या सुविधा उपलब्ध आहेत. पुर्वी आजसारख्या सुविधा उपलब्ध नव्हत्या. विद्यार्थ्यांनी उपलब्ध सुविधांचा फायदा घेवून यशाची शिखरे गाठावी असे आवाहन जि.प.अध्यक्ष उषा मेंढे यांनी केले.
८ सप्टेबर रोजी आमगाव तालुक्यातील पदमपूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत दत्परविरहित दिनानिमीत्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून श्रीमती मेंढे बोलत होत्या. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, नामदेवराव सूर्यवंशी, सुशिलाबाई सुर्यवंशी, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, तहसिलदार साहेबराव राठोड, प्रभारी जिल्हा ग्रंथालय अधिकारी खुमेंद्र बोपचे, सरपंच सिताबाई पाथोडे, उपसरपंच श्री.किरणापुरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विजय ब्राम्हणकर, उपाध्यक्ष गणेश तलमले, शिक्षण विस्तार अधिकारी घोषे, केंद्रप्रमुखरामटेके, रुम टू रिड या मुंबई येथील सेवाभावी संस्थेचे प्रतिनिधी राज शेखर,पोलीस निरिक्षक श्री.सांडभोर उपस्थित होते.
श्रीमती मेंढे पुढे म्हणाल्या, विविध स्पर्धेच्या बाबतीत ग्रामीण भागातील मुले शहरी भागातील मुलांपेक्षा कमी नाहीत. त्यांना योग्य मार्गदर्शन व सुविधा उपलब्ध झाल्या तर ते शहरी भागातील मुलांपेक्षाही पुढे जातील. माणसाच्या जीवनात प्रतिस्पर्धी असेल तर यश नक्की मिळते असेही मेंढे यावेळी म्हणाल्या.
डॉ.सूर्यवंशी म्हणाले, आयुष्यात ५० ते ६० वर्षे मजेत राहायचे असेल तर विद्यार्थ्यांनी खूप शिकावे. विविध स्पर्धेत सहभागी व्हावे. चुकणे आणि शिकणे हे शाळेतच होते. विद्यार्थ्यांनी आपल्या प्रगतीसाठी शिक्षणाचा उपयोग करावा असे आवाहनही त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले.सुशिलाबाई सूर्यवंशी बोलतांना म्हणाल्या, धनाची पेटी असलेल्या मुलींना पालकांनी खुप शिकवावे. आई ही पहिली शिक्षिका असते. बेटी बचाओ बेटी पढाओ हा संकल्प प्रत्येक पालकांनी केला पाहिजे. वेळेचे महत्व समजून पालकांनी मुलांचा अभ्यास नियमीत घ्यावा. शिक्षण हे महत्वाचे धन असून ते कधीच वाया जात नाही. शिक्षण हे महत्वाचे दान आहे. शिक्षकाची नोकरी ही प्रेरणादायी आहे असेही त्या म्हणाल्या.
तहसिल कार्यालय आमगावच्या वतीने इयत्ता पहिली ते चवथीच्या विद्यार्थ्यांना विविध पुस्तकांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ व बिस्कीट देवून करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक एस.एम.उपलपवार, देशमुख, शाळेतील शिक्षक वर्ग यांनी परिश्रम घेतले.

दोन चंदन तस्कराकडून अडीच लाखाचा मुद्देमाल हस्तगत

0

berartimes.com
गोंदिया,दि.8:- गोंदिया वनविभागाच्या चमूने आज गुरुवारला महाराष्ट्र मध्यप्रदेश सीमेवरील रजेगावजवळील वाघनदीला लागून असलेल्या कोरणी गावाजवळ दुचाकीमोटारसायकलने चंदनाची तस्करी करणार्या दोघांना वाहनासह ताब्यात घेतले.वनपरिक्षेत्राधिकारी अजय मेश्राम व क्षेत्रसहाय्यक अरुण साबडे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर वनविभागाचे गस्तपथक हे कोरणीगावाजवळ सकाळपासूनच या तस्कराच्यामागावर होते.ते मध्यप्रदेशातून कोरणीत येताच त्यांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडे 61 किलो चंदनाच्या काड्या आढळून आल्या. मोहमद फैय्याज अंसारी(वय 44,रा.हाजिगंज जि.कनोज,उत्तरप्रदेश) व रामगोपाल बनकर रा.बगडमारा ता.किरनापूर,जि.बालाघाट असे पकडलेल्या चंदनतस्कराचे नाव आहे.
पकडण्यात आलेल्या चंदनाची किमत २ लाख रुपये असून ५० हजार किमतीची दोन दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहे. पकडलेल्या आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार २८ वर्षीय मुख्य आरोपी मोहंमद सययद नागपुरातील रहिवाशी असून तो अतर विक्रीचा व्यवसाय करतो.त्याच्याकडेच हा चंदन चालला होता.आरोपीकडून विचारपूस केल्यानंतर त्यांना सोबत घेऊन वनविभागाचे पथकाने नागपूर गाठून मुख्य आरोपी असलेल्या मोहम्मद सय्यद याच्या घराची तपासणी सुरु केली आहे.मोह्हमद सय्यद चंदन नागपूरातून उत्तरप्रदेशात पाठविण्याची व्यवस्था करायचा अशी माहिती वनविभागाच्या हाती आली असून गोंदिया स्थानिकमध्ये कुणाशी संबध आहेत काय याचाही तपास वनविभागाचे अधिकारी घेत आहेत.

पाचहजाराची लाच स्विकारतांना तात्रिंक अधिकारी जाळ्यात

0

berartimes.com
आमगाव,दि.8- येथील पंचायत समितीच्या कृषी विभागात कार्यरत तांत्रिक अधिकारी भक्तप्रसाद राऊत याला पाच हजार रुपयाची लाच स्विकारतांना आज (दि.8) रंगेहाथ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले.मग्रारोहयो अंतर्गत झालेल्या भातखाचराच्या जून 2016 पर्यंतच्या कामाचे 28 हजार रुपयाचे बील काढून देण्याकरीता तांत्रिक अधिकारी राऊत यांनी सहा हजार रुपयाची मागणी केली होती.परंतु अर्जदाराला लाच देण्याची मूळीच ईच्छा नसल्याने त्यांने लाचलुचपत प्रतिंबधक विभागाकडे 6 सप्टेंबरला तक्रार नोंदविली.त्या तक्रारीच्या आधारे लाचलुचपत विभागाने आज सापळा रचून राऊत याला पाच हजार रुपये स्विकारतांना अटक केली आहे.पोलीस स्टेशन आमगाव येथे याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आले आहे.एसीबीचे पोलीस अधिक्षक संजय दराडे,अपर पोलीस अधिक्षक राकेश शर्मा यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई गोंदिया येथील एसीबीच्या चमू ने केली आहे.

साकोली काँग्रेसचे एसडीओला निवेदन

0

berartimes.com साकोली,दि.8- महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र प्रोटेक्शन अॅण्ड इंटरनल शिक्युरीटी अॅक्टच्या संदर्भात साकोली तालुका काँग्रेस कमिटीची सभा घेऊन मार्गदर्शन करण्यात आले.त्याचप्रमाणे सदर अॅक्ट रद्द करण्यात यावे यामागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फेत महाराष्ट्र शासनाला पाठविण्यात आज गुरुवारी पाठविण्यात आले.या अॅक्ट मुळे सामान्य मानसाला एखादा घरगुती कार्यक्रम घ्यायचा असेल बारसा,साखरपुडा, कुणाच्या घरी मय्यत (अंत्यसंस्कार) ईत्यादि ईत्यादी आणी या कार्यक्रमामध्ये 100 पेक्षा जास्त लोकं एकत्र येत असतील तर पोलीस परवानगीशिवाय कार्यक्रम करता येणार नाही. तसेच या कार्यक्रमात सिसिटिव्ही कॅमेरे बसविणे बंधनकारक राहिल.म्हणजेच एखाद्या व्यक्तीच्या घरी मय्यत झाल्यास अंत्यसंस्कार करायचे असल्यास दुखः विसरून आधी पोलीसाची परवानगी घ्यायची हि सरकारची हिटलरशाही खपवून घेणार नाही.त्या विरोधात रस्त्यावर उतरून निदर्शने करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला.यावेळी भंडारा जिल्हा काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणविर,अजयराव तुमसरे, तालुका अध्यक्ष नंदकिशोर समरीत, शहर अध्यक्ष अश्विन नशीने, जेष्ठ नेते मधुकरजी लिचडे होमराजभाऊ कापगते उपस्थित होते.