गोंदिया,berartimes.comदि.27– गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समिती व राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या बैठकित गोंदिया जिल्हा ओबीसी अधिकारी-कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी लिलाधर पाथोडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सोबतच संघटक म्हणून जिल्हा सांख्ङ्मिकी काङ्र्मालङ्माचे तुलशीदास झंझाड व सांख्ङ्मिकी विस्तार अधिकारी विनोद चौधरी यांची निवड करण्यात आली. ओबीसी अधिकारी कर्मचारी संघटेनेचे मार्गदर्शक म्हणून सेवानिवृत्त समाजकल्याण उपायुक्त अनिल देशमुख व लघु पाटबंधारे विभागाचे दुलीचंदजी बुध्दे यांच्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सयोंजक प्राचार्य बबनराव तायवाडे यांनी घोषणा केली.
ओबीसीसांठी स्वंतत्र मंत्रालय हवेच – नाना पटोले
मुंबई,दि.२७ -राज्यघटनेने ओबीसी समाजाला अधिकार दिले असले तरी या समाजाला पाहिजे त्या सोयी सवलती आणि न्याय न मिळाल्याने हा ओबीसी समाज आजही दुर्लक्षित राहिला आहे.त्यातच स्वातंत्र्यानंतर एकदाही ओबीसींची जनगणना न झाल्याने त्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळाले नाही.मंडल आयोगाच्या २७ टक्के आरक्षणामध्येच हा ६० टक्केच्यावरील समाज असून या समाजाच्या विकासासाठी जातीनिहाय जनगणना करुन स्वतंत्र ओबीसी मंत्रालय केंद्र व राज्यसरकारने सुरु करावे अशी मागणी खासदार नाना पटोले यांनी मुंबई मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत केली.राज्यभर ओबीसी आरक्षणात सामावून घेण्यासाठी मराठा समाजाचे मोर्चे निघत आहेत,त्यावर बोलतांना मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे मात्र आधीच कमी आरक्षण असलेल्या ओबीसीमध्ये नको यासाठी जातनिहाय जनगणना करुन नच्चीपन आयोगाच्या शिफारसी लागू करुन आरक्षण देण्यात यावे अशी भूमिका मांडली.सामाजिक न्याय विभागाकडून ओबीसींच्या विकासाचे कुठलेच कार्यक्रम नसल्याने सातत्याने अन्याय होत असल्याचेही त्यांनी सांगितले.यावेळी बोलतांना अॅटड्ढॉसिटी कायद्याचा गैरवापर होतोच. या कायद्यामुळे संपूर्ण समाज अपराधी असल्याची भावना रुजली जाते. त्यामुळे मराठा क्रांती मूक मोर्चात लाखोंचे समर्थन मिळत आहे. अशा स्थितीत अटड्ढॉसिटी कायद्यात सुधारणा केली पाहिजे. गैरवापर करणाèयांना शिक्षेची तरतूद करावी, यासाठी लोकसभेत आवाज उठवणार असल्याचे खासदार नाना पटोले यांनी आज जाहीर केले. मागील वर्षी लोकसभेत अटड्ढॉसिटी कायद्यात सुधारणा करणारे विधेयक चर्चेला आल्यानंतर या कायद्यातील त्रुटी मांडून हा समाजाच्या विरोधी कायदा असल्याची भूमिका मांडली होती. यामध्ये गैरवापर करणाèयांना कोणत्याही शिक्षेची तरतूद नसल्याचे सरकारच्या निदर्शनास आणले. मात्र, त्या वेळी एकाही मराठा खासदाराने समर्थन दिले नाही. महाराष्ट्रातले सर्व खासदार गप्प होते, असा गौप्यस्फोट करत, या कायद्यात सुधारणा करण्यासाठी मोदी यांचीही भेट घेणार असल्याचे पटोले यांनी स्पष्ट केले. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार अटड्ढॉसिटीच्या तक्रारीत ९५ टक्के आरोपी निर्दोष सुटत असल्याचे आकडेवारी पटोले यांनी दिली.ओबीसींना अद्याप कोणत्याही सरकारने न्याय दिला नाही, असे सांगत भाजपला त्यांनी घरचा आहेर दिला. ओबीसींचे स्वतंत्र मंत्रालय असावे, त्यासाठी तातडीने सरकारने पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली.
सुकमा जिल्ह्यात चकमकीत दोन नक्षलवादी ठार
वृत्तसंस्था
4 भारतीय महिलांना समझोता एक्स्प्रेसमध्ये चढण्यापासून रोखले
वृत्तसंस्था
शिवसेना काढणार पवनी-भंडारा पदयात्रा
berartimes.com भंडारा,दि.27 : कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नापिकीला सामोरे जावे लागत आहे. आर्थिक संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी शासनाने भंडारा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा, या मागणीसाठी २८ सप्टेंबरला पवनी ते भंडारा संघर्ष पदयात्रा काढण्यात येत असल्याचे माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी पत्रपरिषदेत सांगितले.
संघर्ष पदयात्रा बुधवारला सकाळी ९ वाजता पवनी येथील गांधी चौकातून निघणार आहे. कोंढा, अड्याळ येथे सभा घेऊन पहेला येथे मुक्काम करणार असून गुरूवारला दुपारी जिल्हाधिकारी कार्यालय चौकात पोहोचणार आहे. या यात्रेची माहिती देताना नरेंद्र भोंडेकर, जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले म्हणाले, महिला रूग्णालयाच्या जागेशेजारी बांधण्यात आलेले ठोक भाजी बाजार हटवून ती संपूर्ण जागा महिला व बाल रूग्णालयासाठी देण्यात यावी, जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, धानाला ३,५०० रूपये प्रतिक्विंटल प्रमाणे दर द्या, बाबा जुमदेव यांच्या जयंतीनिमित्त ३ एप्रिल रोजी स्थानिक सुटी देण्यात यावी, शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, रोवणी ते मळणीपर्यंतची शेतकामे रोहयोतून करण्यात यावी, मागेल त्याला कृषीपंप जोडणी देऊन २४ तास वीज पुरवठा करावा या मागण्यांचा समावेश आहे. यावेळी राजेंद्र पटले, उपजिल्हा प्रमुख अनिल गायधने, संजय रेहपाडे, मुकेश थोटे उपस्थित होते.
गोंदिया पंचायत समितीत आठ लाखांचा घोटाळा
येरमागड आश्रमशाळेतील एका विद्यार्थ्याचा मृत्यू, दुसरा गंभीर
berartimes.com गडचिरोली,दि.२६ :: धानोरा तालुक्यातील येरमागड येथील शासकीय आश्रमशाळेतील एका विद्यार्थ्याचा आजाराने मृत्यू झाला असून, दुसऱ्याची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला गडचिरोलीला हलविण्यात आले आहे. राजमू बुधकर धुर्वे(१४) रा.कटेझरी असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.
राजमू धुर्वे हा येरमागड येथील शासकीय आश्रमशाळेत इयत्ता आठवीत शिकत होता. राजमूच्या पोटात दुखत असल्याने व उलटी होत असल्याने त्याला आज सकाळी मालेवाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. परंतु प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्याला कुरखेडा येथे रेफर केले. कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर त्यास गडचिरोली येथे रेफर करण्यास सांगितले. मात्र गडचिरोलीला नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, त्याच शाळेतील नवव्या वर्गात शिकणारा दुसरा विद्यार्थी अलीराम जयराम तुमरेटी यालाही पोटदुखी व उलटीचा त्रास होत असल्याने त्यालादेखील मोटारसायकलने कुरखेडा येथे उपचारासाठी आणले. तेथे प्रथमोपचार केल्यानंतर त्याला गडचिरोलीला हलविण्यात आले आहे.
ओबीसींनी गडचिरोलीत केला चक्काजाम
berartimes.com गडचिरोली,दि.२६ :: ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करावे, १९ जून २०१४ ची राज्यपालांच्या अधिसूचनेत सुधारणा करावी व नोकरभरतीत गैरआदिवासींना प्राधान्य द्यावे या प्रमुख मागण्यांसाठी आज ओबीसी समाज संघटनेच्या वतीने इंदिरा गांधी चौकात रास्ता रोको आंदोलन करुन प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.ओबीसी समाज संघटनेचे नेते रमेश मडावी, नरेश महाडोरे, प्रवीण घाटे, सोनाली वरगंटीवार, ओबीसी समाज संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर गव्हारे, केशव सामृतवार, विनायक कुनघाडकर, वामन म्हशाखेत्री आदींच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.
चक्काजाम आंदोलन करण्यात आल्याने अर्धा तास वाहतूक खोळंबली होती. यावेळी आंदोलनकर्त्यांनी निदर्शने करुन सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीकास्त्र सोडले. भाजपची मंडळी ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करण्याचे आश्वासन देऊन सत्तेवर आली. परंतु दोन वर्षे होऊनही त्यांनी ओबीसींचे प्रश्न सोडविले नाही, भाजप सरकार ओबीसींच्या डोळ्यात धूळफेक करीत असल्याची टीका आंदोलनकर्त्यांनी केली.
पाच लाखाची लाच घेतांना उपविभागीय कृषी अधिकारी जाळ्यात
गोंदिया,दि.26- जिल्ह्यातील देवरी उपविभागीय कृषी अधिकारी युवराज शहारे यांना एका एका खाजगी इसमाच्या माध्यमातून पाच लाखाची लाच सिवीकारताना आज सोमवारला चन्द्रंपुर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई देवरी येथील कुमारसिंग सोमवंशी यांच्या दुकानात केली.एका बियाने विक्री करणार्या कंपनी मालकाकडुन कंपनीविरुध्द कारवाई न करण्यासाठी 6 लाखाची लाच मागितली होती.तक्रारकर्त्यालालाच द्यायची नसल्याने त्यांने चंद्रपूर येथे तक्रार दाखल केली.त्या तक्रारीच्या आधारे सापळा रचून आज कुमारसिंग सोमवंशी यांच्यामार्पेत लाच घेतांना रंगेहाथ पकडले.
जिवित व वित्तहानी टाळण्यासाठी एनडीआरएफ प्रदर्शनी व कार्यशाळा
berartimes.com
गोंदिया,दि.२६ : कोणतीही आपत्ती ही सांगून येत नाही. संभाव्य आपत्तीचा धोका लक्षात घेता, या आपत्तीतून होणारी जिवित व वित्तहानी टाळण्यासाठी लोकसहभागातून आपत्तीचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. असे मत जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.
२६ सप्टेबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित कार्यशाळेत अध्यक्षस्थानावरुन डॉ.सूर्यवंशी बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिककरण पुणे येथील पाचव्या बटालीयनचे मेजर दुली चंद, मेजर ददन तिवारी, निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ.सूर्यवंशी पुढे म्हणाले, आपत्त्ती व्यवस्थापनाच्या बटालीयनने पाच दिवसाच्या वास्तव्याच्या काळात जिल्ह्यातील जास्तीत जास्त जणांना आपत्ती व्यवस्थापनाबाबतचे प्रशिक्षण दयावे. आपत्ती व्यवस्थापनाबाबतचे ज्ञान डॉक्टर पासून तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना असले पाहिजे. पूरपरिस्थितीच्या काळात योग्य समन्वय राहावा यासाठी मध्यप्रदेश राज्यातील बालाघाट, शिवनी, तसेच भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर येथील आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित अधिकाऱ्यांचीही बैठक घेण्यात आली. जिल्ह्यातील ८५ गावे पुराने बाधित होतात. या गावातील नागरिकांनी पूरपरिस्थितीच्या काळात पूरस्थितीवर मात करण्यासाठी स्थानिक पातळीवर उपाययोजना कराव्यात. मानवनिर्मीत होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी नेहमी सतर्क राहावे असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.
प्रास्ताविकातून श्री.महिरे यांनी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची चमू पाच दिवस जिल्ह्यातील विविध तालुक्यात आग प्रतिबंधक, पूरपरिस्थिती नियंत्रण याबाबतची रंगीत तालीम देणार आहे. यासाठी सर्व उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांनी स्थानिक स्तरावर तयारी करावी असेही सांगितले. या प्रशिक्षणाची जास्तीत जास्त लोकांनी लाभ घेवून आपत्तीच्या काळात या प्रशिक्षणाचा निश्चित उपयोग होईल असे त्यांनी यावेळी सांगितले.
श्री. दुली चंद यांनी आपत्तीबाबत प्रत्येकाने जागृत असणे गरजेचे असल्याचे सांगून कोणत्याही प्रसंगी सजग राहण्याची आवश्यकताही त्यांनी विशद केली.
यावेळी एन.डी.आर.एफ. पुणे बटालीयनच्या वतीने उपस्थित विद्यार्थ्यांना प्राथमिक उपचार, बचाव कार्य, आपत्तीच्यावेळी घेण्यात येणारी दक्षता, घरात उपलब्ध असलेल्या संसाधनाचा आपत्त्तीच्या काळात कसा उपयोग करावा याबाबतची माहिती देण्यात आली.
बचाव व मदत कार्यात उपयोगात येणारी साहित्य व साधने, स्वयंचलीत डोंगे, कटर, कामात येणारे अवजारे, बोल्ड कटर, कम अलाँग, सरप्राईडर कटर, रेस्प्रो कटींग सॉ, एअर लिफ्टींग बॅक, चिपींग हॅमर, ड्रील मशीन तसेच पूरपरिस्थितीच्या काळात उपयोगात येणारे साहित्य, आऊट बोर्ड मोटर, लाईफ जॅकेट, लाईफ बॉय, लाईफ लाईन, प्रथमोपचार पेटीतील साहित्य याबाबतचे प्रदर्शन एन.डी.आर.एफ. पुणे बटालीयनच्या वतीने लावण्यात आले होते. प्रदर्शनाला भेट देणाऱ्या व्यक्ती व विद्यार्थ्यांना बटालीयनच्या सैनिकांनी माहिती दिली.
एन.डी.आर.एफ. पुणे बटालीयनचे सैनिक एम.विजयन, डि.एम.मितकीरी, राजेंद्र जाट, माहीर जालंदर, राजीवकुमार, राकेशकुमार पाठक, एस.एस.पांडे, के.एस.जौनध्याल, आर.सिल्व्हाकुमार यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना प्रात्याक्षिकासह माहिती दिली.
कार्यशाळेला प्रभारी उपविभागीय अधिकारी के.डी.मेश्राम, तहसिलदार अरविंद हिंगे, प्रा.डॉ.कविता राजाभोज, सहायक अधीक्षक श्री.किरीमकर, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रविणकुमार, व्ही.सी.कोल्हटकर, संजय सांगोडे, विविध महाविद्यालयाचे समन्वयक, मनोहर म्युन्सीपल विद्यालय, एस.एस.गर्ल्स कॉलेज, महावीर मारवाडी विद्यालय, जे.एम.हायस्कूल, एन.एम.डी.कॉलेज येथील राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी, व्हाईट आर्मीचे युवक, गृहरक्षक दल, पोलीस दलचे जवान यांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.