गोंदिया पंचायत समितीत आठ लाखांचा घोटाळा

0
18
:- शिक्षण विभागाची विश्वासर्हता गोत्यात
:- लिपिकाने हडपली रक्कम
berartimes.com गोंदिया,दि.२६:- गेल्या दहा महिन्यांपासून शिक्षण विभाग सडक/अर्जुनी पंचायत समितीत झालेल्या घोटाळ्यामूळे तोंडघशी पडला. आता गोंदिया पंचायत समितीतील शिक्षण विभागात प्रथमदर्शी आठ लाख रूपये लीपीकाने स्वत:च्या खात्यात वळते केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. प्रकरणाची चौकशी अत्यंत गुप्तरित्या सुरू झाली. जिल्हा परिषदेचा प्राथमिक शिक्षण विभाग गेल्या काही वर्षापासून चर्चेत आहे. कधी बदल्या, समायोजन, तर कधी शिक्षकांकडून होणारे गैरवर्तन हे प्रकार नित्याचेच झाले. शिक्षणासारखा पवित्र क्षेत्रात अशाप्रकारे काम सुरू असल्यामूळे नागरिकांचा सरकारी शाळांवरील विश्वास उडू लागला आहे. चार हजारांवर शिक्षण कर्मचारी असलेल्या या विभागात कार्यरत बाबू मंडळी मर्जी प्रमाणे काम करत आहेत. शिक्षकांच्या हक्काच्या रकमेवर डल्ला मारण्याचा प्रकार राजरोसपणे सूरू आहे. सडक अर्जुनी पंचायत समितीच्या शिक्षण विभागात कार्यरत असलेल्या कर्मचा-याने कोटी रूपयांचा आसपास शिक्षकांच्या घामाचे पैसे स्वत:च्या खात्यात वळते केले. हा बिंग फुटल्यानंतर जिल्हा परिषदेत एकच खळबळ उडाली. सुमारे महिनाभर वरीष्ठ अधिका-यांनी चौकशी केली. फौजदारी गुन्हा नोंदविण्यात आला. हा घोटाळा ज्यांच्या कार्यकाळात आला, ते दोन गटशिक्षणाधिकारी, संबंधित कर्मचारी आणि जिल्हा मध्यवर्ती बँके च्या व्यवस्थापकांना पांलीसांनी अटक केली. या बातमीने शिक्षण विभागाची नाकचक्की झाली होती. गेल्या आठ दिवसांपुर्वी गोंदिया पंचायत समितीच्या शिक्षण विभागात सुध्दा एका बहादुर कर्मचा-याने शिक्षकांचे पैसे स्व:तच्या खात्यात वळते केल्याचे प्रकरण पुढे आले. शिस्तप्रिय म्हणून ओळखण्यात येणारे शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांच्या विभागात असे उघडकीस येत असल्यामूळे जिल्ह्यात या विभागाची लक्तरे वेटीवर टांगली गेल्याची चर्चा आहे. घोटाळा झाल्याची माहिती पुढे आल्यामूळे विभागाने याची वाच्यता न करता अगदी गुपचूपपणे लेखा विभागामार्फत चौकशी सुरू केली. गेल्या चार दिवसापासून ही चौकशी सुरू असून विभागाने सासंदर्भात गुप्तता पडली आहे. गोंदिया पंचायत समितीत हा प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होता. या दरम्यान पंचायत समितीत दोन गटशिक्षणाधिका-यांनी काम केले. परंतू एवढा मोठा प्रकार त्यांच्या लक्षात कसा आला नाही. हा संशोधनाचा विषय आहे. या प्रकारात तत्कालीन गटशिक्षणाधिकारी सुध्दा सामील होते काय? असे विविध प्रश्न यानिमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे. सडक अर्जुनी येथील प्रकारात बँक व्यवस्थापकाचीही चुक असल्याने तत्कालीन बँक व्यवस्थापकाविरोधात गुन्हे नोंदविण्यात आले होते. त्यामूळे गोंदिया पंचायत समितीच्या घोटाळ्यात देखील बँक व्यवस्थापकांना अटक होनार काय? याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत. जिल्हा परिषदेचे अधिकारी आणि लेखा परीक्षक नियमीतरित्या तपासण्या करतात असे असले तरी त्यांच्या लक्षात हे प्रकार का येत नाहीत? असा प्रश्न उपस्थित होत आहे. विद्यादान करून घामाचा पैसा शिक्षक गोळा करतात, त्यांचा पैसा लक्षात घालना-यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली.
पंचायत समितीत सायंकाळ होताच सुरू होतात ओल्या पार्ट्या?
गोंदिया पंचायत समितीच्या कार्यालयातील बिडीओ यांच्या कक्षा शेजाारी गेल्या अनेक दिवसांपाासून सायंकाळ होताच ओल्या पार्ट्या होत असल्याची चर्चा कर्मचारी वर्गात होती. तसेच पंचायत समितीसमोर पानटपरी व चाय टपरीवरही चर्चा समोर येत आहे. गेल्या शुक्रवारी सुध्दा साडेसात ते आठ वाजेच्या दरम्यान ओली पार्टी झाल्याने जिल्हा परिषदच्या वरिष्ठ अधिका-यांमध्ये चांगली खडबळ उडाली होती.