31.2 C
Gondiā
Thursday, May 15, 2025
Home Blog Page 5659

आर्थिक नियोजनशून्यतेने शेतकरी आत्महत्यांत वाढ – पी. साईनाथ

0
नागपूर berartimes.com दि. १९ – – शेती, शेतकरी आणि शेतकरी आत्महत्या हे या देशातील सर्वाधिक दुर्लक्षित विषय आहे. या विषयावर काेणीच काही बोलण्यास तयार नसतो. दुसरीकडे शेतकरी आत्महत्यांची आकडेवारीही कमी दाखवण्याचे केंद्र सरकारचे प्रयत्न असतात, असा अाराेप करतानाच आर्थिक नियोजनशून्यतेमुळेच शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ झाल्याचे परखड मतही ख्यातनाम कृषी अभ्यासक व ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी रविवारी व्यक्त केले.
डाॅ. आंबेडकर अॅग्रीकोज असोसिएशन आॅफ इंडिया या संस्थेतर्फे आयोजित राष्ट्रीय परिसंवादात ते बोलत होते. विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष सुखदेव थोरात, चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
‘राजकारणात दिसून येणारी लोकशाही सामाजिक व आर्थिक क्षेत्रात दिसून येत नाही हा किती विपर्यास आहे. सामाजिक व आर्थिक क्षेत्रातील वाढती असमानता राजकीय क्षेत्रात स्फोट घडविल्याशिवाय राहाणार नाही, असे डाॅ. आंबेडकर यांनी संविधान समितीसमोर म्हटले होते. त्यांचे हे विधान आजही तितकेच प्रासंगिक आहे’, असे पी. साईनाथ म्हणाले.
नॅशनल क्राईम रेकाॅर्ड ब्युरो शेतकरी आत्महत्या तसेच अपघात बळींचा अहवाल दरवर्षी सादर करते. ३० जूनला हा अहवाल यायला हवा. आज सप्टेंबरचा पंधरवडा उलटूनही अहवाल आलेला नाही. शेतकरी आत्महत्यांची आकडेवारी कमी दाखवा असे केंद्र सरकारचे निर्देश आहे. याच कारणांमुळे शेतकरी, शेतमजूर, इतर अशी विभागवारी करण्यात आली. यात ‘इतर’चा रकाना दिवसेंदिवस वाढत चालला आहे, याकडे साईनाथ यांनी लक्ष वेधले.

आ.मोतेंचे शिक्षण सचिव नंदकुमारच्या कॅबीनसमोर ठिय्या आंदोलन

0

 मुंबई,दि.19- राज्यसरकारने अनिच्छेने का होईना राज्यातील कायम विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांना वेतन देण्याची घोषणा 30 आगस्ट रोजी केली.शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मुख्यमंत्र्यानी गणेशोत्सवाच्या आदी शिक्षकांना वेतन देऊ या आश्वासनाची पुर्तता करण्यासाठी ही घोषणा करीत मंत्रीमंडळाने मंजुरी दिली होती.परंतु त्या  शिक्षकांच्या वेतनासाठी शासन निर्णय काढायला मात्र शिक्षण सचिव नंदकुमार यांनी टाळाटाळ केली.त्यामुळे सप्टेबंर महिना लोटत चालला असतानाही किती दिवस अजून छळ होणार असा प्रश्न उपस्थित करीत आमदार रामनाथ मोते हे आक्रमक झाले असून त्यांनी  २० टक्के वेतनाचा जीआर रोखून धरणाऱ्या शिक्षण सचिव नंदकुमार यांच्या कॅबिन समोर  ठिय्या आंदोलनाला सुरताव केली आहे.त्यामुळे शिक्षण विभागात एकच खळबळ माजली आहे.

पाकचा खरा चेहरा जगासमोर आणणार, उच्चस्तरीय बैठकीत निर्धार

0

वृत्तसंस्था,नवी दिल्ली,दि.19- पठाणकोट हल्लानंतर पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी भारतावर भ्याड हल्ला केला. या हल्ल्याला कसे उत्तर देता येईल यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सोमवारला दिल्लीत उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. या बैठकीत पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणण्याची रणनिती आखण्यात आली. संयुक्त राष्ट्र संघासमोर उरी हल्ल्याचा मुद्दाही उपस्थित केला जाणार आहे.

उरी हल्ल्याबाबत आज नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठका बोलावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री राजनाथ सिंह, संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर, लष्करप्रमुख दलबीर सिंग सुहाग, गृह सचिव, पंतप्रधानांचे प्रधान सचिव उपस्थित होते. कालपासूनची ही सर्वात उच्चस्तरीय बैठक आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजितकुमार डोवाल, आयबी आणि रॉचे प्रमुखही या बैठकीला उपस्थित होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानचा दहशतवादाचा चेहरा आंतराष्ट्रीय आंतराष्ट्रीय स्तरावर उजेडात आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. जर आवश्यक्ता पडली तर याचे पुरावेही सादर केले जातील.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उरीमध्ये झालेल्या हल्ल्यात पाकचा सहभाग असल्याचे पुरावे हाती लागले आहे. दहशतवाद्यांकडून जीपीएस ट्रॅकर सापडले आहे. ज्याचा स्ट्राटिंग पाईंट पाकिस्तान आहे. या शिवाय त्यांच्याकडे पाक सैन्याचे चिन्ह असलेले हत्यारं मिळाली आहे.

मराठा आरक्षणासंदर्भात हायकोर्टात जा : सुप्रीम कोर्ट

0
नवी दिल्ली, दि. १९ – मराठा समाजाला नोकरी व शिक्षणात आरक्षण देण्यासंदर्भात हायकोर्टातच जावे असे सांगत सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्यांची सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. या प्रश्नी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर दिलेल्या निकालात न्यायालयाने याचिकाकर्त्याला हायकोर्टात जाण्याचे निर्देश दिले आहेत. याचिकाकर्त्याने हायकोर्टात जाऊन मराठा आरक्षणाणसंबंधी सुनावणी जलदगतीने करण्याची विनंती करावी, असे निर्देश दिले. याप्रकरणी हायकोर्ट सहानुभूतीपूर्वक विचार करेल, असेही न्यायालयाने आपल्या निकालात नमूद केले आहे.
समाजाला नोकरी आणि शिक्षणात १६ टक्के आरक्षण देण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिका निर्णयाअभावी प्रलंबित आहेत, असा आरोप करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती, त्यावर  आज सुनावणी झाली. आर. आर. पाटील फाऊंडेशनचे अध्यक्ष विनोद नारायणराव पाटील यांनी अ‍ॅड. संदीप देशमुख यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली होती.  न्या. ए. आर. दवे, आर. के. अगरवाल आणि एल. नागेश्वर राव यांच्या संयुक्त न्यायपीठाने या याचिकेवर १९ सप्टेंबर रोजी सुनावणी घेण्याचे निश्चित केले होते.
याचिकाकर्त्यांतर्फे बाजू मांडताना ज्येष्ठ विधिज्ञ जयंत भूषण यांनी सांगितले की, या प्रकरणी तातडीने सुनावणी होणे जरूरी आहे. कारण मराठा आरक्षणाच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाने १४ नोव्हेंबर २०१४ रोजी स्थगिती दिली आहे. एवढेच नाही तर सर्वोच्च न्यायालयाने निर्देश देऊनही अद्याप याप्रकरणी निर्णयही घेण्यात आलेला नाही. सर्वोच्च न्यायालयाने अपील निकाली काढत उच्च न्यायालयाला या मुद्यावर तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. मराठा समाज मागास आहे, या दाव्याच्या पुष्ट्यर्थ राज्य सरकारने सादर केलेल्या आकडेवारी व तपशिलात त्रुटी असल्याचे सांगून उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या निर्णयाला स्थगिती दिली होती.
दरम्यान, राज्यभऱात मराठा समाजाकडून मूक मोर्चे लाखांच्या संख्येने निघत असल्याने याप्रश्नी कायदेशीर मार्ग निघावा अशी अपेक्षा याचिकाकर्त्यांना होती. आता, राज्य सरकार मराठा आरक्षणासंदर्भात भक्कम भूमिका हायकोर्टात मांडेल आणि हायकोर्ट यासंदर्भात अपेक्षित निकाल देईल अशी आशा याचिकाकर्त्यांना आहे.

महाराष्ट्राच्या यवतमाळ जिल्ह्यातील चौथा सुपूत्र शहीद

0

विशेष प्रतिनिधी यवतमाळ,berartimes.com दि. १९ –   बारामुल्ला येथील भारतीय लष्कराच्या उरी ब्रिगेड मुख्यालयावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांची संख्या वाढली असून १८ जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्यात जखमी झालेले यवतमाळमधील विकास जनार्दन कुळमेथे यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. त्यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरू होते, अखेर आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. या हल्ल्यात काल एकूण १७ जवान शहीद झाले, त्यापैकी ३ जवान महाराष्ट्रातील होते. तर विकास जनार्दन कुळमेथे हे हल्ल्यात गंभीर जखमी झाले होते, त्यांच्यावर दिल्लीत उपचार सुरू होते. मात्र उपचारांदरम्यान आज त्यांचे निधन झाले. ते यवतमाळमधील वनी तालुक्यातील नेरडचे रहिवासी होते. उद्या त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

भाडीपार गावात डेंग्यूसदृश आजाराचे थैमान

0

सालेकसा : तालुक्यातील बोदलबोडी ग्रामपंचायत अंतर्गत भाडीपार या गावात अज्ञात आजारामुळे दोन दिवसात दोन लोकांचा बळी गेल्यामुळे भाडीपार गावासह संपूर्ण परिसरात एक दहशत पसरली आहे. तसेच या अज्ञात आजाराचा प्रकोप एवढ्या वेगाने वाढत चालला आहे. की आज गावातील ११ रुग्णांना तातडीने येथील ग्रामीण रुग्णालयात तर चौघांना गोंंदियाच्या केटीएस रूग्णालयात भर्ती करण्यात आले आहे. तसेच सातगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची आरोग्य चमू गावात दाखल झाली असून प्रत्येकाचे रक्त नमूने घेऊन औषधोपचार करीत आहे. आतापर्यंत या आजाराबद्दल नेमकी माहिती स्पष्ट झाली नसून हा आजार डेंग्यू आजार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. डेंग्यू जीवघेणा आजार असल्यामुळे सर्वत्र एकच दहशत पसरली आहे.

भाडीपार हे गाव वाघनदीच्या काठावर आहे. तालुक्यात चार दिवसापूर्वीच अतिवृष्टी झाली असून या अतिवृष्टीचा फटका भाडीपार गावाला सुद्धा बसला. गावात पुरग्रस्त स्थिती निर्माण झाली होती. पूर ओसरल्यानंतर गावात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले होते.

दुग्ध व्यवसायात धवल क्रांती घडवू-रामलाल चौधरी

0

भंडारा : शेतीला जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांसह बेरोजगारांनी दुग्ध व्यवसायाकडे वळावे. दुग्ध व्यवसायाने यशोगाथा निर्माण केली आहे. अशा या व्यवसायाची दुग्ध संघाच्या माध्यमातून धवल क्रांती घडवू असे प्रतिपादन जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघाचे जिल्हाध्यक्ष रामलाल चौधरी यांनी व्यक्त केले.

शहरातील मंगलम सभागृहात भंडारा जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघाची वार्षिक बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. सभेला माजी आमदार मधुकर कुकडे, माजी नगराध्यक्ष बशिर पटेल, जयंत वैरागडे, नामदेव सेलोकर, श्रीकृष्ण पडोळे, मुरलीमनोहर खंडेलवाल, माधव बांते, रामराव कारेमोरे, यादवराव कापगते, मारोती मस्के, दुलीचंद बिसने, सुमित हेडा, प्रणय झंवर, प्रशांत देशकर, गौतम बन्सोड, एन.डी. बोरकर, दुधराम भुरले, छाया पटले, संचालक सदाशिव वलथरे, महेंद्र गडकरी, नरेश धुर्वे, रामनारायण गाजीमवार, विनायक बुरडे, आशिष पातरे, लक्ष्मीकांत सेलोकर, संतोष शिवणकर, रिता हलमारे, अनिता येळणे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

यावेळी चौधरी यांनी दुग्ध संघाचे प्रतिनिधी व दूध पुरवठा करणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी यांच्या सहकार्यामुळे संघ प्रगतीकडे वाटचाल करीत आहे. संघाला भविष्यामध्ये उत्तरोत्तर प्रगतीकडे नेण्याचा मानस यावेळी त्यांनी व्यक्त केला. सभेचे संचालन व आभार संघाचे कार्यकारी संचालक करण रामटेके यांनी केले. सभेला संघाचे कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

महाराष्ट्रातील वृक्षारोपणाची लिम्का बुकमध्ये नोंद

0
मुंबई,दि. १९– महाराष्ट्रामध्ये राबविण्यात आलेल्या वृक्षारोपण उपक्रमाअंतर्गत 1 जुलै रोजी 2 कोटी 80 लाख रोपे लावण्याच्या विक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. राष्ट्रीय विक्रम म्हणून लिम्का बुकमध्ये हा विक्रम नोंदविण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्याचे वन खाते आणि सामाजिक वनीकरण विभागाने संयुक्तपणे हा उपक्रम राबविला. यामध्ये 1 जुलै रोजी केवळ बारा तासांमध्ये 2 कोटी 81 लाख 38 हजार 634 रोपे लावण्यात आली. त्यामध्ये राज्यातील जनतेने उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. सर्वसामान्य नागरिकांसह, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था आणि इतर सरकारी, खासगी संस्था, संघटनांनी वृक्षारोपण केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विक्रमाची नोंद झाल्याचे ट्विटरवरून आज जाहीर केले आहे. पर्यावरण रक्षणासाठी हातभार लावल्याबद्दल वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, वन सचिव, शासकीय अधिकारी व राज्यातील नागरिकांचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले.

उरी हल्ल्यात महाराष्ट्रातील तीन जवान शहीद

0
मुंबई, दि. १९ – उरीमध्ये रविवारी भारतीय लष्कराच्या तळावर झालेल्या आत्मघातकी दहशतवादी हल्ल्यात १७ जवान शहीद झाले. या शहीद जवानांमध्ये तीन जवान महाराष्ट्रातील आहेत. एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार  लान्स नायक चंद्रकांत शंकर गलांडे , शिपाई जानराव उईके आणि  शिपाई संदीप सोमनाथ ठोक अशी या जवानांची नावे आहेत.
चंद्रकांत शंकर गलांडे साता-याच्या जासी गावचे आहेत तर, जानराव उईके अमरावतीच्य नांदगावचे आणि संदीप सोमनाथ ठोक नाशिकच्या खडांगळीचे आहेत. सिन्नर तालुक्यातील खडांगळी गावच्या संदीप यांची दोन महिन्यापूर्वीच उरी येथे बदली झाली होती. तीनही जवानांचे पार्थिव विशेष विमानाने दुपारी पुणे येथे येईल. तिथून पार्थिव मूळगावी नेण्यात येईल. काश्मीर खोऱ्यात प्रत्यक्ष सीमारेषेपासून जवळच असलेल्या उरी शहरातील भारतीय लष्कराच्या एका तळात घुसून रविवारी आत्मघाती सशस्त्र दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात १७ जवान शहीद झाले. प्राणहानीच्या दृष्टीने अलीकडच्या काळातील लष्करी तळावरील हा सर्वांत भीषण हल्ला होता.  चारही हल्लेखोर पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मद या अतिरेकी संघटनेचे होते व त्यांच्याकडे पाकिस्तानी शस्त्रे होती, असे प्राथमिक तपासातून निष्पन्न झाले आहे.
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील खडांगळी गावात संदीपचे कुटुंब शेतात राहते. घरची सामान्य परिस्थिती असलेले संदीपचे वडील टेलरिंगचे काम करून शेती करतात, तर त्याचा मोठा भाऊही शेती करतो. संदीप हे सिन्नरमधील पाचवे हुतात्मा जवान आहेत. संदीप यांचे लग्न दिवाळीनंतर होणार होते. दोन महिन्यांपूर्वी ते आपल्या गावी आले होते. त्यानंतर ते पाच जुलैला पुन्हा कामावर रुजू झाले होते. या वेळी त्यांच्या लग्नाचे बोलणे झाले होते आणि त्यांचा विवाह दिवाळीनंतर करण्याचे ठरले होते. पण, आज त्यांचे स्वप्न अपूर्णच राहिले. सैन्यदलात स्वयंपाकी म्हणून काम करत असलेल्या संदीप यांची सैन्यदलात जाण्याची लहानपणापासून इच्छा होती. 2012 मध्ये ते सैन्यदलात भरती झाले होते. यापूर्वी ते बिहार रेजिमेंटमध्ये होते. त्यानंतर त्याची बदली 22 मराठा बटालियनमध्ये झाली होती. डेहराडूनहून नुकतीच त्यांची उरी येथील लष्करी तळावर बदली झाली होती.

न्यायासाठी सर्वपक्षीय ओबीसींनी एकत्र यावे-प्राचार्य तायवाडे

0

-८ डिसेंबरला नागपूर हिवाळी अधिवेशनावर ओबीसी मोर्चा
-२७ नोव्हेंबरला नागपूरात ओबीसी महिला मेळावा
नागपूर दि. १९: समाजातील सर्वात मोठा घटक ओबीसी असतानाही, सरकारने ओबीसींवर अन्यायच केला आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या माध्यमातून पुन्हा ओबीसींची शक्ती एकवटली आहे. ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय व्हावे, अशी मागणी सर्वस्तरावरून होत असल्याने या मागणीसाठी येत्या हिवाळी अधिवेशनावर ओबीसींचा भव्य मोर्चा ८ डिसेंबर रोजी काढण्यात येणार आहे. ओबीसींच्या न्यायासाठी सर्वपक्षात असलेल्या ओबीसी आघाडीच्या प्रतिनिधींनी, लोकप्रतिनिधींनी पक्षभेद विसरुन ओबीसींसाठी एकत्र यावे, असे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे संयोजक प्राचार्य बबनराव तायवाडे यांनी केले.
ते येथील धनवटे नॅशनल कॉलेजच्या सभागृहात आयोजित राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या विदर्भ स्तरीय पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्याथ्र्यांच्या बैठकीत रविवारी बोलत होते.
प्राचार्य तायवाडे म्हणाले की, ७ ऑगस्टला पार पडलेल्या ओबीसी महाअधिवेशनाची दखल राज्य सरकारलाच नव्हे तर केंद्र सरकारलाही घ्यावी लागली आहे. महाअधिवेशनाच्या यशानंतरच ओबीसी क्रिमिलीअर उत्पन्न मर्यादेचा शासन निर्णय मुख्यमंत्र्यांना स्वत: पुढाकार घेऊन काढावे लागले आहे. तर केंद्रामध्ये क्रिमिलीअरच्या उत्पन्न मर्यादेत वाढ करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. असे असले तरी आमच्यावर लादलेली असंवैधानिक क्रिमिलीअरची अट कायमची रद्द करण्यात यावी, ही मुळ मागणी असल्याचे म्हणाले. ओबीसींच्या विकासासाठी केंद्र व राज्यात ओबीसी मंत्रालयाची नितांत गरज आहे. तर केंद्र सरकार देत असलेले ओबीसी शिष्यवूत्तीची शंभर टक्के रक्कम विद्याथ्र्यांना देण्यात यावे. तसेच ५० टक्के कपात करणाèया अधिकाèयांवर कारवाई व्हावी, अशी भूमिका यावेळी व्यक्त केली. सोबतच येत्या २७ नोव्हेंबरला संविधान दिनाचे औचित्य साधून महिला मेळाव्याचे आयोजन करण्याची घोषणा यावेळी त्यांनी केली.
बैठकीला पूर्व विदर्भातून महासंघाचे व वेगवेगळ्या आघाडींचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. यात सचिन राजूरकर, शरद वानखेडे, बबलू कटरे, गुणेश्वर आरीकर, डॉ. एम.जी. राऊत, मनोज चव्हाण, महेंद्र निंबार्ते, गोपाल सेलोकर, भूषण दडवे, खेमेंद्र कटरे, अजय तुमसरे, डॉ. छाया दुरुगकर, निकेश पिने, प्रमोद मुन, विनोद उल्लीपवार, डॉ. छाया दुग्रकर, वैशाली बोकडे, कृष्णा देवासे, डॉ. गजानन धांडे, खुशाल बावणे, प्रा.रमेश पिसे, वैशाली काळे, अनिता ठेंगळी, डी.डी. पटले, प्रा. अमीत मांढरे, माजी आमदार सुदर्शन निमकर, गोविंद वरवाडे, पांडूरंग काकडे, उज्वला महल्ले, शामल चन्ने, राकेश रोकडे, निलेश कोडे, रोशन कुंभलकर, सुरेखा रडके, विनोद हजारे, राजेश ठाकरे, प्राचार्य टाले, प्रा.मस्के, संजय भिलकर, पन्नालाल राजपूत, अरविंद जायस्वाल, सूर्यकांत जायस्वाल, रमेश कोलते, प्रदीप कोल्हे, नाना लोखंडे, विजय तपाटकर आqदनी आपले विचार व्यक्त केले. तसेच मोर्चा अधिकाधिक व्यापक होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात बैठका, विदर्भस्तरीय महिला मेळावा व विद्याथ्र्यांचे अधिवेशन याच्या आयोजनासंदर्भातही चर्चा करण्यात आली. अभियात्रिकीमधील अ‍ॅरोनॉटिकल इंंजि.च्या ओबीसी विद्याथ्र्यांना नाकारण्यात आलेल्या शिष्यवृत्तीच्या विरोधात न्यायालयात जाण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचप्रमाणे नागपूर शहर आणि ग्रामीणमध्ये संघटन तयार करण्यासंदर्भात चर्चा करुन नागपुरातील प्रत्येक समाज भवनात ओबीसी महासंघाची बैठक आयोजित करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.