गोंदिया(berartimes.com):- जिल्हातील इलेक्ट्रोहोम्योपॅथी पदवीधारकांनी मेडीकल अशोसिएशन ऑफ इलेक्ट्रोहोम्योपॅथी जिल्हा गोंदिया च्या वतीने जिल्हाध्यक्ष डॉ के जी तुरकर यांच्या नेतृत्वात उप मुख्य कार्यपालन अधीकारी आर एल पुराम यांच्या उपस्थीतीत मा जिल्हा आरोग्य अधीकारीयांना निवेदन देण्यात आले.तसेच पोलीस अधिक्षक डाॅ.दिलीप भुजबळ पाटील यांनाही निवेदन देण्यात आले.जिल्हात बोगस डॉक्टर शोध मोहीम सुरु असल्याने ईएच च्या पदवीधारकांवर पोलीस प्रशासनाकडुन बोगस म्हणुन कार्यवाही करीत आहेत हि कार्यवाही त्वरीत थांबविण्यात यावी त्याकरीता पोलीस अधिक्षकांना निवेदन देण्यात आले. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णया नुसार व शासनाच्या खुलाशा नुसार ईएच पदवीधारक एम एम पी अॅक्ट १९६१अंतर्गत नोंदणी शिवाय व्यवसाय करु शकतात म्हणुन होणार्या कार्यवाहीवर तोडगा काढण्याकरीता निवेदन देण्यात आले.
न्यायालयाच्या निर्णया नुसार आपल्यावर बोगस म्हणुन कार्यवाही होणार नाही पण आपण आपल्या पॅथी मध्येच प्राक्टीस करावे व आरोग्य विभागाला सहकार्य करुन रुग्णांची माहीती द्यावी. त्याच प्रमाणे संघटनेकडुन ईएच पदवीधारकांची यादी लवकरात लवकर आरोग्य विभागाला देण्यात यावे जेणेकरुन आढावा बैठकीत आपला प्रश्न मार्गी सोडवून बोगस डॉक्टरच्या यादीतुन ईएच पदवीधारकांचे नाव वगळण्याचे आश्वासन आरोग्य अधिकारी यांनी दिली.यावेळी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ गणेश हरीणखेडे सचीव डॉ संतोष येवले सहसचीव डॉ बी एम पटले कोषाध्यक्ष डॉ राजेश तिवारी समन्वयक डॉ विनोद भगत डॉ सी एस भगत डॉ ओ टी भैरम डॉ गणेश बिसेन डॉ डोये डॉ बहेकार डॉ संदीप तुरकर डॉ एस एफ कटरे डॉ डी एल पटले डॉ जे टी रहांगडाले डॉ तरोणे डॉ ए के सैय्यद व गोंदिया जिल्यातुन सर्व तालुक्याचे पदाधीकारी व ईएच पदवीधारक असे दोनशे लोक ह्यावेड़ी प्रामुख्याने उपस्थीत होते।
इलेक्ट्रोहोम्योपॅथी पदवीधारकांचे डीएचओ,पोलीस अधिक्षकांना निवेदन
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात अनुकंपा पदभरतीस मान्यता – बबनराव लोणीकर
मुंबई : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील (एमजेपी) लिपिक-टंकलेखक पद भरतीवरील निर्बंध शिथील करुन गट- क मधील लिपिक-टंकलेखकांच्या एकूण रिक्त पदांच्या १० टक्के पदांवर अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती करण्यास प्राधिकरणाच्या नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आल्याची माहिती पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली.
श्री.लोणीकर म्हणाले, राज्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात गट- क ची १ हजार ४९३ इतकी मंजूर पदे असून, त्यापैकी ८९४ पदे भरण्यात आली आहेत. ५९९ पदे रिक्त आहेत. याउलट राज्यभरात एमजेपीअंतर्गत ५०५ अनुकंपा उमेदवार सध्या नेमणुकीच्या प्रतिक्षेत आहेत. यात गट-क साठी ३११ तर गट ड साठी १९४ अनुकंपा उमेदवार हे अर्हताप्राप्त आहेत. मागील काही वर्षात विविध प्रशासकीय कारणास्तव एमजेपीमधील अनुकंपा तत्त्वावरील पदभरती ही पूर्णत: थांबली होती. पण आता अर्हताप्राप्त अनुकंपा उमेदवारांना १० टक्के रिक्त जागांवर नियुक्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याची तातडीने अंमलबजावणी केली जाईल, असे ते म्हणाले.
सेवेत असताना मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याच्या निराधार कुटुंबास अनुकंपा तत्त्वाच्या आधारे दिलासा देण्याच्या हेतूने शासनामार्फत ही योजना राबविली जात असून एमजेपी कर्मचारी मात्र मागील काही वर्षापासून त्यापासून वंचित होते. आता यापुढील काळात ही पदभरती विनाविलंब केली जाईल, असे श्री.लोणीकर म्हणाले.
पीएमजीएसवाय कंत्राटी अभियंत्याच्या आंदोलनाला अॅड. अणेंचा पाठिंबा
गोंदिया,(berartimes.com)दि.29-कार्यस्थळापासून गावाकडे निघालेल्या प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतील कनिष्ठ अभियंता रुपेश दिघोरेसह राज्यात यापुर्वी सुध्दा मृत्यूमुखी पडलेल्या अभियंत्याच्या घटनेनंतर राज्यातील सर्व पंतप्रधान ग्रामसडक योजनेतील कंत्राटी अभियंत्यानी आपल्या नोकरीची पर्वा न करता सरकारच्या धोरणाविरोधात 25 आॅगस्टपासून कामबंद आंदोलन सुरु केले आहे.हे आंदोलन 2 सप्टेंबरपर्यत राहणार आहे.त्यानंतर सरकारने मागण्या मंजुर झाल्या नाही तर 6 सप्टेबंरपासून नागपूरातील सविंधान चौकात बेमूदत साखळी उपोषण करण्यात येणार आहे.
पीएमजीएसवायमधील अभियंत्यानी सुरु केलेल्या आंदोलनाची दखल विदर्भ राज्य आघाडीचे प्रमुख आणि महाराष्ट्राचे माजी अॅटर्नी जनरल अॅड.श्रीहरी अणे यांनी तुमसर येथे आपल्या सभेकरीता आले असता समर्थन जाहिर केले.सरकारने दखल न घेतल्यास विदर्भ राज्य आघाडी सुध्दा 6 सप्टेबंरपासूनच्या आंदोलनात पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या कंत्राटी अभियंत्याच्या आंदोलनात सक्रीय सहभाग नोंदवणार अशी ग्वाही पीएमजेएसवायच्या शिष्टमंडळाला दिली आहे.विदर्भ विकास आघाडीचे समन्वयक कमलेश भगतकर यांनी कंत्राटी अभियंत्याच्या समस्या जाणून घेऊन अॅड.श्रीहरी अणे यांच्यासोबत चर्चा घडवून आणण्यात महत्वाची भूमिका पार पाडली.कंत्राटी अभियंता संघटनेचे राज्य अध्यक्ष चंद्रकांत सोनवाने(पुणे),उपाध्यक्ष विकास डेकाटे(वर्धा),सचिव हर्षवर्धन पाटील तसेच वर्धेचे रोकडे,रत्नागिरीच्या चित्रा सावंत,नागपूरचे आशिष कराडे व संदेश बागडे,नंदुरबारचे पंकज विस्पुते,बीडचे विनोद जाधव,औरगांबादचे एस.आर.थडकर,पुण्याचे चंदु करंडे,चेतन शिंदे,भंडाराचे दिपक वैद्य,गडचिरोलीचे किरण नेमा,मुंगसे,अमरावतीचे अमित संघानी,यवतमाळचे अली,चंद्रपूरचे पाडेवार,गोंदिया अरविंद बिसेन,भुपेश तुरकर,राजेश येळे,मनोज काळे यांनी शासन स्पष्ट निर्णय जोपर्यंत घेत नाही,तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार असल्याचे कळविले आहे.
नागरीकर हल्ला प्रकरणातील आरोपीवर मकोका लावा
गोंदिया : तालुक्यातील नागरा येथील प्रतिष्ठीत नागरिक तथा भाजपा कार्यकर्ते राजेश नागरीकर यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाèया आरोपींवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करून नागरा येथील अवैध व्यवसाय बंद करण्यात यावे, अशी मागणी भाजपातर्फे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देवून करण्यात आली.
भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांच्या नेतृत्वात भाजपाच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांची भेट घेवून त्यांना नागरा येथील हल्ला प्रकरण व अवैध व्यवसायामुळे नागरा या धार्मिक गावातील होणारी भंग होणारी शांतता त्यांच्या निर्देशनास आणून दिली. दरम्यान मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे, भाजपाचे सक्रीय कार्यकर्ते राजेश नागरीकर यांच्यावर आरोपी प्रितलाल उर्फ मुन्ना पतेहै रा. नागरा व त्याच्या साथीदारांनी २७ ऑगस्ट रोजी रात्री दीडच्या सुमारास राजकीय व सामाजिक व्देषातून प्राणघातक हल्ला केला. सुदैवाने यात ते बचावले. आरोपी हा नागरा येथे जुगार, दारू, गांजा विक्रीचा अवैध व्यवसाय चालवित असून याविरोधात यापूर्वी भाजपा कार्यकत्र्यांनी अनेकदा आवाज उठविला व पोलीस विभागाला तक्रार केली. आरोपी प्रितलाल पतेहै याच्यावर यापूर्वी देखील अनेक प्रकरणी पोलिसात गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या अवैध व्यवसायामुळे व गुंडगिरीमुळे नागरा येथील धार्मिक वातावरणाला तडा जात असून गावातील शांतता भंग होत आहे. याबाबत आपण पोलीस विभागाकडे वारंवार तक्रार करीत असल्याने, तसेच राजकीय व सामाजिक व्देषातून राजेश नागरीकर यांच्यावर आरोपीने प्राणघातक हल्ला केला. त्यामुळे या आरोपींवर मकोका अंतर्गत कार्यवाही करण्यात यावी. तसेच नागरा येथील अवैध व्यवसाय बंद करण्यात यावे.
निवेदन देतांना भाजपा माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, राजेश नागरीकर, संजय मुरकुटे, सुभाष मुंदडा, पंकज सोनवाने, अजीत टेंभरे, अरqवद हरडे, गणेश पारधी, नोखलाल पाचे, मदनलाल चिखलोंडे, रणजितqसह गौर, दिनदयाल गायधने, अनिल रहांगडाले, योगेंद्र हरिणखेडे, बाबा चौधरी, देवानंद पटले, परसराम हुमे, मगनलाल ढेकवार, राजकुमार ढेकवार, बिहारीलाल लिल्हारे, मुकेश भेदरे, घनश्याम लिल्हारे, महेश चिखलोंडे, तेजलाल बघेले, नरेश बघेले, धन्ना बडगे, दिगंबर बनोटे, प्रदिप चौधरी, धनलाल बघेले, लक्ष्मण चौधरी, रूपेश दमाहे, दुर्गेश भोयर आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र विधीमंडळात “जीएसटी’ मंजूर
वृत्तसंस्था
मुंबई – महाराष्ट्र राज्याने आज (सोमवार) संसदेने संमत केलेल्या वस्तु व सेवा कर (जीएसटी) विधेयकास मान्यता दर्शविली. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने (भाजप) मांडलेल्या या विधेयकास सर्व राजकीय पक्षांनी मान्यता दर्शविली. विधानसभा व विधानपरिषद अशा दोन्ही सभागृहांत या विधेयकास आवाजी मतदानाने समर्थन दर्शविण्यात आले. जीएसटीस मंजुरी दर्शविणारे महाराष्ट्र हे देशातील दहावे राज्य आहे.
“जीएसटीमुळे केवळ “मेक इन इंडिया‘ मोहिमेस पाठिंबा मिळेल असे नव्हे; तर या विधेयकामुळे भारत एक बाजारपेठ होण्यास मदत होईल. जीएसटीमुळे देशातील वेगवेगळ्या स्वरुपाची कर आकारणी करणाऱ्या राज्यांमधील स्पर्धाही संपुष्टात येईल,‘ असे मत राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भातील प्रस्ताव विधानसभेत मांडताना व्यक्त केले.
उत्पादन व सेवा क्षेत्रांसहित ग्राहकाभिमुख व्यवसाय क्षेत्रामध्येही आघाडीवर असलेल्या महाराष्ट्रास या विधेयकामुळे विशेष फायदा होईल, असे अर्थमंत्री म्हणाले. देशाच्या एकूण सेवा क्षेत्रामध्ये महाराष्ट्राचा वाटा तब्बल 19.62% असल्याचे निरीक्षण मुनगंटीवार यांनी या पार्श्वभूमीवर नोंदविले. जीएसटी प्रणालीमध्ये राज्यातील एकूण 17 कर एकत्रित केले जाणार आहेत. यामध्ये मूल्यवर्धित कर (व्हॅट), जकात आणि इतर अनेक स्वरुपाच्या करांचा समावेश आहे. याचबरोबर, मद्य, मुद्रांकशुल्क आणि वीज या क्षेत्रांत कर (लेव्ही टॅक्स) आकारण्याचा राज्याचा अधिकार अबाधित राहणार आहे.
30 आॅगस्टपासून महा अवयवदान अभियान
गोंदिया, दि.२९ :- नाविन्यपुर्ण तंत्रज्ञानाच्या आधारे मानवी प्रत्यारोपणाव्दारे विविध गंभीर आजारांवर उपचार साध्य होत आहे. अवयवदानाअंतर्गत लाईव्ह ऑरगन डोनेशनव्दारे किडनी व लिव्हर प्रत्यारोपण करण्यात येते. मस्तिष्क स्तंभमृत पश्चात किडनी, लिव्हर, लग्ज, हार्ट व त्वचा इत्यादी अवयव दान करण्यात येतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील अवयव दानाचे महत्व जाणून रुग्णसेवेसाठी मोठया प्रमाणात अवयवदान जागृती करण्यासाठी अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डाॅ.अजय केवलिया यांनी पत्रकार परिषदेत आज सोमवारला दिली.पत्रपरिषदेला जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ.देवेंद्र पातुरकर, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांच्यासह वैद्याकिय महाविद्यालयाचे प्रा.डाॅ.कांबले,प्रा.डाॅ.रुखमोडे,डाॅ.जायस्वाल यांच्यासह वैद्यकिय अधिकारी उपस्थित होते.
सद्यस्थितीत राज्यात सुमारे १२ हजार पेक्षा जास्त रुग्ण अवयव मिळण्याच्या प्रतिक्षेत आहेत. जनतेतून अवयवदानाला चालना मिळावी यासाठी ३० ऑगस्ट ते १ सप्टेंबर २०१६ या कालावधीत महा अवयवदान अभियान- २०१६ राबविण्यात येणार आहे.
या अभियानात महा अवयवदानाबाबत जागृती करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, उच्च व तंत्र शिक्षण, महसूल, गृह, माहिती व जनसंपर्क या विभागाच्या सहकार्याने व समन्वयाने विविध उपक्रम राविण्यात येणार आहे.
मानवाला डोळे, त्वचा, यकृत, दृदय मुत्रपिंड व प्लिहा यासारख्या अवयवांची भेट मिळाली आहे. निसर्गाने दिलेली ही अवयवरुपी भेट मृत्यूनंतरही इतर गरजू रुग्णांना दान करता येवू शकते. मृत्यूच्या उंबरठयावर उभ्या असलेल्या अनेक रुग्णांना अवयवदानामुळे दुसरे जीवन जगण्याची संधी मिळू शकते.
महा अवयवदान अभियानातून जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होवून अवयवदान करावे व मृत्यूच्या उंबरठयावर असलेल्या असंख्य रुग्णांना जीवनदान दयावे असे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलीया यांनी केले आहे. अवयवदानाचे महत्व जाणून रुग्णसेवेसाठी अवयवदान करुन अनेक रुग्णांना जीवन जगण्याची संधी मिळवून देणा-या महा अवयवदान अभियानानिमित्त ३० ऑगस्ट रोजी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ८.३० वाजता शासकीय वैद्यकिय महाविद्यालय येथे गोंदिया शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी तसेच शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाचे विद्यार्थी,अधिकारी,प्राध्यापक व कर्मचारी वर्ग एकत्र होतील. तेथून अवयवदानाची जनजागृती करीत रॅली नेहरु चौक, गोरेलाल चौक, शहर पोलिस स्टेशन, गांधी पुतळा, जयस्तंभ चौक, जिल्हा न्यायालय मार्गे बाई गंगाबाई शासकीय स्त्री रुग्णालय येथे पोहोचेल. या रॅलीमध्ये सहभागी विद्यार्थी अवयवदानाचे महत्व पटवून देणा-या घोषणा देतील.मुलांच्या हाती असलेले संदेश फलक अवयवदानाचे महत्व पटवून देतील.
३१ ऑगस्ट रोजी शासकीय महाविद्यालय येथे सकाळी ८.३०ते सायंकाळी ६ वाजेपर्यत महा अवयवदान या विषयावर रांगोळी स्पर्धा, अवयवदान-महान कार्य या विषयावर सकाळी ११ ते दुपारी १२ या वेळेत शासकीय महाविद्यालयाचे व्याख्यान कक्षात निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी १२.३० वाजता अवयवदान- महान कार्य या विषयावर वक्तृत्व स्पर्धा तसेच पोस्टर्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्घे सहभाग घेऊ इच्छिणा-या स्पर्धकानी आवश्यक साहित्य सोबत आणावे.
१ सप्टेंबर रोजी शासकीय वैद्यकिय महाविद्यालय येथे सकाळी ८.३० ते सायंकाळी ६.०० या वेळेत रक्तदान शिबीर, अवयवदान अभियानाअंतर्गत मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा या विषयी कायदेतज्ञ व न्यायवैद्यकशास्त्र तज्ञ यांचे व्याख्यान, अवयवदान नोंदणी शिबीर,अभियानाअंतर्गत उत्कृष्ठ काम करणा-यांचा सत्कार व महा अवयवदान जनजागृती अभियानाचा समारोप करण्यात येणार आहे.
जलयुक्त शिवार ही लोकसहभाग मिळालेली यशस्वी योजना-मुख्यमंत्री फडणवीस
औरंगाबाद,दि.29,- जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून राज्यात तसेच मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साठे निर्माण झाले असून राज्यामध्ये जलयुक्त
शिवार ही लोकसहभाग मिळालेली सर्वांत मोठी योजना असल्याचे असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.ते फुलंब्री येथे जलयुक्त शिवार योजनेतगंत लोकसहभागातून झालेल्या फुलमस्ता नदी
खोलीकरण कामांचे जलपुजन प्रसंगी आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे,कामगार,भूकंप पुनवर्शसन कौशल्य विकास ,माजी सैनिक कल्याण विभागाचे मंत्री संभाजी पाटील निलंगेकर,खा.रावसाहेब दानवे,विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट,जिल्हावधकारी डॉ. निधी पांडेय,एकनाथ जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की शासनाने राज्य पाणी टंचाई मुक्त करण्यासाठी ही योजना सुरु केली.2019 पर्यंत राज्यातील पाणी टंचाई दूर करणाचे उविष्ट ठेवले असून राज्यात 20 हजार गावापैकी 4 हजार 500
गावे जलयुक्त झाली आहेत. या अभियानासाठी राज्यातील तज्ञ लोकाचे मार्गदर्शन मिळत असून हे अभियान सर्वत्र यशस्वी होत आहे.
गावातील सर्व लोक एकत्र येऊन लोकसहभागातून जलयुक्त शिवार अभियानात प्रभावीपणे सहभाग नोंदवीत आहेत. जलयुक्त शिवार अभियानामुळे राज्यात जलस्वातंत्र्याची क्रांती होत आहे. यामुळे मराठवाड्यात
परिवर्तन घडून येत असून पाणी टंचाई दूर होण्यास मदत झाली आहे. 2018 पर्यंत राज्यातील प्रत्येक गावातील ग्रामपंचायतींना डिजीटल करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून यामुळे प्रत्येक ग्रामपंचायत मंत्रालयस्तरापर्यंत जोडली जाईल. 17 हजार शाळा डिजीटल झाल्या असून सर्व शाळा डिजीटल स्वरुपाच्या करण्यात येतील.
जिल्हावधकारी डॉ. निधी पांडेय यांनी जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानात उत्कृष्ट काम केल्याबद्दल त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.सुरुवातीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विधानसभा अध्यक्ष श्री बागडे यांच्या उपस्थितीत फुलंब्री नहरालगत असलेल्या फुलमस्ता नदीचे जलपुजन करण्यात आले.
‘एक देश, एक टॅक्स’ ही भूमिका काँग्रेसची, भाजपने श्रेय लाटू नये : विखे पाटील
वृत्तसंस्था
मुंबई दि.29- संसदेने मंजूर केलेले वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) विधेयकाला महाराष्ट्रातूनही संमती देण्यासाठी राज्य विधिमंडळाचे एकदिवसीय विशेष अधिवेशन आज (साेमवारी) सुरुवात झाले आहे. या अधिवेशनात हे विधेयक मंजूर करण्याची केवळ अाैपचारिकता बाकी असून, शिवसेनेने विधेयकाला सशर्त पाठिंबा दिला आहे. दरम्यान, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोध करणार नसल्याचे स्पष्ट केले.
ज्या मोदींनी जीएसटीला विरोध केला, तेच त्या बाबत आज आग्रही : धनंजय मुंडे
विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे म्हणाले, ”काळाचा महिमा कसा असतो, ज्या मोदींनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना जीएसटीला विरोध केला, तेच देशाचे पंतप्रधान झाल्यावर जीएसटी बाबत आग्रही आहेत. राज्याच्या हिताला प्राधान्य देण्यासाठी जीएसटीला आमचा पाठिंबा असेल”, असेही म्हणाले.
कॉंग्रेसने श्रेय लाटू नये : राधाकृष्ण विखे पाटील
काँग्रेस पक्षच जीएसटीचा जनक काँग्रेस पक्षच आहे, त्यामुळे भाजपने या विधेयकाचे श्रेय लाटू नये, अशा शब्दांत विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपचा समाचार घेतला.
जीएसटी विधेयक आणून आपण नवीन काहीतरी करतोय, असे भासवण्याचा केंद्रातील मोदी सरकारचा प्रयत्न आहे. मात्र, केंद्रात काँग्रेसचे सरकार असताना 2010 मध्ये तत्कालीन अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी जीएसटीची संकल्पना सर्वप्रथम मांडली होती. ‘एक देश, एक टॅक्स’ ही भूमिका काँग्रेसची आहे. त्यामुळे भाजपने या विधेयकाचे श्रेय लाटू नये’, अशी तोफ विखेंनी डागली.
मुनगंटीवार यांनी केले विधेयक सादर
राज्याचे अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जीएसटी विधेयक विधानसभेत सादर केले. यावेळी ते म्हणाले, ”भ्रष्टाचार संपवण्यासाठी GST महत्त्वाचे आहे. सध्या जी जीवघेणी स्पर्धा पाहायला मिळते ती GSTमुळे कमी होईल. शिवाय करप्रणालीत सूसुत्रता येण्यासाठी जीएसटी महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले. तसेच जीएसटीमुळे राज्य आणि मुंबई महापालिकेच्या अधिकारांवर कोणतीही गदा येणार नाही, असे आश्वासनही मुनगंटीवार यांनी दिले. जीएसटी समितीत राज्यांच्या प्रतिनिधींची संख्या जास्त असल्यामुळे राज्यांना डावलणे अशक्य आहे. तसेच मुंबईच्या हिताची जबाबदारी माझी असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.
नेमके का बोलावले अधिवेशेन ? जीटीएस विधेयक घटनादुरुस्ती विधेयक असल्यामुळे त्याला देशातील सर्व राज्यांच्या विधिमंडळांच्या सभागृहांची मंजुरीही आवश्यक आहे. त्याप्रमाणे वेगवेगळ्या राज्यातील विधानसभांमध्ये हे विधेयक मांडण्यात येत असून, त्याला मंजुरी देण्याची औपचारिक प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे. दरम्यान, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक आयोजित करण्यात आली होती. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी आयोजित या बैठकीला अजित पवार, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील यांच्यासह विविध आमदार उपस्थित होते.या विधेयकाबाबत काही गोष्टींबाबत सरकारकडून उत्तरं घेणार असून काँग्रेस या विधेयकाला विरोध करणार नसल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.
सिंधू, साक्षी, दीपाला खेलरत्न पुरस्कार प्रदान
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, दि. २९ – रिओ ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी करणा-या पी.व्ही. सिंधू, साक्षी मलिक, दीपा कर्माकर आणि नेमबाज जीतू राय यांना सोमवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या हस्ते राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राजीव गांधी खेल रत्न हा भारतीय क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे. राष्ट्रपती भवनात सुरु असलेल्या या कार्यक्रमात खेल रत्न, द्रोणाचार्य आणि अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात येत आहेत. महाराष्ट्राची धावपटू ललिता बाबरला राष्ट्रपतींनी अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले.
खेलरत्न पुरस्कार
रिओ ऑलिम्पिकमध्ये महिला कुस्तीमध्ये कांस्यपदक मिळवणा-या साक्षी मलिकला राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या हस्ते वर्ष २०१६ साठीचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार प्रदान.
नेमबाज जीतू रायला राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या हस्ते वर्ष २०१६ साठीचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार प्रदान.
रिओ ऑलिम्पिकमध्ये वॉल्ट जिमनॅस्टीक्स प्रकारात चौथे स्थान मिळवणा-या दीपा कर्माकरला राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या हस्ते वर्ष २०१६ साठीचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार प्रदान.
रिओ ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेत्या पी.व्ही.सिंधूला राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या हस्ते वर्ष २०१६ साठीचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार प्रदान.
अर्जुन पुरस्कार
टेबलटेनिसपटू सौम्यजित घोष अर्जुन पुरस्काराने सन्मानित.
महिला नेमबाज अपूर्वी चंदेला अर्जुन पुरस्काराने सन्मानित.
नेमबाज गुरप्रीत सिंग अर्जुन पुरस्काराने सन्मानित.
भारतीय हॉकीपटू रघुनाथ वोक्कालिगा अर्जुन पुरस्कारने सन्मानित.
भारतीय महिला हॉकी संघाची माजी कर्णधार राणी रामपालला अर्जुन पुरस्कार प्रदान.
फुटबॉलमध्ये सुब्रतो पॉललआ अर्जुन पुरस्कार प्रदान.
बॉक्सर शिव थापाला अर्जुन पुरस्कार प्रदान.
बिलियडर्स, स्नूकरसाठी सौरव कोठारीला अर्जुन पुरस्कार प्रदान.
धावपटू ललिता बाबरला राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या हस्ते २०१६ साठीचा अर्जुन पुरस्कार प्रदान.
रजत चौहानला अर्जुन पुरस्कार प्रदान.
द्रोणाचार्य पुरस्कार
कुस्ती प्रशिक्षक महावीर सिंग द्रोणाचार्य पुरस्कारने सन्मानित.
भारतीय जलतरण संघाचे प्रशिक्षक प्रदीप कुमार यांना द्रोणाचार्य पुरस्कार प्रदान.
दीपा कर्माकरचे प्रशिक्षक बिश्वेश्वर नंदी यांना द्रोणाचार्य पुरस्कार.
विराट कोहलीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांना द्रोणाचार्य पुरस्कार प्रदान.
नागापुरी रमेश यांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या हस्ते वर्ष २०१६ साठीच्या द्रोणाचार्य पुरस्कार प्रदान.
युवा स्वाभीमानच्या दहिहंडीला सैराट च्या टीमने लावले वेड
अमरावती,दि.29-संपूर्ण मराठी चित्रपट श्रुष्टीत मराठी माणसाला याड लावणारी सैराट टीम अमरावती येथील आमदार रवि राणा यांच्या युवा स्वाभिमानने आयोजित केलेल्या दहिहंडी स्पर्धेत हजेरी लावली, सर्व तरुणांची आवडते आर्ची, परशा, लंगड्या आणि सल्याला पाहण्यासाठी तरुणांनी अलोट गर्दी केली होती.
अमरावती येथील स्थानिक राजापेठ येथे दरवर्षी आमदार रवि राणा यांची युवा स्वाभिमान द्वारा विदर्भ स्तरीय दहीहंडीचे आयोजन केल्या जाते. यावर्षी सैराट टीम येणार असल्याने नागरिकांनी व महाविद्यालयीन तरुणांनी सकाळ पासूनच मोठी गर्दी केलि होती. सैराट टीम स्टेजवर येताच डीजेच्या तालावर “झाल झिंग झिंग झिंगाट” गाण लागताच तरुणांनी व सैराट टीमने एकच ताल धरला.तरुणांसोबत संवाद साधताना सैराट चित्रपटातील प्रसिद्ध “काय बघतोय रे….” हा डायलॉग आकाश ठोसर, रिंकू राजगुरु यांनी त्यांच्या ख़ास शैलितुन सादर केला. यावेळी अंबा नागरीतील तरुण तरुणी सैराट पहायला मिळाले.
लाखो रुपयांच्या अनेक बक्षीसा सोबत हा सोहळा पार पडला. यावेळी आमदार रवि राणा यांच्या सुपुत्रीचा नामकरण विधि सर्व धर्मीय धर्मगुरुच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी रणवीर रवि राणा असे नामकरण करण्यात आले.aसोबतच आपली राजापेठ येथील दहिहंडी स्वतंत्र विदर्भाला समर्पित आहे असे यावेळी रवि राणा यानी घोषित केले.यावेळी लाखो च्या वर जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी आमदार रवि राणा, नवनीत राणा, चंद्रकुमार जाजोदिया, विनोद गुहे, नगर सेवक विजय नागपुर, सुनील काळे या सह अनेक नागरिक उपास्थि होते.