40.9 C
Gondiā
Saturday, May 11, 2024
Home Blog Page 5956

मराठा आरक्षणाच्या नव्या विधेयकाला विधानसभेची मंजुरी

0

नागपूर : मराठा आरक्षणाच्या नव्या विधेयकाला विधानसभेत मंजुरी मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाचं हे विधेयक मांडलं. यावर विधानसभेनं सकारात्मक प्रतिसाद देत मंजुरी दिली आहे.

उच्च न्यायालय आणि त्यापाठोपाठ सर्वोच्च न्यायालयानं देखील मराठा आरक्षणावर स्थगिती कायम ठेवल्यानंतर, सरकारनं नवं विधेयक आणण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार आता न्यायालयाच्या नकारानंतर मराठा आरक्षण विधेयकाचा नवा मसुदा तयार करण्यात आला आहे.

आघाडी सरकारच्या विरोधात मतं तयार करताना युतीच्या नेत्यांनी या मुद्याला हत्यार बनवलं होतं. त्यामुळं शेवटच्या काळात का होईना काँग्रेसला मराठा आणि मुस्लिम समाजाला आरक्षण द्यावंच लागलं. पण, कायद्याली त्रुट्या आणि चुका यामुळं उच्च न्यायालयानं मराठा समाजाला आरक्षण देण्याला स्थगिती दिली. उच्च न्यायालयाच्या या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयानंही मोहोर उमटवल्यानं, सरकार कोंडीत सापडलं होतं.

आता याच मराठा आरक्षणावरुन सरकारविरोधात राजकीय वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळंच आता नव्या विधेयकाच्या माध्यमातून कायद्यात दुरुस्ती करण्याचा सरकारचा विचार आहे. पुन्हा एकदा मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार पुढे सरसावलं आहे. आता याला कोर्टाकडून काय प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

मुस्लिम आरक्षणाचा समावेश नसल्यानं गोंधळ :
दरम्यान मराठा आरक्षणाचं विधेयक सादर करताना, मुस्लिमांच्या आरक्षणाचा कुठलाच उल्लेख न केल्यानं विधानसभेत विरोधकांनी चांगलाच गोंधळ घातला. आघाडी सरकारनं मराठ्यांसोबतच मुस्लिमांना देखील आरक्षणाचा निर्णय घेतला होता.पण युती सरकारनं आज मराठा आरक्षणाचं विधेयक सादर करताना, मुस्लिम आरक्षणाचा उल्लेख टाळल्यानं विरोधकांना जोरदार गोंधळ घातला. त्यामुळं दिवसभरातून तिसऱ्यांदा विधानसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं आहे.

कोण म्हणतं शिक्षण हक्क कायदा लागू आहे?

0

राज्यात शिक्षण हक्क अधिकार कायदा लागू आहे का? असा जर कोणी प्रश्न विचारला तर त्याला सकारात्मक उत्तर मिळणे कठीण आहे. नव्हे तर बहुतांश पालकांना आणि शिक्षणतज्ज्ञांना जरी विचारले तरी ते म्हणतील, ‘कुठे आहे कायदा?’ या कायद्यासंदर्भातील खदखद केवळ शिक्षक, पालक, शिक्षणतज्ज्ञ यांच्यातच निर्माण झालेली आहे असे नाही. ज्यांच्यावर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आहे, तेही तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत आहेत. एकूणच चित्र हे भयानक आहे.
Right to Educationसमाजातील शेवटच्या स्थरातील मुलांनाही हक्काचे शिक्षण कायद्याने मिळवून देणा-या या कायद्याची राज्यात खूप फरफट होत असून गरीब, आर्थिक दुर्बल आणि विविध प्रवर्गातील शेकडो विद्यार्थ्यांना कायद्याने शिक्षण हक्काची तरतूद असतानाही त्यांना अधिकार मिळवून देण्यास राज्य शालेय शिक्षण विभाग पूर्णपणे अपयशी ठरला आहे.
समाजातील प्रत्येक घटकांमधील बालकांना शिक्षणाचा अधिकार मिळावा हा उदात्त हेतू समोर ठेवून मागील केंद्र सरकारने बालकांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार हा कायदा केला होता. देशात शिक्षणाच्या क्षेत्रात निर्माण झालेली श्रीमंत आणि गरिबांच्या विद्यार्थ्यांची दरी यानिमित्ताने तरी कमी करता येईल आणि शेवटच्या स्तरातील विद्यार्थ्यांनाही शिक्षणाचा हक्क मिळवून देता येईल, ही भूमिका त्यामागे होती. मात्र या भूमिकेला राज्यात हरताळ फासला गेला आहे. शिक्षण हक्क अधिकार कायद्याची अंमलबजावणी आपल्या राज्यात सुरू होऊन तीन वर्षाचा कालावधी पूर्ण झाला असताना नेमके या कायद्याने काय साधले? किती आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिला? त्यांना कोणकोणत्या इंटरनॅशनल शाळांमध्ये कायद्याने मिळालेले प्रवेश मिळवून दिले? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जर तपासून पाहिली तर केवळ नकारात्मक उत्तरेच मिळतील. यामुळेच या तीन वर्षात या कायद्यातील प्रत्येक तरतुदीला जितक्या प्रमाणात वाटोळे करून गोंधळ घालता येईल तितका गोंधळ घालण्यात शालेय शिक्षण विभागाला यशस्वी ठरले आहे, असे म्हटले गेले तर फारसे वावगे ठरणार नाही.
शालेय शिक्षण विभाग या कायद्यानंतर खूपच चर्चेत आला. याला अनेक कारणे असली तरी तीन वर्षानंतरही हा कायदा आणि त्यातील तरतुदींचा प्रत्येक अधिकारी स्तरावर आपापल्या मर्जीने अर्थ घेतला गेला हे मुख्य कारण यामागे आहे. ज्यावर गांभीर्याने चर्चा होणे आवश्यक असताना ती अद्यापही होत नाही. आणि केली तरी त्याची म्हणावी तशी दखलही घेतली जात नाही. शिक्षण आयुक्त असो, अथवा शिक्षणाधिकारी. जो-तो आपल्या मर्जीने या कायद्याच्या संदर्भात निर्णय घेतो. वाट्टेल तसा अर्थ लावला जातो. यासाठी अनेक उदाहरणे देता येतील. शिक्षण हक्क अधिकार कायद्यात किमान ४० विद्यार्थ्यांच्या मागे एक शिक्षक असावा असे कडक निर्बंध असतानाही शिक्षण विभागाने ते धुडकावून ही संख्या ६० वर नेली, यामुळे एक-दोन नाही तर तब्बल ६० हजारांच्या दरम्यान शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त ठरविण्याची प्रक्रिया सुरू केली गेली. तोच प्रकार, शिक्षकेतर कर्मचा-यांच्या संदर्भात झाला. यामुळे या कायद्याच्या संदर्भात नेमके काय सुरू आहे हे कोणताही अधिकारी ठामपणे सांगू शकेल, असे राज्यात दिसणार नाही.
कायदा नीट न समजल्यामुळे जुने कायदे, परिपत्रक, निर्णय, अधिनियम, विविध समित्यांनी केलेल्या शिफारसींचीही गरज पडल्यास वाट्टेल तसे धाब्यावर बसविले गेले. अतिरिक्त शिक्षक, संचमान्यता, शाळांसाठीच्या सोयी-सुविधा, शिक्षणातील गुणवत्ता, प्राथमिक, पूर्व प्राथमिकचे प्रवेश आदी अनेक विषयांमध्ये सरमिसळ करण्यात आली. कायद्यातील तरतुदी काय आहेत, याचा दुरान्वयानेही संबंध नसताना अनेक विषयांवर गोंधळ माजवला गेला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा प्रश्न पद्धतशीरपणे बाजूला सारून केवळ सोयी-सुविधांच्या विषयावर खलबते केली गेली. परिणाम काय होत आहेत, याचा विचारच गाडला गेला. तर दुसरीकडे देशात केंद्रीय मंडळाच्या शाळांनी केलेल्या प्रयोगाच्या पलीकडे जाऊन शैक्षणिक गुणवत्तेसाठी काय करता येईल, याकडे लक्ष दिले गेले नाही. उलट ठरावीक अधिका-यांना आणि काही संस्थांना, संस्थाचालकांना घेऊन गणित, इंग्रजी विषयांच्या प्रशिक्षणासाठीचा हिशोब मांडून लाखो रुपये लाटले गेले. आणि जो मुख्य प्रश्न होता, गुणवत्ता आणि आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा तो मात्र न सोडविता अधिकाधिक जटिल करण्यातच शिक्षण विभागाने धन्यता मानली.
कायद्याने तरी आमच्या पोरांना शाळांमध्ये प्रवेश द्या हो! असा टाहो फोडून शेकडो पालकांनी शिक्षणाधिकारी कार्यालयांच्या पाय-या झिझवल्या, तरीही प्रवेशाची जबाबदारी असलेल्या शिक्षणाधिका-यांना पाझर फुटला नाही. ज्या शाळा मोकाटपणे कायद्याला डावलून प्रवेश नाकारत होत्या, त्यांपैकी एकाही शाळेवर शिक्षण विभागाला कारवाई करता आली नाही. नव्हे तर ती केली नाही. आता तर पुढील शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर होण्यापूर्वीच खासगी शिक्षण संस्थांनी आपले प्रवेश सुरू केले असून प्राथमिक शिक्षण विभाग मात्र सर्व काही अलबेल असल्याच्या आविर्भावात आहे. खासगी शाळांतील सर्व प्रवेश संपल्यानंतर हा विभाग हळूच कार्यक्रम जाहीर करेल आणि तेव्हा कुठे ऑनलाइन, लॉटरी पद्धतीने प्रवेशाचे सोंग सुरू होईल. मात्र तोपर्यंत मोठ्या आणि श्रीमंत शाळांतील जागाच शिल्लक राहणार नाहीत. यासाठी अजूनही हातात वेळ आहे, तो जाणार नाही याची दखल जर शिक्षण विभागाने घेतली तर मागील तीन वर्षात ज्या चुका प्रवेशाच्या संदर्भात झाल्या त्यात काही तरी सुधारणा करण्याची संधी मिळेल यात शंका नाही.(साभार प्रहार)

पीडीपीशी युती करण्यास काँग्रेसची तयारी

0

पीटीआय
नवी दिल्ली-जम्मू-काश्मीर विधानसभेच्या मंगळवारी जाहीर झालेल्या निकालानंतर काँग्रेस पक्षाने सत्तास्थापनेसाठी पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीला (पीडीपी) पाठिंबा देण्याची तयारी दाखविली आहे. जनतेने कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत न दिल्यामुळे राज्यात त्रिशंकू अवस्था निर्माण झाली आहे. पीडीपी आणि भाजप या दोन्ही पक्षांना जनतेचा कौल विभागून मिळाल्याने एकाही पक्षाला स्वबळावर सत्ता स्थापन करता येणार नाही. त्यामुळे बहुमताचा आकडा गाठण्यासाठी इतर पक्षांची मदत घेणे अपरिहार्य झाले आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी आम्ही पीडीपीला पाठिंबा देण्यास तयार असल्याचे सांगितले. काँग्रेसने यापूर्वीही पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्स या पक्षांशी युती केली होती. मात्र, काँग्रेस कोणत्याही परिस्थितीत भाजपशी युती करणार नसल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले. यापूर्वी काँग्रेस आणि पीडीपी सत्तेत एकत्र होते, मात्र, अमरनाथच्या मुद्द्यावरून ही युती संपुष्टात आली होती.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात गुलाम नबी आझाद काँग्रेसचा मुख्य चेहरा होते. विधानसभेच्या निकालांवरून पीडीपी हा राज्यात सर्वात जास्त जागा जिंकणारा पक्ष ठरणार, हे स्पष्ट झाल्यानंतर गुलाम नबी आझाद यांनी ही प्रतिक्रिया दिली. तब्बल २९ जागांवर आघाडीवर असणाऱ्या पीडीपीला सत्तास्थापनेसाठी काँग्रेस किंवा भाजपची मदत घेणे अपरिहार्य आहे.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ७ टक्के महागाई भत्ता?

0

नागपूर-राज्यातील शासकीय व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांना ७ टक्के वाढीव महागाई भत्ता देण्याचे प्रस्तावित आहे. त्याबाबतचा लवकरच निर्णय अपेक्षित असून नव्या सरकारकडून कर्मचाऱ्यांना ही नववर्षांची भेट असेल, असे मानले जात आहे. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपताच त्याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता सूत्राकडून व्यक्त करण्यात आली.
केंद्र सरकारच्या वतीने एकदा जानेवारीला व दुसऱ्यांदा जुलैमध्ये असा वर्षांतून दोन वेळा आपल्या कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता जाहीर केला जातो. केंद्राने जाहीर केलेला भत्ता राज्य सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना जसाच्या तसा आणि त्याच तारखेपासून लागू करण्याचा राज्य सरकारनेही पूर्वीच धोरणात्मक निर्णय घेतला आहे. आघाडी सरकारमधील मधला काही कालखंड सोडला तर, राज्य कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे महागाई भत्ता वाढ दिली जाते. केंद्र सरकारने १ जुलै २०१४ पासून आपल्या कर्मचाऱ्यांना ७ टक्के महागाई भत्तावाढ जाहीर केली आहे. ही वाढ राज्य कर्मचाऱ्यांना लगेच लागू करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे नेते ग.दि. कुलथे, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचे सरचिटणीस सुभाष गांगुर्डे, जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे नेते शरद भिडे व अन्य संघटनांनी मुख्यमंत्र्यांना स्वंतत्र निवेदने देऊन केली होती. त्यानुसार वित्त विभागाने तसा सकारात्मक प्रस्ताव तयार केल्याचे समजते.

जम्मू काश्मिरात पीडीपी भाजपमध्ये युतीची शक्यता

0

नवी दिल्ली- जम्मू आणि काश्मिरच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आता जवळपास स्पष्ट झालाय. कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळू न शकल्यामुळे त्रिशंकू परिस्थिती निर्माण झालीये. मात्र, पीडीपी हा सगळ्या मोठा पक्ष ठरलाय. पीडीपीने सर्वाधिक 29 जागा जिंकल्या आहे. तर भाजपने दुसर्‍या स्थानावर झेप घेत 27 जागा पटकावल्या आहे. नॅशनल कॉन्फरन्सने 16 जागा जिंकल्या आहे. त्यामुळे पीडीपीला कुणाचा तरी पाठिंबा घेऊन सरकार स्थापन करावे लागणार आहे. त्यामुळे काही शक्यता निर्माण झाल्या आहे.

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या 87 जागांसाठी मतमोजणी आता अंतिम टप्प्यात आलीये. बहुमतासाठी 44 जागांचा आकडा गाठणे आवश्यक आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार पीडीपी 29, भाजप 25, नॅशनल कॉन्फरन्स 11 आणि अपक्षांनी 7 जागा जिंकल्या आहे. पहिली शक्यता पडताळून पाहिली तर पीडीपी आणि भाजप एकत्र येऊन सरकार स्थापन करू शकतात. पीडीपीच्या 29 आणि भाजपच्या 27 जागा मिळून 56 जागा होता. त्यामुळे सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा होता. दुसरी शक्यता अशी की, पीडीपीने काँग्रेसशी हातमिळवणी केली तर पीडीपीच्या 29 जागा आणि काँग्रेसच्या 11 जागा मिळून 40 जागा होत्यात. पण तरीही आणखी 4 जागा लागतील. यासाठी अपक्षांचा पाठिंबा घ्यावा लागेल. त्यामुळे आता किंगमेकरची भूमिका कोण साकरणार हेही महत्वाचं ठरणार आहे. विशेष म्हणजे पीडीपीच्या नेत्यांनी भाजपला सोबत घेण्यात काहीही गैर नाही असं विधान केलंय. जर पीडीपी आणि भाजप एकत्र आले तर चित्र स्पष्ट होईल.

जम्मू-काश्मीर विधानसभेचा आखाडा

एकूण जागा = 87
बहुमताचा आकडा = 44

शक्यता 1: (सर्वांत अधिक शक्यता)
पीडीपी 29 + भाजप 27 = 54

शक्यता 2:
पीडीपी 29 + काँग्रेस 11 = 40

शक्यता 3: (कमी शक्यता)
भाजप 27 + नॅशनल कॉन्फरन्स 16 + इतर 4 = 47

कश्मीर व झारखंडमध्ये काँग्रेसला धक्का

0

नवी दिल्ली-लोकसभा निवडणुकीत लाजिरवाण्या पराभवाला सामोरं गेलेल्या काँग्रेसची परिस्थिती अजूनही काही सुधारलेली नाही. जम्मू काश्मीर आणि झारंखडमध्ये मतदारांनी पुन्हा एकदा काँग्रेसला नाकारून चांगलाच धक्का दिलाय. दोन्ही राज्यात काँग्रेसचा पराभव झालाय. काश्मीरमध्ये काँग्रेसने कसाबसा दुहेरी आकडा गाठला तर झारखंडमध्ये सुपडा साफ झालाय. त्यामुळे पुन्हा काँग्रेसला हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवण्याची वेळ आलीये.
15 वर्षांपासून सत्तेत असलेल्या काँग्रेसला जनतेनं स्पष्ट नकार देत ‘घरचा रस्ता’ दाखवला. आज जम्मू-काश्मीर आणि झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली. इथं मोदी मॅजिकपुढे काँग्रेस गारद झाली. जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेसला 12 जागा मिळाल्यात तर झारखंडमध्ये 9 जागांवर समाधान मानावे लागले. 2009 च्या निवडणुकीत काश्मीरमध्ये काँग्रेसला 17 जागा पटकावल्या होत्या तर झारखंडमध्ये 21 जागा जिंकल्या होत्या. मागील निकाल पाहता काँग्रेसला चांगलाच पराभवाचा धक्का बसलाय.
लोकसभा निवडणूक आणि महाराष्ट्र, हरियाणामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा सुपडा साफ झाला. यूपीए सरकारने सलग दोन टर्म सत्ता उपभोगली खरी पण लोकसभेच्या रणांगणात मोदी लाटेपुढे यूपीएचं ‘जहाज’ तळाला लागलं. भाजपने स्पष्ट बहुमत मिळवत दिल्लीचे तख्त राखले. काँग्रेसला लोकसभेत विरोधी पक्षाची जागाही मिळाली नाही. महाराष्ट्रातही काँग्रेसचं पानिपत झालं.

मुंडे विधानपरिषदेतील सर्वात तरूण विरोधी पक्षनेते

0

नागपूर: विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांची वर्णी लागली आहे. विधानपरिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांनी मुंडे यांच्या नावाची घोषणा केली. धनंजय मुंडे हे विधानपरिषदेतील सर्वात तरूण विरोधी पक्षनेते ठरले आहेत.
यापूर्वीच राष्ट्रवादीनं विरोधी पक्षनेतेपदासाठी धनंजय मुंडेंचं नाव पुढे केलं होतं. त्याची औपचारीक घोषणा करण्यात आली.सध्या विधान परिषदेमध्ये राष्ट्रवादीचे 28 आमदार आहेत. त्यामुळं त्यांची निवड करण्यात आली आहे.
एकीकडे राष्ट्रवादीनं विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपद मिळवलंय. पण विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद कुणाकडे जाणार हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोघांनीही संख्याबळाच्या जोरावर ह्या पदावर दावा केला आहे. मात्र यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांनी आतापर्यंत कुठलाही निर्णय घेतलेला नाही.

मराठी भाषेला अभिजात दर्जा केंद्र सरकार

0

नवी दिल्ली – महाराष्ट्र सरकारने सादर केलेला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव विचारात घेतला असल्याची माहिती केंद्र सरकारने सोमवारी दिली आहे. महाराष्ट्र सरकार व अभिजात मराठी भाषा समितीकडून मराठीला अभिजात दर्जा देण्याबाबतचा प्रस्ताव मिळाला आहे का, असा प्रश्न लोकसभेत विचारण्यात आला होता. त्यावर सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा म्हणाले, महाराष्ट्र सरकारच्या मराठी विभागाचा प्रस्ताव विचाराधीन आहे. तथापि, समितीकडून तसा प्रस्ताव नाही.

अभिजात भाषेचे निकष
भाषेची प्राचीनता १५०० ते २००० वर्षे जुनी असावी. लिखित इतिहास असावा. भाषेची मौलिकता व सलगता असावी. प्राचीन वाङ््मयाची सांगड घातलेली असावी. तो भाषकांकडून मौलिक वारसा म्हणून जतन केला जात असावा. भाषा स्वयंभू असावी. तसेच प्रवाही असावी. ती इतर भाषिक समूहांकडून उचललेली नसावी. प्राचीन व आधुनिक भाषा यातील परस्परसंबंध ठसठशीतपणे दिसून यायला हवा.

मराठीचे बोलू कौतुके
09 कोटी लोक जगभरात बोलतात
04 क्रमांकाची भारतातील भाषा
10 व्या क्रमांकाची भाषा जगामध्ये
72 देशांत मराठी बोलली जाते.
01 लाख पुस्तके प्रकाशित.

अभिजात भाषा दर्जासाठी समितीचा मोठा अहवाल

माजी मुख्यमंत्री मधु कोडा मझगावमधून पराभूत

0

रांची – विधानसभा निवडणुकीत झारखंडमध्ये भाजपने आघाडीकडे कूच केली असल्याचे चित्र समोर आले आहे. पाच टप्प्यात झालेल्या मतदानाप्रक्रियेनंतर सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. एक्झिट पोलने व्यक्त केलेल्या अंदाजांनुसार राज्यात भाजपला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. तसेच काहीसे निकाल हाती येताना दिसत आहेत. भाजप बहुमताच्या अगदी जवळ पोहोचला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली आहे. झारखंडचा पहिला निकालही हाती आला असून माजी मुख्यमंत्री मधु कोडा मझगाव विधानसभा मतदारसंघातून पराभूत, झाले आहेत. जेएमएम पक्षाचे निरल पूर्ती यांनी त्यांचा पराभव केला.

विधानसभेच्या विरोधीपक्ष नेतेपदी पाटील यांची निवड

0

नागपूर – राज्यात सत्ता स्थापन झाल्यानंतर अखेर राज्याला विरोधीपक्ष नेता मिळाला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांची विरोधीपक्ष नेतेपदी घोषणा करण्यात आली आहे. विधानसभा सभापती हरिभाऊ बागडे यांनी ही घोषणा केली आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकांनंतर भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला. भाजप-शिवसेना यांच्यातील युती तुटल्यामुळे शिवसेना विरोधी पक्षात बसणार की काय? अशी शक्यता सर्व घडामोडींवरून व्यक्त करण्यात येत होती. त्यामुळे विरोधी पक्ष नेतेपदाबाबत कोणतीही ठाम भमिका घेण्यात येत नव्हती. पण हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर शिवसेना सत्तेत सहभागी झाल्यानंतर काँग्रेस किंवा राष्ट्रवादीपैकी एका पक्षाच्या नेत्याच्या गळ्यात विरोधी पक्षनेतेपदाची माळ पडणार हे निश्चित झाले होते. मात्र तरीही हा निर्णय वाटतो तेवढा सोपा नव्हता. त्याचे कारण म्हणजे विरोधकांचे संख्याबळ हे आहे.
विरोधकांमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसचे 42 आमदार आहेत. त्यामुळे काँग्रेसता विरोधीपक्ष नेता घोषित करण्याची मागणी येत होती. पण दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचेही 39 आमदार होते. त्याचबरोबर त्यांना शेतकरी कामगार पक्षाच्या 3 आमदारांनीही पाठिंबा दर्शवला होता. त्यामुळे त्यांचेही संख्याबळ 42 वर जात असल्याने प्रेचप्रसंग निर्माण झाला होता, असे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे म्हणाले आहेत. मात्र, यासंदर्भात सखोल चर्चा करून तसा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.