32.4 C
Gondiā
Saturday, May 11, 2024
Home Blog Page 5993

खासदारांच्या प्रश्नावर सरकार सकारात्मक विचार करणार-फडणवीस

0

मुंबई – केंद्राकडे प्रलंबित असलेल्या राज्याच्या प्रश्नांवर “सह्याद्री‘ अतिथिगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन त्यात अशा महत्त्वपूर्ण प्रश्नांचा गांभीर्यपूर्वक पाठपुरावा करण्याचे ठरले.यावेऴी आम्ही शासनाच्या विविध विभागांना मागणी, सूचनांची पत्रे देतो पण त्यांचे उत्तर देण्याचे सौजन्यही दाखविले जात नाही, अशी तक्रार राज्यातील सर्वपक्षीय खासदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. त्यावर, खासदारांच्या पत्रावर काय कार्यवाही शासनाने केली हे त्यांना दोन महिन्यांच्या आत कळविले जाईल, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले.
या बैठकीस लोकसभा आणि राज्यसभेतील राज्याचे खासदार उपस्थित होते. बैठकीस केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री पीयूष गोयल, केंद्रीय खते आणि रसायन राज्यमंत्री हंसराज अहीर, केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे त्याचप्रमाणे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, खासदार शरद पवार यांच्यासह भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या खासदारांची उपस्थिती होती. या खासदारांनी विविध प्रश्नांवर चर्चा केली. ब्रिमस्टोवॅड, अपारंपरिक ऊर्जा, मुंबई उपनगर रेल्वेशी संबंधित प्रश्न, मुंबई विकास योजनेत केंद्राचा निधी मिळणे, परवडणारी घरे, मराठवाड्यातील दुष्काळ, कोल्हापूरला कोकण रेल्वेने जोडणे, अतिरिक्त दुधाचा प्रश्न, कापूस हमी भाव, मेट्रोचे जाळे, आरोग्य यंत्रणा, इंदू मिल जमिनीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रस्तावित स्मारक अशी विविध विषयांवर चर्चा होऊन केंद्राकडे याचा पाठपुरावा सातत्याने करण्याचे ठरले. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न, त्याचप्रमाणे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करून देणे, कोस्टल रोड अशा प्रश्नांवरही चर्चा झाली.
खासदारांच्या विभागनिहाय बैठका
राज्यातील खासदारांच्या मागण्या तसेच प्रलंबित प्रश्न लक्षात घेता खासदारांच्या विभागनिहाय बैठका घ्याव्यात, अशी काही खासदारांची मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य केली. त्याचप्रमाणे खासदारांच्या आणि सर्वच लोकप्रतिनिधींच्या पत्रांना तातडीने उत्तरे गेली पाहिजेत, असे निर्देश देण्यात येतील, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

देवरीतून स्वच्छता मोहिमेला शुभारंभ

0
मार्गदर्शन करताना जि.प. अध्यक्ष विजय शिवणकर

देवरी : जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद गोंदिया तथा पंचायत समिती देवरी यांच्या संयुक्त विद्यमाने देवरीच्या छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या प्रांगणात गुरुवारी (दि.२०) स्वच्छता मेळाव्याची सुरवात करण्यात आली. यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांसह अधिकारीवर्ग उपस्थित होता. सर्वांनी स्वच्छतेची शपथ घेत हातात झाडू घेऊन रस्ते स्वच्छ केले.

स्वच्छता मेळावा व स्वच्छ ग्राम योजनेचा शुभारंभ देवरीतून करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्य कार्यपालन अधिकारी ज्ञानेश शिंदे यांचे हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्ष विजय शिवणकर हे होते. विशेष अतिथी म्हणून जि.प. उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती मदन पटले,सभापती सविता पुराम, मोरेश्वर कटरे, प्रकाश गहाणे, कुशन घासले, देवरीचे सरपंच संतोष मडावी, माजी जि.प.अध्यक्ष नेतराम कटरे, जि.प.सदस्यगण राजेश चांदेवार, जागेश्वर धनबाते, सीता राहांगडाले, योगेंद्र भगत, भूपेंद्र नाचगाये, उषा हर्षे, मीलन राऊत, प्रेमलता दमाहे, पारबताबाई चांदेवार, अतिरिक्त कार्यपालन अधिकारी निरंतर पाडवी, जिल्हा कृषी विकास अधिकारी वंदना शिंदे, सभापती कामेश्वर निकोडे, गटविकास अधिकारी एस एन मेश्राम, पं.स.सदस्य माणिक भंडारी, उत्तम मरकाम, उषा शहारे, कल्याणी कटरे उपस्थित होते.
स्वच्छतेवर सर्व जि.प.सदस्यांनी आपले विचार मांडले. यावेळी तालुक्यातील सरपंच, ग्रा.पं.सदस्य, कृषी आरोग्य व वनविभाग, ल.पा., ग्रामपंचायत, बी.आर.सी., पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

प्रास्ताविक राजेश उफाळकर यांनी, संचालन दिशा मेश्राम तर आभार खंडविकास अधिकारी मेश्राम यांनी मानले. या कार्यक्रमानंतर जि.प.च्या सर्व सदस्यांनी व मुख्य कार्यपालन अधिकारी शिंदे यांनी शहरातील मुख्य चौकातील ठिकाणी हातात झाडू घेवून रस्त्यांची सफाई केली.

केंद्राच्या योजनांची अंमलबजावणी करा

0

खासदार नाना यांचे निर्देश

गोंदियाः जिल्ह्यातील नागरिकांना विविध मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासह वैयक्तिक लाभांच्या योजनांचा लाभ देण्यासाठी शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा, असे निर्देश जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीचे अध्यक्ष खा.नाना पटोले यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात बुधवारला जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीच्या सभेत अध्यक्षस्थानावरुन खा.पटोले बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डी डी शिंदे, अप्पर जिल्हाधिकारी सोरमारे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पाडवी यांची प्रमुख उपस्थिती होती.
खा.पटोले म्हणाले, ग्रामीण भागातील नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी तहसील कार्यालय येथे आयोजित लोकशाही दिनाला तालुका पातळीवरील सर्व विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी योग्य समन्वयातून पुढाकार घ्यावा. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेची कामे करताना उत्कृष्ट दर्जाची कामे होतील याकडे लक्ष द्यावे. जिल्ह्यातील सर्व बँकांनी ग्राहकांसाठी बसण्यासाठी व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, असेही खा.पटोले यांनी सांगितले. बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घेवून ग्रामीण भागात इंटरनेट सेवा आणि मोबाईल सेवेसाठी चांगले कव्हरेज मिळाले पाहिजे याकडे लक्ष द्यावे, असेही खा.पटोले म्हणाले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ.सैनी म्हणाले, जिल्ह्यात १७ मोबाईल टॉवर उभारण्यासाठी बीएसएनएलला वन विभागाकडून जमीन उपलब्ध करुन देण्यात येईल. मोबाईल टॉवर उभारणीमुळे बीएसएनएलच्या इंटरनेट व मोबाईल सेवेचे कव्हरेज चांगले मिळण्यास मदत होईल.
प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत जिल्ह्यात १ ते ९ टप्प्यात २४१ रस्त्यांचे ८२७ कि.मी.ची कामे झाली आहेत. सन २०१३-१४ मध्ये १३ पुलांचे कामे प्रगतीपथावर आहे. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात ६१३ कामे सुरू आहे. या कामांवर ४६२३ मजूर काम करीत आहे. जिल्ह्यात स्वतंत्र ३८८ ग्रामीण पाणी पुरवठा योजना कार्यरत असून त्यापैकी केवळ ६ योजना नादुरुस्त आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ५५६ ग्रामपंचायतीपैकी ३२७ ग्रामपंचायतींना निर्मल ग्राम पुरस्कार मिळाले आहे. राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजनेंतर्गत ७३१ गावांचे विद्युतीकरण करण्यात आले आहे. राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजनेंतर्गत ७३१ गावांचे विद्युतीकरण करण्यात आले. जिल्ह्यातील ७४ हजार ७८९ घरगुती लाभार्थ्यांना विद्युतीकरण योजनेचा लाभ देण्यात आल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी यावेळी दिली.

एलबीटीच्या मुद्द्यावरून फडणवीस सरकारचे घुमजाव?

0

पीटीआय
मुंबई-राज्यात वस्तू आणि सेवा कर(जीएसटी) लागू झाल्याशिवाय स्थानिक संस्था करप्रणाली (एलबीटी) रद्द न करण्याच्या पावित्र्यात राज्य सरकार असल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे. त्यामुळे निवडणूक काळात एलबीटी रद्द करण्याच्या आश्वासनावर फडणवीस सरकारने घुमजाव केल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत आणि त्याची पूर्ण जाणीव देखील आम्हाला आहे. परंतु, त्याचवेळी राज्याची आर्थिक व्यवस्था सध्या बिकट असल्याचेही सत्य आपल्याला नाकारता येणार नाही. एलबीटी आणि जकातीमधून राज्याला सध्या १४,५०० कोटींचा महसूल मिळतो. जर, हे कर रद्द करायचे झाल्यास त्यावर पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावा लागेल. २०१६ सालापासून राज्यात जीएसटीची अंमलबजावणी करण्याचा केंद्राचा विचार सुरू आहे. त्यामुळे जीएसटी लागू झाल्याशिवाय एलबीटी रद्द करता येणार नाही, असे स्पष्टीकरण राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहे.
तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “जीएसटीच्या माध्यमातून ८ हजार कोटी जमा करणे शक्य झाल्यास केंद्राकडून उर्वरित ६,५०० कोटी आम्हाला मिळतील. यातून सध्या राज्याला एलबीटी आणि जकात करातून येणाऱया महसूलाच्या आकडेवारीशी बरोबरी साधता येईल आणि हे दोन्ही कर रद्द करता येतील. त्याशिवाय एलबीटीला पर्याय म्हणून सध्या आपल्याकडे दोनच पर्याय आहेत. एकतर आपल्याला कर वसुलीत वाढ करावी लागेल किंवा राज्यात जीएसटी लागू होईपर्यंत वाट बघावी लागेल.”
राज्याची सध्याची आर्थिक स्थिती पाहून एलबीटी आणि जकात कर रद्द करण्यामागच्या तांत्रिक अडचणींची सविस्तर माहिती व्यापारी संघटनांना देणार असून राज्यात जीएसटी लागू होईपर्यंत एलबीटी रद्द करता येणार नाही याबाबत व्यापारी संघटनांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही फडणवीस पुढे म्हणाले.

राज्यातील भाजपा सरकार पाच वर्षे समर्थपणे काम करेल – राजीवप्रताप रूडी

0

मुंबई -भारतीय जनता पार्टीचे राज्यातील सरकार स्थिर असून समर्थपणे पाच वर्षे काम करेल, असा विश्वास पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस व केंद्रीय मंत्री राजीवप्रताप रूडी यांनी गुरुवारी मुंबईत व्यक्त केला.
भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सरचिटणीस आमदार संभाजी पाटील व रणजीत पाटील, प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी, प्रदेश कोषाध्यक्ष शायना एन. सी. व प्रवक्ते अवधूत वाघ उपस्थित होते.
मा. राजीवप्रताप रूडी यांनी सांगितले की, महाराष्ट्राच्या विकासासाठी कोणत्याही व्यक्तीने अथवा पक्षाने भाजपा सरकारला पाठिंबा दिला तर आम्ही तो घेऊ. पण त्याचा अर्थ ती व्यक्ती किंवा पक्ष सरकारमध्ये सहभागी होईल, असा होत नाही. कोणी आम्हाला पाठिंबा देत असेल आणि आम्ही स्वतःहून नाही म्हणावे, असे होत नाही.
ते म्हणाले की, विधानसभेच्या निवडणुकीचा जनादेश भाजपाने सरकार चालवावे असा आहे. त्यानुसार राज्यात भाजपाचे सरकार चांगल्या रितीने चालू आहे. हे सरकार पाच वर्षे समर्थपणे टिकेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेच्या कामांसाठी पुढाकारही घेतला आहे.
शिवसेनेने सोबत यावे अशी आमची इच्छा आहे. त्या पक्षासोबत प्रदेश पातळीवर चर्चा सुरू आहे. त्याचे चांगले फलित दिसेल. थोडा विलंब होत असला तरी यामध्ये मार्ग निघेल, असे त्यांनी सांगितले.
राज्यातील अनेक गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती असून त्याचा सामना करण्यासाठी राज्य सरकार जे काही पावले टाकेल, त्याला केंद्र सरकार साथ देईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याकडे कौशल्य विकासाची जबाबदारी सोपविली आहे. देशामध्ये २०२० पर्यंत पन्नास कोटी व्यक्तींना प्रशिक्षण देऊन रोजगारासाठी सक्षम करण्याचे उद्दिष्ट आहे. ही जगातील सर्वांत मोठी योजना आहे. महाराष्ट्र हे औद्योगिक व आर्थिकदृष्ट्या विकसित केंद्र आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली कौशल्य विकास योजनेचा सर्वाधिक लाभ महाराष्ट्राला मिळवून देण्यात आपण महत्त्वाची भूमिका पार पाडू.

प्रेमीयुगुलाचा विवाह

0

श्रीरामनवमी शोभायात्रा नगर उत्सव समितीचा पुढाकार
तिरोडा,: येथील श्रीराम नवमी शोभा यात्रा नगर उत्सव समितीचे कार्यकर्ते सुनिल येरपुडे, प्रकाश आगाशे, नितीन लारोकर यांच्या सहकार्याने प्रेमीयुगल रवि मुरे (२८, रा. तिरोडा) व सपना शेंद्रे (२२, रा. कवलेवाडा) यांच्या विवाह सोहळ्या गजानन मंदिर येथे थाटात पार पडला.
प्रेमी युगल हे गेल्या ५ वर्षांपासून एकमेकाचा संपर्कात होते. मुलाच्या आई-वडिलांच्या विरोध असल्याने संबंधित प्रेमी युगलाने हे श्रीराम नवमी शोभा यात्रा नगर उत्सव समितीच्या काही कार्यकत्र्यांना भेटून आपली व्यथा कथन केली. दरम्यान कार्यकर्ते प्रेमी युगुलाला तिरोडा पोलीस ठाण्यात घेवून गेले व तेथे परीविक्षाधीन उपविभागीय अधिकारी वाक चौरे व पोहवा सुनिल यादव यांना माहिती दिली. त्यावर संबंधित मुलाला बोलावून विचारपूस करण्यात आली. यावर समितीचे कार्यकर्ते सुनिल येरपुडे, प्रकाश आगाशे, नितीन लारोकर यांनी वेळ न घालवता लगेच गजानन मंदिर येथे प्रेमी युगूलांचा विवाह पार पडला.
नवविवाहित वर-वधूंना प्रकाश आगाशे यांच्याकडून कपडे तर वधूला सुनिल येरपडे कडून सोन्याचा मंगळसूत्र व नितीन लारोकर यांनी नाश्त्याची व्यवस्था केली तसेच शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष देवेंद्र तिवारी यांनी लग्न सोहळ्याकरीता उपस्थित वèहाडी यांचेकरीता थंड पेयची व्यवस्था केली. फोटोग्राफर राजू तुप्पट यांनी लग्न सोहळ्यात काढलेले छायाचित्र नि:शुल्क दिले.
सिव्हील लाईन परिसरातील नवयुवक पंकज राउत, गधू राउत, विकास सोनवाने, विशाल वेरूडकर, देवेंद्र चौरे, सुरेश चरपे, हरीश्चंद्र भरणे, राजू साठवणे, अमृत देशपांडे, कैलाश व्यास तर महिलांमधून रजनी आगाशे, सोनी देशकर, श्रीमती भरणे, श्रीमती मिश्रा यांनी मोलाचे सहकार्य केले. लग्न सोहळ्या आटोपल्यानंतर १७ नोव्हेंबर रोजी स्वागत समारोहचे आयोजन करण्यात आले. यावेळी २५० ते ३०० वèहाडींनी जेवनाचे आनंद घेतला. जेवणाचे खर्च श्रीराम नवमी शोभा यात्रा समिती व विमा अभिकर्ता धर्मेंद्र रहांगडाले यांनी उचलला.

भंडारा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

0

भंडारा : अहमदनगर जिल्ह्यातील जवखेडे येथील तिहेरी हत्याकांडाचा तपास आणि राज्यात दलितांवर वाढलेले अत्याचार याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुधवार रोजी पुकारलेल्या भंडारा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आयोजित मोर्चात समता सैनिक दलासह हजारो नागरिक सहभागी झाले.
भंडारा बंद दरम्यान शहरातील प्रतिष्ठाने, शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्यात आल्या होत्या. शहरात सुरक्षीततेच्या दृष्टीने पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. हुतात्मा स्मारकापासून मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा गांधी चौक, पोष्ट ऑफिस चौक होत त्रिमुर्ती चौकात धडकला. त्रिमुर्ती चौकात मोच्र्याचे रूपांतर सभेत झाले. यावेळी सभेला महेंद्र गडकरी, डी.एफ. कोचे, अमृत बन्सोड, म.दा. भोवते, निर्मला गोस्वामी, राजकपूर राऊत, प्रिया शहारे, आदींनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, अहमदनगर जिल्ह्यातील जवखेडे गावात जाधव कुटूंबातील तिघांची धारदार शस्त्राने अत्यंत कृरपणे हत्या केली. त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करून विहिरीत फेकण्यात आले. ही घटना मानवतेला काळीमा फासणारी आहे. महिना उलटला तरी आरोपींना अटक झाली नाही. आरोपींना त्वरीत अटक करून फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी. महाराष्ट्रातील दलित, बौद्ध, अल्पसंख्यांकावर अत्याचार करणार्‍या दोषींना तत्काळ अटक करण्यात यावी, फेसबुकवर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विरोधात विकृत व किळसवाणे फोटो घालून व त्याखाली महापुरुषाची विटंबना करणारा संदेश पाठविर्‍या विरोधात कारवाई करण्यात यावी.
जवखेडे येथील घटनेची सीबीआयतर्फे चौकशी करण्यात यावी. या हत्याकांडाचा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा, अहमदनगर जिल्हा दलित अत्याचार जिल्हा म्हणून घोषित करण्यात यावा, जिल्हास्तरावर दलित अत्याचार निवारण समिती स्थापित करण्यात यावी, अत्याचारग्रस्त दलित, बौद्ध व अल्पसंख्याकांना पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.
शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांची भेट घेवून मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले मागण्यांचे निवेदन सोपविले. मोच्र्यात सुरेश सतदेवे, एम. आर. राऊत, उपेंद्र कांबळे, प्रिया शहारे, आहूजा डोंगरे, निशांत राऊत, शैलेश मयूर, गुलशन गजभिये, अचल मेश्राम, अरुण अंबादे, पुष्पा बंसोड, वामन मेश्राम, कैलास गेडाम, मदनपाल गोस्वामी, किशोर मेश्राम, रत्नमाला वैद्य, माया उके, क्रिष्णा भानारकर, क्रिष्णा कराडे, लिला बागडे, अमोल मेश्राम यांच्यासह शेकडो बौद्ध बांधव सहभागी झाले होते.

रेल्वेत स्लीपर कोचऐवजी चेअर कार?

0

नवी दिल्ली-रेल्वे प्रवाशांच्या संख्येत होत असलेल्या वाढीच्या तुलनेत रेल्वेगाड्यांच्या संख्येत वेगाने वाढ होत नसल्यामुळे अनेकदा तिकीट खरेदी करण्यास प्रवासी तयार असले तरी रेल्वेकडेच जागा उपलब्ध नसते. ही परिस्थिती बदलण्यासाठीच रेल्वेने दहा तासांपेक्षा कमी तासांत प्रवास पूर्ण करणा-या सर्व लांब पल्ल्याच्या गाड्यांतील सेकंड क्लासच्या डब्यांमधून स्लीपर कोच हटवून फक्त चेअरकारची व्यवस्था करण्याच्या प्रस्तावावर विचार सुरू केला आहे.
स्लीपर कोचची व्यवस्था असलेल्या सेकंड क्लासच्या प्रत्येक डब्यात जास्तीत जास्त ७२ प्रवाशांचीच व्यवस्था असते. पण स्लीपर कोच काढून चेअरकारची व्यवस्था केल्यास प्रत्येक डब्यात १०० पेक्षा जास्त प्रवासी बसू शकतील, त्यामुळे रेल्वे चेअरकारच्या व्यवस्थेवर विचार करत आहे. या संदर्भात मंत्रालयाने रेल्वेच्या सर्व विभागांकडून मते मागवली आहेत.
दरम्यान, रेल्वे प्रशासानाने चेअरकारच्या प्रस्तावातील काही तांत्रिक अडचणी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यापुढे मांडल्याचे समजते.अशा परिस्थितीत दहा तासांपेक्षा कमी तासांत प्रवास पूर्ण करणा-या सर्व लांब पल्ल्याच्या गाड्यांतील सेकंड क्लासच्या डब्यांसाठी चेअरकारची व्यवस्था करणे अवघड असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. प्रवासी दिवसा चेअरकारमधून प्रवास करण्यास तयार असले तरी रात्री अशा पद्धतीने प्रवास करण्यास तयार होतील का?, असा एक प्रश्नही प्रशासनाकडून उपस्थित करण्यात आला आहे.

दहशतवादग्रस्त देशांमध्ये भारताचा सहावा क्रमांक

0

लंडन, दि. १९ – जगभरातील दहशतवादग्रस्त देशांमध्ये भारताचा सहावा क्रमांक लागला असून भारतात २०१३ मध्ये दहशतवादी हल्ल्याच्या ६२४ घटना घडल्या असून यामध्ये ४०४ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर जगभरातील दहशतवादी हल्ल्यांमध्येही २०१२ च्या तुलनेत तब्बल ४४ टक्क्यांनी वाढ झाल्याचे ग्लोबल टेररिझम इंडेक्स या अहवालात म्हटले आहे.
इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स अँड पीस या संस्थेने नुकतेच लंडनमध्ये ग्लोबल टेररिझम इंडेक्स २०१४ या अहवालाचे लंडनमध्ये प्रकाशन केले आहे. या अहवालात जगभरातील १६२ देशांचा समावेश करण्यात आला आहे. दहशतवादी घटना, त्यामध्ये होणारी जीवितहानी व वित्तहानी या आधारे हा अहवाल तयार केला आहे. आयएसआयएस या दहशतवादी संघटनेमुळे धुमसणारा इराक हा दहशतवादग्रस्त देशाच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. त्याखालोखाल अफगाणिस्तान आणि पाकिस्तान अनुक्रमे दुस-या व तिस-या स्थानावर आहे. तर नायजेरिया चौथ्या आणि सिरीया पाचव्या क्रमांकावर आहे. या देशांच्या खालोखाल भारताचा सहावा क्रमांक लागला आहे. गेल्या वर्षी भारत पाचव्या क्रमांकावर होता. यंदा भारत एका क्रमांकाने खाली असला तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दहशतवादी हल्ले आणि त्यामध्ये मृत्यूमुखी पडणा-यांचे प्रमाण वाढल्याचे अहवालावरुन स्पष्ट होते. गेल्या वर्षी भारतात दहशतवादी हल्ल्याच्या ५६९ घटना घडल्या होत्या. यामध्ये २३८ जणांचा मृत्यू झाला होता.

डुलकीः पोलिसदादाची झोप

0

गोंदिया- गोंदिया जिल्ह्यातील नक्षलप्रभावीत भागात पोलिसांवर कामाचा ताण अधिक असल्याने पोलिसांना नीट विश्रांती घेता येत नाही. याचा परिणाम त्यांच्या कार्यक्षमतेवर होताना दिसत आहे. त्याचे हे बोलके उदाहरण. गोंदिया जिल्ह्यातील नक्षल भागात असलेल्या पोलिश ठाण्यात हे पोलिस दादा चक्क कर्तव्यावर असताना गाढ झोपी गेले होते.