33.2 C
Gondiā
Wednesday, May 14, 2025
Home Blog Page 6495

चिचगड तालुका निर्मितीची जबाबदारी आता भाजपवर

0

सुरेश भदाडे
देवरी- विस्ताराने देवरी तालुका हा मोठा आहे. भंडारा जिल्ह्याचे विभाजन करून गोंदिया हा स्वतंत्र जिल्हा निर्माण करण्यात आला. यासाठी पुढारी, कार्यकर्ते, नेते,सामाजिक संस्थाच्या पदाधिकाèयांनी आंदोलने केली.
सध्या गोंदिया जिल्ह्यात आठ तालुक्यांचा समावेश होतो. देवरी हा तालुका विस्ताराने खूप मोठा आहे. त्यामुळे या तालुक्याचे विभाजन करून चिचगड तालुक्याची निर्मिती करावी, अशी अपेक्षा युवा भाजपचे आमदार संजय पुराम यांच्याकडून केली जात आहे.
१९९९ ला भंडारा जिल्ह्याचे विभाजन करून गोंदिया हा स्वतंत्र जिल्हा निर्माण करण्यात आला. या जिल्ह्यात आठ तालुक्यांचा समावेश आहे. जिल्हा मुख्यालय झाले असले तरी देवरीपासून हे अंतर शंभर किलोमीटर आहे. या तालुक्यातील बहुसंख्य गावे ही अरण्यव्याप्त व दुर्गम भागत आहेत. त्यांना गोंदिया गाठायचे म्हटले तर वेळ लागतो. चिचगड परिसरातील नागरिकांना कामासाठी देवरीला यायचे म्हटले तर त्यांचा संपूर्ण दिवस जातो. तसेच आर्थिक फटकाही सोसावा लागतो. यामुळे या भागातील जनता गेल्या अनेक वर्षापासून चिचगड हा स्वतंत्र तालुका व्हावा, अशी आशा बाळगून आहेत. या भागात अद्यापही एकही मोठा qसचन प्रकल्प साकारू शकला नाही. या भागात पर्यटनाला मोठा वाव आहे. विकासाच्या नावावर आजवर या भागातील नागरिकांना सर्वच राजकारण्यांनी आश्वासने दिलीत. मात्र, एकही प्रकल्प येथे सुरू झाला नाही.

अदाणी ग्रुप्रला ३७० एकर वनजमीन

0

मुंबई-केंद्रातलं सरकार बदलल्यानंतर अदाणी ग्रुपसाठी ख-या अर्थाने ‘अच्छे दिनङ्क आले असून अदाणींच्या १९८० मेगावॅटच्या विस्तारीत औष्णिक ऊर्जा प्रकल्पासाठी गोंदिया जिल्ह्यातील १४८.५९ हेक्टर (३७० एकर) वनजमीन देण्यास केंद्राने राज्याचा वनखात्याला मंजूरी दिली आहे. गेली अनेक वर्षे हा प्रस्ताव रखडलेला होता.
मोदींच्या सरकारने २८ ऑगस्ट रोजी एका आदेशाने या प्रकल्पाला जमीन देण्यास अंतिम मंजूरी दिली. त्यानंतर राज्याच्या वनविभागाने विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर २० ऑक्टोबर रोजी ही वनजमीन ऊर्जा प्रकल्पास दिली आहे. अदाणींकडून या जमीनीचा बाजारभावानुसार मोबदला सरकारच्या तिजोरीत जमा झालेला आहे. याबाबत रितसर प्रस्ताव आम्ही केंद्राकडे पाठवला होता. त्यांनी आवश्यक ती पडताळणी करून ही जमीन हस्तांतरीत करण्यास मंजूरी दिली आहे असे अतिरिक्त मुख्य वन संरक्षक सुरेश गैरोला यांनी सांगितले.
गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तहसिल क्षेत्रात ही वनजमीन आहे. औष्णिक ऊर्जा प्रकल्पासाठी आधी आवश्यक असणारी मोकळी जमीन शोधण्यात आली मात्र, त्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र नसलेली जमीन उपलब्ध नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतरच वनजमीन देण्याचा प्रस्ताव अदाणी ग्रुपकडून ठेवण्यात आला होता. २००८ पासून या जमिनीसाठी अदाणींचे प्रयत्न सुरू होते. मात्र, राज्याचा वनविभाग आणि केंद्रीय पर्यावरण विभाग यांच्यापुढे हा प्रस्ताव रखडून पडला होता. पर्यावरण मंत्रालयाच्या वन सल्लागार समितीने ९ डिसेंबर २०११ रोजी प्रस्तावाला तत्वत: मान्यता दिली खरी पण त्यानंतरही अडथळे मात्र दूर होऊ शकले नव्हते. आता २९ ऑगस्ट २०१४ रोजी नव्या सरकारकडून अंतिम मोहोर बसताच अदाणींच्या प्रकल्पाचा मार्ग खुला झाला आहे. हा प्रकल्प मार्गी लावण्याआधी अदाणींना १७ अटी घालण्यात आल्या आहेत. प्रकल्पाच्या परिसरात आणि प्रकल्पासाठी दिलेल्या क्षेत्रात असलेल्या पाणवठ्यांच्या बाजूला हरित पट्टा विकसीत करण्यात यावा, मातीची कमीत कमी धूप होईल, याची काळजी घ्यावी, वन्य प्राण्यांसाठी स्वतंत्र कॉरीडोर असावा, अशा प्रमुख अटींचा त्यात समावेश आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मतविभाजनाचा भाजपला लाभ

0

गोंदिया- जिल्ह्यातील ४ विधानसभा मतदारसंघापैकी ३ मतदारसंघ भारतीय जनता पक्षाने आपल्या ताब्यात घेतले. काँग्रेसकडून १ जागा हिसकावून घेण्यात भाजपला यश आले.गोंदिया जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोंदीची सभा झाली परंतु त्या सभेचा इफेक्ट गोंदियात काही पडला नाही.३ मतदारसंघात काँग्रेसच्या पराभवाला राष्ट्रवादी काँग्रेस कारणीभूत ठरली.तर गोंदियात उमेदवाराची निवड भाजपची चुकल्याने फटका बसला.
अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघाकडे बघितल्यास भाजपने ही जागा परत कायम ठेवली आहे.भाजपला बंडखोरी भोवणार असे चित्र असताना ते एकदम पालटले.मतदारांनी विद्यमान आमदाराने केलेल्या कामाची दखल आणि स्थिर सरकार भाजपच देऊ शकते हा दृष्टीकोन घेतल्यानेच विजय मिळविता आला.शिवसेनेच्या उमेदवार भाजपला qखडार पाडण्यात अपयशी राहिल्या.परंतु जर या मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे एकत्रितपणे लढले असते तर निकाल बदलले गेले असते.त्यातही काँग्रेसच्या बंडखोर २ उमेदवारांनी साडेसहा हजार मते घेऊन काँग्रेसची मते वजा केली.तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील मतविभाजनाचा लाभ भाजपला याठिकाणी मिळाला.
गोंदिया विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला अंतर्गत मतभेद आणि निवडणुक नियोजन अभावाचा फटका सहन करावा लागला यात शंका नाही.त्यातच बहुजन उमेदवार नाकारल्याचा सर्वात मोठा फटका बसला.शिवसेना मात्र अपेक्षेप्रमाणे मत घेऊ शकली नाही.एकंदरीत शिवसेना व राष्ट्रवादीच्या मतांना जोडले तर आत्तपर्यत सेना व राष्ट्रवादीची छुपी युती या मतदारसंघात होती, हे स्पष्ट झाले आहे.राष्ट्रवादी स्वतंत्र्य लढल्यानेच सेनेला फटका बसला.मतदारांना सेनेच्यावतीने दिलेला उमेदवार हा कुथे परिवरातीलच नकोसा झाल्याचे दिसून आले.बहुजन समाजपार्टी मतदारसंघात महत्वाची भूमिका बजावेल अशी अपेक्षा होती,मात्र मतदारांनी सुध्दा बसपला नाकारले असून बसपला फक्त कॅडरचीच मते मिळाली.गोपालदास अग्रवालांना मात्र त्यांनी ग्रामीण भागात सतत ठेवलेला जनसपंर्क आणि केलेल्या कामाचा मोबदला मिळाला.काँगे्रसचे अग्रवालांना ग्रामीण जनतेनेच सर्वाधिक मते दिली उलट शहरात काँग्रेसला मतविभाजनाचा फटका बसला.ग्रामीण मतदारांनी काँग्रेसला पसंती दिल्याचे निकालावरुन दिसून आले.
तिरोडा मतदारसंघात भाजपमध्ये अंतर्गत कलह असताना अखेरच्याक्षणी शिवसेनेला सुध्दा मॅनेज करण्यात यश आले आहे.शिवसेनेला मॅनेज केल्यानेच भाजप उमेदवार मताधिक्य घेऊ शकला परंतु राष्ट्रवादीचे बंडखोर अपक्ष उमेदवाराने राष्ट्रवादीला चांगलाच फटका पोचविला.याठिकाणी बनसोड हे अपक्ष नसते तर कदाचित ही जागा राष्ट्रवादीच्याच कोट्यात गेली असती.काँग्रेस उमेदवाराला तालुकावादाचा फटका सहन करावा लागला. तिरोडा तालुका काँग्रेसच्या नेत्यांनी दिलेल्या फटक्यामुळे काँग्रेसला अनामत रक्कम सुध्दा वाचविता आली नाही.या निवडणुकीत बसप मात्र चांगलीच मागे राहिली जी गेल्या निवडणुकीत तिसèया क्रमांकावर होती
आमगाव विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला मोदी लहरची साथ मिळाली.तर काँग्रेस उमेदवाराप्रती जनतेत असलेला रोष काँग्रेसच्या विद्यमान आमदाराला पराभवासाठी कारणीभूत ठरले.भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेल्या रमेश ताराम यांच्यामुळे आणि राष्ट्रवादीचे नरेश माहेश्वरी यांचा २००४ च्या निवडणुकीत थोड्या मतानी रामरतन राऊत यांच्यामुळे झालेल्या पराभवाचे शल्य धुऊन काढण्यासाठी माहेश्वरी यांनी राऊत यांच्या पराभवासाठी केलेली मेहनत कामी आली.राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मिळालेली मते ही काँग्रेस,भाजपमधील असंतुष्ठाची होती.

मोदींची सभा अन्; भाजप उमेदवारांचा पराभव

0

खेमेंद्र कटरे
गोंदिया-गेल्या १५ आँक्टोबरला महाराष्ट्र विधानसभेकरिता झालेल्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले.त्या निकालाकडे बघितल्यास गोदिया जिल्ह्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा ही भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या पराभवालाच कारणीभूत ठरल्याचे दिसून आले.पंतप्रधान मोदी यांनी गोंदियात ज्या उमेदवारासाठी सभा घेतली तो उमेदवार त्या निवडणुकीत qजकून आलाच नाही हे ८ आँक्टंोबरंच्या अंकात साप्ताहिक बेरार टाईम्सने सर्वात प्रथम स्पष्ट केले होते.ते वृत्त गोंदिया विधानसभेच्या निकालाकडे बघितल्यास खरे ठरले आहे..
पंतप्रधान मोदी ५ आँक्टोंबरला भाजपचे उमेदवार विनोद अग्रवाल यांच्या प्रचारसभेकरिता येऊन गेले होते.त्या आधी सन २००९ मध्ये लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार शिशुपाल पटले यांच्या जाहीर सभेकरिता नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना आले होते. त्यांची त्यावेळी सुद्धा इंदिरा गांधी स्टेडियम येथेच सभा झाली होती. त्यानंतरची ही दुसरी सभा होती. उल्लेखनीय म्हणजे त्यावेळी भाजप उमेदवाराचा दारुण पराभव होत अनामत रक्कम जप्त झाली होती.या निकालात भाजप उमेदवार जिंकू शकले नाही,मात्र दुसèया क्रमांकावर राहिले.

modichisabha
काँग्रेसच्या अग्रवालांची विजयाची हॅट्रिक
गोंदिया-गोंदिया विधानसभा मतदारसंघातून सलग तिसèयांदा विजय मिळून काँग्रेसचे गोपालदास अग्रवाल यांनी हॅट्रिक साधली आहे.गोंदिया मतदारसंघातूनच नव्हे तर गोंदिया भंडारा जिल्ह्यातून सलग तीनदा निवडून येणारे आमदार म्हणूनही गोपालदास अग्रवाल यांची नोंद झाली आहे.
२००४ मध्ये पहिल्यांदाच विधानसभेच्या रिंगणात उतरलेले गोपालदास अग्रवाल यांनी शिवसेनेचे उमेदवार रमेश कुथे यांचा पराभव केला होता.त्यानंतर २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीतही अग्रवाल यांनी शिवसेनेचे रमेश कुथे यांचा पराभव केला होता.
यावेळी २०१४ च्या निवडणुकीत सर्वच पक्ष स्वतंत्रपणे रिंगणात होते.या निवडणुकीत गोपालदास अग्रवालांच्या पराभवासाठी भाजप राष्ट्रवादी शिवसेनेने दंड थोपाटले होते.परंतु राष्ट्रवादी व भाजप त्यांना विजयापासून रोखू शकली नाही.गोंदिया विधानसभा मतदारसंघात गेल्या १० वर्षात आमदार स्थानिक विकास निधीच्या माध्यमातून केलेल्या विकासकामामुळेच मतदारांनी त्यांना खरी परत विकास काम करण्याची संधी दिली आहे.त्यांनी आपल्या मतदारसंघात विकासाची कामे केली ही पावतीच मतदारांनी त्यांना विजयातून दिली आहे.
अर्जुनी मोरगाव व तिरोडा विधानसभा मतदारसंघात भाजपने राखला गड कायम
अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघातून दुसèयांदा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार व विद्यमान आमदार इंजि.राजकुमार बडोले यांनी विजय प्राप्त करून आपला मतदारसंघातील जनतेवरील विश्वास कायम टिकवून ठेवत गड कायम राखला आहे.
आमदार बडोले यांच्या विरोधात या मतदारसंघातील अनेक शक्ती एकत्रित आल्यानंतरही त्यांच्या विजयाला कुणीच थांबवू शकले नाही.भाजपमधील काही नाराज कंत्राटदार गटाला मात्र बडोलेंच्या विजयाने हादरा बसला आहे.बडोलेंच्या विजयाने त्यांनी त्या मतदारसंघात पहिल्या काळात नवीन असतानाही काम केल्याचाच विश्वास जनतेने दाखविला आहे.
तर तिरोडा विधानसभा मतदारसंघ सुध्दा भारतीय जनता पक्षाने आपल्याकडे कायम राखला आहे.विद्यमान आमदार डॉ.खुशाल बोपचे यांना उमेदवारी नाकारल्यानंतर या मतदारसंघातील निकाल बदलतो की काय अशी अपेक्षा होती, परंतु डॉ.बोपचे यांनी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व पंतप्रधान नरेंद्र मोंदीवर विश्वास ठेवत नाराजी दूर ठेवत भाजपसाठी काम करीत ही जागा भाजपचे उमेदवार विजय रहागंडाले यांच्या विजयाने कायम ठेवून पक्षाला या मतदारसंघात भाजपला विजय मिळवून दिला आहे.

भाजप सर्वात मोठा पक्ष

0

मुंबई-महाराष्ट्रात भाजप हा मोठा भाऊ आहे हे, स्पष्ट होत असले तरी ऐन निवडणुकीत युती आणि आघाडी तुटल्यामुळे बुचकळ्यात पडलेल्या महाराष्ट्रातील मतदारराजाने त्रिशंकू कौल दिल्याचे दिसत आहे.
भाजपने सेंच्युरी गाठली असली तरी बहुमताचा जादुई आकडा गाठण्यासाठी त्यांना शिवसेना वा राष्ट्रवादीपुढे हात पसरावे लागणार आहेत.
राज्यातील सर्व २८८ जागांचे निकाल हाती आले आहेत. त्यात भाजपने १२० जागा qजकल्ङ्मा आहेत. शिवसेना ६३,. काँग्रेस ४१आणि राष्ट्रवादी ४२ जागा qजकू शकले आहेत.एमआङ्मएम ङ्मा नव्ङ्मा पक्षाने ४ जागा qजकल्ङ्मा आहेत तर मनसे २ इतर पक्षानी मळून १२ जागा qजकल्ङ्मा आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस काही जागांपर्यंतच मजल मारतील, असे काही जनमत चाचण्यांचे अंदाज होते. मात्र, या दोन्ही पक्षांनी अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केल्याचे दिसत आहे.
दोन्ही पक्षांनी चाळीसच्यावर जागी आघाडी घेतली आहे. राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा चालला, असे म्हणता येईल पण तो निर्णायक ठरलेला नाही.

अखेर भाजपने आपला बालेकिल्ला सर केला!

0

सुरेश भदाडे
देवरी- अखेर अनेक तर्क-वितर्कांना फोल ठरवत भारतीय जनता पक्षाने ६६-आमगाव विधानसभा मतदारसंघ हा आपला परंपरागत बालेकिल्ला सर केला. मोदी लाटेवर स्वार युवा नेते संजय पुराम यांनी राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार आणि माजी आमदार रामरतन राऊत यांचा १८ हजार २९५ मतांनी पराभव करीत पार धुव्वा उडविला. उल्लेखनीय म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे रमेश ताराम यांनी तब्बल ३५ हजार ९१८ मते घेऊन २००५ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीतील राष्ट्रवादीच्या पराभवाचा वचपा काढला.
bhajapane-balekilla-sarkela
तेराव्या विधानसभेसाठी गेल्या १५ तारखेला मतदान घेण्यात आले होते. ६६ आमगाव विधानसभेसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीची मतमोजणी स्थानिक औद्यागिक प्रशिक्षण केंद्रात पोलिसांच्या चोख बंदोबस्तात पार पडली. सकाळी आठ वाजता सुरू झालेली मतमोजणी ही दुपारी १ वाजेच्या सुमारास पूर्ण झाली. मतमोजणीच्या एकूण २२ फेèया घेण्यात आल्या. यात भाजपचे संजय पुराम यांनी आपले प्रतिस्पर्धी काँग्रेसचे रामरतन राऊत यांना सुरवातीपासून चांगलेच पछाडले होते. मतमोजणीच्या प्रारंभीपासून १० व्या फेरीपर्यंत राष्ट्रवादीचे रमेश ताराम हे दुसèया क्रमांकावर होते. गेल्या वेळी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढविणारे रमेश ताराम यांना त्यांच्या गृहतालुक्यातील मतदारांनी नाकारले होते. यावेळी सुद्धा त्यांना तोच अनुभव आला. या मतदारसंघातील २ हजार २८१ मतदारांनी यावेळी नोटाला मत देत एकही उमेदवार आमदार होण्यालायक नसल्याचे आपल्या मतदानातून दाखवून दिले. निवडणूक प्रचारात आघाडी घेणारे भाजपचे फुटीरवादी नेते सहषराम कोरेटी यांना मतदारांनी त्यांची जागा दाखवून दिली. मराठी अस्मिता जागविण्यात शिवसेनेला येथे अपयश आले. सेनेतील गटबाजीमुळे त्यांचे चांगलेच पानिपत झाले. बसपच्या हत्त्यावर स्वार शारदा उईके या ही फारशी करामत करू शकल्या नाही. दोन अपक्षांना आपली अनामत रक्कम देखील वाचविता आली नाही.
उल्लेखनीय म्हणजे काँग्रेसच्या रामरतन राऊत यांना त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील चुका चांगल्याच भोवल्याचे दिसून येते. २००५ साली आघाडीचा उमेदवार उभा असताना श्री. राऊत यांनी बंडाळी करीत ३५ हजार मते घेत राष्ट्रवादीचे नरेश माहेश्वरी यांच्या पराभवासाठी मोलाची कामगिरी केली होती. परिणामी, या मतदार संघात काँग्रेसला चांगलीच गळती लागली होती. त्या पराभवाचे शल्य राष्ट्रवादीचे नेते अद्यापही विसरले नाही. या निवडणुकीत संधी मिळाल्याने २००५ मध्ये राऊत यांनी मिळविलेल्या मतांएवढीच मते यावेळी रमेश तारामला पुढे करून राष्ट्रवादीने घेतली. यामुळे राऊत यांना पराभवाला सामोरे जावे लागले. शिवाय नोटाला मिळालेली मते हीसुद्धा काँग्रेसच्या नाराज मतदारांची असल्याची चर्चा मतमोजणी केंद्राबाहेर होती.
दरम्यान, भाजपचे विजयी उमेदवार संजय पुराम यांचे निवडणूक निर्णय अधिकारी दुर्वेश सोनवाने यांनी प्रमाणपत्र देत अभिनंदन केले. देवरी पत्रकारसंघाच्या वतीने सर्वप्रथम पुराम यांनी सत्काराचा स्वीकार केला. यानंतर त्यांची देवरी शहरातून विजयी मिरवणूक काढण्यात आली.
उमेदवारांना मिळालेली मते
मूलचंद गावराने (शिवसेना)-९३७४
रमेश ताराम (राष्ट्रवादी)-३५,९१८
संजय पुराम (भाजप)-६२,५९०
रामरतन राऊत (काँग्रेस)- ४४,२९५
शारदा उईके (बसप)- ६,१३४
केशव भोयर (अपक्ष)- १,२२५
सहषराम कोरेटी ( अपक्ष)- १३,४१४
संतोष नाहाके (अपक्ष) -१,१०४

हा जनतेचा विजय- संजय पुराम

0

या निवडणुकीतील विजय हा संपूर्ण जनतेचा विजय आहे. भाजपच्या सर्वच कार्यकत्र्यांनी जिवाचे रान करून हा विजय खेचून आणला आहे. केंद्रातील भाजप सरकारच्या मदतीने राज्याचा कायापालट करण्याची संधी मतदारांनी भाजपला दिली आहे. गेल्या पंधरा वर्षात राज्याला अधोगतीला पोचविणाèया आघाडी शासनाच्या विरोधात जनतेने कौल दिला आहे. मी सर्व मतदारबांधवांचे आणि भाजप कार्यकत्र्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो

तीन जि.प.सदस्य पोचले विधानसभेत

0

गोंदिया-गेल्या १५ आँक्टोबरला महाराष्ट्र विधानसभेकरिता झालेल्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले.त्या निकालाकडे बघितल्यास गोंदिया/भंडारा लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच ३ जिल्हा परिषद सदस्य हे विधानसभेत पोचले आहेत.ते सुध्दा भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर निवडून येऊन.गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा विधानसभा मतदारसंघातून विद्यमान जिल्हा परिषद सदस्य असलेले विजय रहागंडाले हे भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर निवडून येऊन त्यांनी विधानसभेत प्रवेश केला आहे.तर तुमसर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार चरण वाघमारे यांनीही पहिल्यांदाच विधानसभेत प्रवेश केला आहे.मागच्या निवडणुकीत वाघमारे यांनी निवडणूक अपक्ष लढविली होती,यावेळी मात्र भाजपकडून ते निवडून गेले आहेत.तर साकोली मतदारसंघातून एकोडी जिल्हा परिषद क्षेत्राचे सदस्य बाळा काशीवर हे निवडून आले आहेत.यापूर्वी गोंदिया जिल्ह्यातून जिल्हा परिषद सदस्य असताना दिलीप बनसोड,केशव मानकर,भैरqसह नागपूरे,हेमंत पटले हे विधानसभेत आमदार म्हणून गेले होते.

सोनियांची सभा मोदींवर भारी

0

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराकरिता येथील इंदिरा गांधी स्टेडिअमवर सभा घेतली. स्टेडिअमची क्षमता २५ हजार होती. गर्दी भन्नाट होती. मात्र, बसण्यास जागा नसल्यामुळे भाषण ऐकण्याकरिता आलेल्या अनेकांना परत जावे लागले होते. त्यामुळे परत गेलेल्यांची मते परावर्तित होण्याऐवजी भाजपच्या विरोधात गेली. त्यानंतर दोन्ही जिल्ह्यांतील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचाराकरिता सोनिया गांधी यांनी येथील सर्कस मैदानात सभा घेतली. त्या सभेला मोदींच्या सभेपेक्षा जास्त गर्दी जमली. त्यामुळे काँग्रेसचा विजय गोंदियात तरी निश्चित झाल्याचे मत व्यक्त करण्यात येत होते. त्याची प्रचिती आजच्या निकालावरून आली. मोदी लाट आणि त्यांच्या भाषणाचा प्रभाव गोंदिया मतदार संघातील मतदारांवर चालला नाही.

अग्रवालांच्या हॅट्रीकने काँग्रेसला जीवदान

0

गोंदिया : गोंदिया मतदार संघात जिल्हा मुख्यालय असल्यामुळे येथील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. गेल्या १० वर्षांपासून येथे काँग्रेसचे गोपालदास अग्रवाल आमदार होते.त्यांनी यावेळी आपली शेवटची निवडणूक आणि मतदार संघाचा पुन्हा विकास करायचाय, म्हणत निवडणुकीत उतरले. आमदार अग्रवालांवर त्यांच्या विरोधात लढत असलेल्या प्रत्येक उमेदवाराने चिखलफेक केली. परंतु, येथील जनतेने त्यांच्या विकासाच्या संकल्पनेला साथ दिली. गोपालदास अग्रवाल यांनी ६२२८५ मते घेऊन विजयश्री मिळविला. पहिल्या फेरीपासून अग्रवाल समोर होते. भारतीय जनता पक्ष येथे कित्येक वर्षानंतर पहिल्यांदाच भा१⁄२य अजमावत असल्यामुळे कार्यकत्र्यांत नवचैतन्य आले. भाजपचे स्टार प्रचारक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विनोद अग्रवाल यांच्या प्रचारार्थ येथे सभा घेतली. जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल निवडणूक लढत असल्यामुळे भाजपचा विजय निश्चित असल्याचे भाकीत अनेकांनी वर्तविले. परंतु, नरेंद्र मोदी यांची हवा चालली नाही. विनोद अग्रवाल यांना ५१६२० .मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे दुसèया क्रमांकाचे नेते प्रफुल्ल पटेल यांचा हा गृहजिल्हा आहे. परंतु. त्यांच्या पक्षाचे उमेदवार अशोक गुप्ता यांना ३३००० मतांवर समाधान मानावे लागले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने अल्पसंख्यांक समाजाला तिकीट दिल्यामुळे कुणबी आणि पोवार समाजाची गठ्ठा मते ओबीसी वर्गातील शिवसेनेचे राजकुमार कुथे यांना मिळतील, असे समीकरण होते. परंतु, कुथे यांना २०७८८ मते घेऊन चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. बसपचे योगेश बन्सोड यांना १५६५४ एवढी मते मिळाली ते पाचव्या क्रमांकावर राहिले. कसल्याही लाटेला न जुमानता येथील मतदारांनी विकासाला साथ दिल्याचे निकालावरून दिसून येते.