31.2 C
Gondiā
Thursday, May 15, 2025
Home Blog Page 6496

भाजपचे विजय रहांगडाले १२,३४१ मतांनी विजयी

0

तिरोडा : गोंदियानंतर सर्वाधिक काट्याची लढत तिरोडा मतदार संघात होती. येथे राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप बनसोड यांनी बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढली. भाजपचे आमदार खुशाल बोपचे यांची तिकीट कापण्यात आली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि बोपचे समर्थकांच्या नाराज समर्थकांमुळे भाजपला फटका बसून त्याचा फायदा काँग्रेसला होणार असल्याचा अंदाज बांधण्यात आला. शिवाय भाजपचेच पंचम बिसेन यांनी शिवसेनेतून निवडणूक लढल्यामुळे भाजपच्या मतांवर परिणाम होणार असल्याचा अंदाज लावण्यात येत होता. परंतु, सर्वच गणिते फोल ठरली. येथे भारतीय जनता पक्षाचे विजय रहांगडाले यांनी ५२३६० मते घेऊन विजय मिळविला. दिलीप बनसोड यांना दुसèया क्रमांकाची ४००१९ इतकी मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजलक्ष्मी तुरकर ३०६३० मते घेऊन तिसèया क्रमांकावर, तर काँग्रेसचे परसराम कटरे १६८५७, शिवसेनेचे पंचम बिसेन ११६१७, बसपला ५१४७ मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजलक्ष्मी तुरकर आणि अपक्ष दिलीप बनसोड यांच्या मतांची बेरीज केली असता, बंडखोरी टळली असती, तर येथून राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय निश्चित होता, असे म्हणावे लागेल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोरीचा फायदा भारतीय जनता पक्षाला झाला. पोवार बहुल मतदार संघाला त्यांच्याच समाजातील विजय रहांगडाले हे आमदार म्हणून निवडून आले. भारतीय जनता पक्षाला आपला मतदार संघ शाबूत राखण्यात यश आले. या मतदार संघात तिरोड्यातील काँग्रेसने काँग्रेस उमेदवाराला साथ न दिल्याने पहिल्या चार मध्ये येऊ शकले नाही. काँग्रेस उमेदवाराला तालुका वादाचा फटका सहन करावा लागला.

विद्यमान आमदाराने राखला गड कायम

0

अर्जुनी मोरगाव : काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाला या मतदार संघात सर्वाधिक बंडखोरीचा सामना करावा लागला. तर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नाराज पदाधिकाèयांनी पक्षाच्याच उमेदवाराविरोधात छुपा प्रचार केला. अशा स्थितीत देखील राष्ट्रवादी काँग्रेसने तिस-या क्रमांकाची ३१७२७ मते घेतली. या मतदार संघातून भारतीय जनता पक्षाने राजकुमार बडोले यांना दुस-यांदा उमेदवारी दिली. मतदानाच्या पूर्वीपासून राजकुमार बडोले यांचा विजय निश्चित असल्याचे भाकीत वर्तविण्यात आले. अपेक्षित निकाल आज समोर आला. बडोले यांनी ६४१०५ मते घेतली. त्यांनी काँग्रेस पक्षाचे राजेश नंदागवळी यांचा ३०१२४ मतांनी पराभव केला. काँग्रेसने राजेश नंदागवळी या तरुणाला उमेदवारी दिली. नंदागवळी यांना जनसंपर्काचा अभाव नडला. त्यांना फक्त ३३९८१ इतकी मते घेऊन दुसèया क्रमांकावर समाधान मानावे लागले. नंदागवळी यांना उमेदवारी मिळाल्याने रत्नदीप दहिवले आणि अजय लांजेवार यांनी बंडखोरी केली. याचा फटका पक्षाला बसला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वर्षभरापूर्वी प्रवेश करणारे मनोहर चंद्रीकापुरे यांना उमेदवारी मिळाली. मतदानाच्या दोन दिवसापूर्वी शर्यतीत नसताना देखील त्यांनी अपेक्षेपेक्षा जास्त ३१७२७ मते घेऊन तिसèया क्रमांकाची मते घेतली. त्यामुळे काँग्रेसला देखील तोंडात बोटे घालावी लागली. शिवसेनेच्या किरण कांबळे यांना १५२७८ मते मिळाली. या मतदार संघातील १७२७ मतदारांनी नोटाला पसंती देत एकही उमेदवार लायक नसल्याचे दाखवून दिले. प्रफुल्ल पटेल यांनी या मतदार संघावर लक्ष केंद्रित केले होते. परंतु, त्यांचा देखील जादू येथील मतदारांवर पडला नाही.

गोंदिया-भंडारा जिल्ह्यात राष्ट्रवादी भुईसपाट, काँग्रेसने राखली लाज

0

गोंदिया-राज्ङ्मात १५ ऑ्नटोंबरला झालेल्ङ्मा विधानसभा निवडणुकांचे निकाल आज रविवारी जाहीर झाले.ङ्मा निकालांनी गेल्ङ्मा १५ वर्षापासून राज्ङ्मात असलेल्ङ्मा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्ङ्मा आघाडी सरकारला भाजपने बाहेरचा रस्ता दाखविला आहे.भारतीङ्म जनता पक्षाने सर्वाधिक जागा जिंकून सत्ता स्थापनेची तङ्मारी चालविली आहे.ङ्मा निकालात गोंदिङ्मा भंडारा जिल्ह्यातील मतदारांनी सुध्दा भाजपला चांगलीच संधी दिली आहे.लोकसभेच्ङ्मा निकालानंतर विधानसभेच्ङ्मा निकालातही भाजपला पसंती देत काँग्रेस राष्ट्रवादीप्रतीचा रोष जनतेने दाखविला.तर शिवसेना मत्र आपला करीष्म टिकवून ठेवू शकली नाही.गोंदिङ्मा भंडारा जिल्ह्यातील ७ विधानसभा मतदारसंघापैकी ६ जागा qजकून भाजपने ङ्मा दोन्ही जिल्ह्यावर आपली पकड असल्ङ्माचे दाखविले.तर काँग्रेसची लाज गोंदिङ्मा मतदारसंघात काँग्रेसचे आमदार गोपालदास अग्रवाल ङ्मांनी तिसèङ्मांदा विजङ्म मळवून राखली आहे.तर राष्ट्रवादीचे नेते प्रङ्कुल पटेल ङ्मांच्ङ्मा राष्ट्रवादीला मत्र एकही जागा qजकता आली नाही.त्ङ्मामळे ङ्मा जिल्ह्यात पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेसला अडचणीचे दिवस असल्ङ्माचे स्पष्ट जाहीर झाले आहे.
rashtrawadi-bhuisapat-2
दोन्ही जिल्ह्यातील सर्वाधिक महत्त्वाचा मतदारसंघ गोंदिङ्मा होता.ङ्मा मतदारसंघाकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.कारण ङ्मा मतदारसंघातून लोकसभेच्ङ्मा निवडणुकीत काँग्रेसचे आमदार असतानाही भाजपच्ङ्मा उमदवाराला ५० हजाराच्ङ्मावर आघाडी मळाली होती. त्ङ्मामळे राष्ट्रवादी काँग्रेसने ङ्मावेळी कुठल्ङ्माही परिस्थितीत ही जागा काँग्रेसला qजकू द्याङ्मची नाही, ङ्मासाठी चांगलीच ङ्किल्डींग लावली होती.परंतु ती कामत आली नसल्ङ्माचे दिसून आले.गोपालदास अग्रवाल ङ्मांनी ही जागा भारतीङ्म जनता पक्षाचे जिल्हाध्ङ्मक्ष व उमदवार विनोद अग्रवाल ङ्मांना पराभूत करून qजकली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोक गुप्ता तिसèङ्मा क्रमकावर राहिले तर शिवसेना मत्र अपेक्षेनुसार काम करू शकली नाही.
आमगाव मतदारसंघातून भारतीङ्म जनता पक्षाचे संजङ्म पुराम ङ्मांनी काँग्रेसचे विद्यमन आमदार रामरतन राऊत ङ्मांचा पराभव केला.अर्जुनी मरगाव मतदारसंघातूून भाजपचे विद्यमन आमदार इंजि.राजकुमर बडोले ङ्मांनी आपला गड साबूत ठेवत परत ही जागा qजकून आणली आहे.

गोंदिया जिल्ह्यात मतदानात महिला आघाडीवर

0

गोंदिया- विधानसभा निवडणुकीसाठी (ता.१५) रोजी पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत गोंदिया जिल्ह्यातील चारही मतदारसंघात पुन्हा एकदा महिला मतदारांनी पुरुषांच्या तुलनेत अधिक मतदान केल्याचे आयोगाच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. मतदान केलेल्या महिला मतदारांची टक्केवारी अर्जूनीमोर मतदारसंघात ७२.२९ तर सर्वांत कमी गोंदिया मतदारसंघात ६६.०२ टक्के एवढी राहिली.
तेराव्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी काल मतदान प्रक्रिया पार पडली. ही निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी आयोगाने सर्वत्र चोख बंदोबस्त केला होता. परिणामी, गोंदिया जिल्ह्यात सर्वत्र मतदान प्रक्रिया शांततेत पार पडले. जिल्ह्यातील चारही मतदारसंघातील १० लाख २२ हजार ८३० मतदारांपैकी ७ लाख ६ हजार ८३३ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
mahila-aaghadiwar
यात ५ लाख १२ हजार ६४२ पुरुष मतदारांपैकी ३ लाख ५१ हजार ३१४ तर ५ लाख १० हजार १८२ महिला मतदारांपैकी ३ लाख ५५ हजार ५१८ मतदारांनी मतदान प्रक्रियेत भाग घेतला. विधानसभानिहाय आकडेवारी अशी- अर्जूनीमोर विधानसभा मतदारसंघ पुरुष ८५ हजार १६३ (१ लाख २० हजार ५२९) ७०.६६ टक्के, महिला ८४ हजार ६२७ (१ लाख १७ ६५) टक्केवारी ७२.२९, तिरोडा विधानसभा मतदार संघ पुरुष ८२ हजार ६१० (१ लाख १९ हजार ५७९) ६९.०८ टक्के, महिला ८४ हजार ३०६( १ लाख १९ हजार ७१८) ७०.४२ टक्के, गोंदिया विधानसभा मतदारसंघ पुरुष ९७ हजार ९७ (१ लाख ४६ हजार १३५) टक्केवारी ६६.४४, महिला ९७ हजार ५८५ (१ लाख ४७ हजार ८०४) टक्केवारी ६६.०२ आणि आमगाव विधानसभा मतदारसंघ पुरुष ८६ हजार ४४४ (१ लाख २६ हजार ३९९) टक्केवारी ६८.३९ तर महिला ८९ हजार (१ लाख २५ हजार ५९५) टक्केवारी ७०.८६. जिल्ह्यात ५ लाख १२ हजार ६ हजार ४२ पुरुष मतदारांपैकी ३ लाख ५१ हजार ३१४ आणि ५ लाख १० हजार १८२ महिला मतदारांपैकी ३ लाख ५५ हजार ५१८ मतदारांनी आपल्या मताधिकाराचा वापर केला. इतर मतदारांमध्ये ६ पैकी एकानेच आपला मताधिकार वापरला.

कोण होणार आमदार?

0

गोंदिया- उद्या १५ ऑक्टोबर रोजी होणा-या तेराव्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या रिंगणात जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात नामांकन मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी ३८ उमेदवारांनी नामांकन मागे घेतल्याने ५४ उमेदवार कायम आहेत. यात सर्वाधिक १९ उमेदवार हे गोंदिया विधानसभा मतदार संघात असून सर्वांत कमी ८ उमेदवार हे आमगाव विधानसभा मतदार संघात आहेत. नामांकन मागे घेण्याच्या दिवसापर्यंत राजकीय पक्षांतील बंडोबांना थंडोबा करण्यात पक्षांच्या नेत्यांना यश आले असले तरी काही बंडखोर हे पक्षाची डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

-: अर्जुनी मोरगाव विधानसभा:-
श्रीमती किरण कांबळे (शिवसेना)
राजेश नंदागवळी (भारतीय नॅशनल काँग्रेस)
राजकुमार बडोले (भाजप)
मनोहर चंद्रीकापूरे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)
डॉ.भीमराव मेश्राम (बसप)
धनपाल रामटेके (भारिप बहुजन महासंघ)
अजय लांजेवार (अपक्ष)
प्रमोद गजभिये (अपक्ष)
जगन गडपाल (अपक्ष)
रत्नदीप दहिवले (अपक्ष)
दिलवर्त रामटेके (अपक्ष)
इंजि.दिलीपकुमार वालदे (अपक्ष)
महेश शेन्डे (अपक्ष)

-:तिरोडा विधानसभा:-
परसराम कटरे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)
श्रीमती राजलक्ष्मी तुरकर (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)
पंचम बिसेन (शिवसेना)
विजय रहांगडाले (भाजप)
दीपक हिरापुरे (बसप)
अब्दूल कादीर शेख (मायनॉरिटीज डेमोक्रॅटिक पार्टी), वीरेंद्रकुमार जायस्वाल (पिझन्ट्स एन्ड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया),
अविनाश नेवारे (अपक्ष)
प्रताप पटले (अपक्ष)
दिलीप बनसोड (अपक्ष)
राजकुमार बोहने (अपक्ष)
मनोहर पटले (अपक्ष)
श्रावण रहांगडाले (अपक्ष)

-:गोंदिया विधानसभा:-
गोपालदास अग्रवाल (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)
विनोदकुमार अग्रवाल (भाजप)
अशोक गुप्ता (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)
श्रीमती करुणा गणवीर (कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया), राजकुमार कुथे (शिवसेना)
योगेश बनसोड (बहुजन समाज पार्टी)
गोपाल उईके (गोंडवाना गणतंत्र पार्टी)
विनोदकुमार नंदुरकर (आंबेडकराईट्स पार्टी ऑफ इंडिया), चिंधूजी उके (अपक्ष)
संतोष उमरे (अपक्ष)
सुरेशकुमार चौरागडे (अपक्ष)
छैलबिहारी अग्रवाल (अपक्ष)
धमेन्द्र गजभिये (अपक्ष)
नारायण पटले (अपक्ष)
दिगंबर पाचे (अपक्ष)
नामदेव बोरकर (अपक्ष)
लक्ष्मण मेश्राम (अपक्ष)
मंगल मस्करे (अपक्ष)
इंजि.राजू ठकरेले (अपक्ष)

-:आमगाव विधानसभा:-
मूलचंद गावराने (शिवसेना)
रमेश ताराम (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)
संजय पुराम (भाजप)
रामरतनबापू राऊत (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)
श्रीमती शारदा उईके (बसप)
केशवकुमार भोयर (अपक्ष)
सहेसराम कोरोटे (अपक्ष)
संतोष नाहाके (अपक्ष)

आत्मसमर्पित नक्षलवादी बजावणार मतदानाचा हक्क

0

नागपूर – सामान्य नागरिकांप्रमाणेच गडचिरोलीतील नक्षलवाद्यांनासुध्दा भारतीय लोकशाही व्यवस्थेचे महत्त्व कळले आहे. त्यामुळेच बुलेट ऐवजी बॅलेटचा वापर करून गडचिरोलीतील आत्मसमर्पित नक्षलवादी येत्या १५ ऑक्टोबर रोजी होणाèया विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहे. त्यासाठी गडचिरोली पोलिसांनी २५ आत्मसमर्पित नक्षल्यांना भारत निवडणूक आयोगाचे मतदान ओळखपत्र उपलब्ध करून दिले आहे. यात ४ महिलांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यावर्षीच्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच ६२ आत्मसमर्पित नक्षल्यांनी मतदान केले होते.
राज्यात येत्या १५ ऑक्टोबर २०१४ रोजी मतदान होत आहे. नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकावा, असा फतवा नक्षल्यांनी काढल्यानंतर त्यांच्याच एकेकाळच्या सहका-यांनी नक्षल्यांना घरचा आहेर दिला आहे. बंदुकीच्या बळावर सशस्त्र क्रांतीची भाषा करणा-या आणि भारतीय राजसत्तेला आव्हान देणा-या नक्षल्यांना लोकशाहीचे महत्त्व कळले आहे. १५ – २० वर्षे नक्षल चळवळीत काम केल्यानंतर या चळवळीचा फोलपणा दलम सदस्यांच्या लक्षात आला आहे. राजसत्तेचे केवळ दिवास्वप्न दाखवून बंदूक आणि हिंसेच्या बळावर सामान्य आदिवासींची हत्या करण्यालाच या चळवळीने प्राधान्य दिले आहे. विचारहीन असलेल्या या चळवळीत होणारी कुचंबना, आरो१⁄२याच्या समस्या, सदैव भटकंती, अंतर्गत घुसमट आणि कायम मृत्युचे भय यामुळे मोठ्या संख्येने नक्षलवादी दलम सोडून विकासाच्या मुख्य प्रवाहात येत आहेत.
एकीकडे आत्मसमर्पित नक्षलवादी लोकशाहीवर विेशास दाखवून मतदानात भाग घेत असताना सामान्य नागरिकांनीही नक्षल्यांच्या दबावाला बळी न पडता मोठ्या संख्येने मतदानात सहभागी व्हावे, असे आवाहन पोलिस विभागाकडून करण्यात आले आहे. संपूर्ण राज्यात सुरक्षेच्या दृष्टीने अतिसंवेदनशील असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात निवडणूक प्रक्रिया शांततेत व सुव्यवस्थित पार पाडण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे.

कर्तव्यशून्य भाजपनेता जि.प.च्या जलसंधारण समिती सदस्यपदी कसा?

0

गोंदिया– कधीही साधी प्रभागातील निवडणूक लढण्याची qहमत केली नाही. कंत्राटदारीच्या माध्यमातून मात्र पक्षाच्या नावाखाली प्रचंड माया गोळा केली. असे असताना जे कार्यकर्ते आपल्या श्रमाच्या जोरावर जनतेतून निवडून आले, त्यांच्यावर हुकमत गाजवीत भाजप म्हणजे काय, हे त्याच लोकप्रतिनिधींना हिनवत समजावण्याचा प्रयत्न करणाèया व्यक्तीला भाजपने जलसंधारण समितीच्या सदस्यपदी घेतले. जर अशा कर्तव्यशून्य आणि आयत्या पीठावर रेघा ओढणाèयांना काडीचाही संबंध नसताना महत्त्वाच्या पदावर घेण्यात येत असेल, तर कार्यकत्र्यांची गरजच काय? असा सवाल आता पक्ष कार्यकत्र्यांनी पक्षश्रेष्ठींच्या पुढ्यात उभा केला आहे.
ग्रामीण विकासाची नाळ म्हणजे जिल्हा परिषद. जिल्हा परिषद ही अत्यंत महत्त्वाची यंत्रणा असून या संस्थेवर निवडून येणारे सदस्य विकासाचा आराखडा तयार करतात. या जिल्हा परिषदेत सध्या भाजपची एकहाती सत्ता आहे. अशीही ही सत्ता गेल्या अडीचवर्षापूर्वी निव्वळ एका सभापतीच्या कारणामुळे विविध कारणांनी चर्चेत आली होती. मात्र, यात इतर पदाधिकारी व सदस्यही विनाकारण गोवले गेले होते. त्यानंतरही भाजपच्याच हातात सत्ता असून नव्याने गठित झालेल्या जलसंधारण विभागाच्या समितीवर दोन अशासकीय सदस्य नेमावयाचे असतात.
त्यामध्ये गोंदियातील एका भाजपच्या महामंत्र्याला संधी देण्यात आली. त्या महामंत्र्याचा तसा त्या यंत्रणेशी काडीमात्र संबंध येत नसला तरी वीटभट्टी आणि रेतीच्या व्यवसायासोबतच ठेकेदारी करण्याचा अनुभव प्रगाढ असा आहे. अशा नामी कंत्राटदार व्यक्तीला जलसंधारण समितीवर का नेमण्यात आले? हा संशोधनाचा विषय ठरला आहे.
असे असले तरी तीच व्यक्ती विधानपरिषदेच्या निवडणुकीत मात्र गोंदिया मतदारसंघातील पोवार, कुणबी जिल्हा परिषद सदस्यांवर पाळत ठेवण्याचे काम करीत होती. ज्या पुनाटोला भागात या महोदयाचे वास्तव्य आहे, त्या भागातून ते महोदय कधी निवडून आले ते सोडा, त्यांनी कधीही निवडणूक लढविलीच नाही. परंतु, ज्यांनी निवडणूक लढवून जिल्हा परिषद व नगरपरिषदेत पोचले त्यांनाच भाजप काय आहे, हे सांगायला चालल्याने त्या महोदयाविरुद्ध चांगलेच वातावरण तापले आहे.
विशेष करून भाजपचे कधी महामंत्रीपद तर कधी दुसरे पद घेऊन निवडणुकीत येणारा भाजपचा पैसा आपल्या हातात कसा राहील, आणि तो वाटप करताना ग्रामीण व शहरी भागातील निष्ठावंत भाजप कार्यकर्ता त्याला सलाम कसा ठोकेल, म्हणजे आपण मोठे असल्याचे दिसेल याच तोèयात वावरणाèया व्यक्तीला निव्वळ भाजपचा पदाधिकारी म्हणून जलसंधारण समितीत ठेवण्यात आले. पण जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजय शिवणकर यांना आता तरी आपण आपल्या यंत्रणेत कुठल्या व्यक्तीला समितीवर नेमून ग्रामीण भागातील चांगल्या अभ्यासू तज्ज्ञावर अन्याय तर केला नाही ना, हा विचार करण्याची वेळ आली आहे.

कर्जबाजारी शिक्षकाला बदलीवर सोडले

0

गोंदिया : जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी संस्था पतसंस्था र्मयादित गोंदियाच्या कोहमारा शाखेतून एका शिक्षकावर कर्ज असतानाही कर्ज नसल्याचे दाखविले. त्याला आंतरजिल्हा बदलीसाठी मोकळे करण्यात आले.
सडक/अर्जुनी तालुक्याच्या प्राथमिक शाळा खजरी येथे कार्यरत अशोक नवनाथ राख या शिक्षकांची जून २०१४ मध्ये आंतरजिल्हा बदली झाली. त्या शिक्षकाला मोकळे करण्यासाठी संस्थानचे व बँकाचे कर्ज नसल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागते. जून २०१४ मध्ये या शिक्षकावर ४लाख ३२ हजार १९५ रुपये घेणे बाकी होते. परंतु सत्ताधारी संचालकाच्या मर्जीतील तो शिक्षक असल्यामुळे कोहमारा शाखेच्या लेटर पॅडवर कर्ज नसल्याचे खोटे प्रमाणपत्र सडक/अर्जुनी पंचायत समितीला देण्यात आले. त्या अर्जावर तारीख नाही जावक क्र. नाही तरी ही हे पत्र देण्यात आले.ते पत्र खरे की खोटे याची शहानिशा न करता खंडविकास अधिकारी यांनी जि.प.परभणीला सदर शिक्षकाला जाण्यासाठी मोकळे केले.

ओबीसी मतदार ठरविणार आमदार

0

गोंदिया- गोंदिया विधानसभा मतदारसंघ हा जिल्ह्यातील सर्वाधिक मतदार असलेला क्षेत्र आहे. या मतदार संघातील बहुसंख्य असलेल्या पोवार ,कुणबी,कलार,लोधी,मरार ,मळी
समाजातील नेत्यांनी भाजप असो वा राष्ट्रवादी वा काँग्रेस या पक्षात नेहमीच निष्ठेने कार्य केले. नेहमी द-या उचलणा-या या नेत्यांना पक्षाने चांगलेच राबवून घेतले. असे असले तरी या नेत्यांनी कधीही कुरबूर केली नाही. केवळ एकवेळा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद वगळता पोवार समजाला
ला या पक्षांनी फार काही दिले नाही. तुकडे दाखवून नेहमी या समाजाची बोळवण करण्याचे कार्य नेहमी होत गेले. तरीही या समाजातील नेत्यांनी कधीही हाराकिरी केली नाही. यामुळे यावेळी तरी हे राजकीय पक्ष या समाजाच्या सन्मानाला ठेच पोचविणार नाहीत, अशी अपेक्षा समाजातील मतदार बाळगून होते,परंतु त्ङ्मांच्ङ्मा त्ङ्मा अपेक्षेलाही काही वाव ‘िमळाला नाही.कलार समजातील सुरेश चौरागडेंनाही आपल्ङ्मा अस्तित्वासाठी रिंगणात उतरावे लागले आहे. पक्षप्रमखांनी गेल्ङ्मा अनेक वर्षापासून ङ्माठिकाणी भाजप राष्ट्रवादीकडून आम्हाला उमदवारी मळेल ङ्मा आशेत असलेल्ङ्मांच्ङ्मा आशेवरही पाणी ङ्केरले ङ्मामळे गोंदिङ्मा मतदारसंघ भाजप राष्ट्रवादीवर चांगलाच नाराज दिसून ङ्मेत असून पोवार , कुणबी,कलार,मळी,मरार,लोधी समजातील मतदार ङ्मा निवडणुकीत काङ्म निर्णाङ्मक भूमका घेतात त्ङ्माकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
obc-matdar
भाजपने तर १९६२ पासून पोवार ,कुणबी,मरार,मळी,लोधी समजाला कधी विधानसभेत जाण्ङ्माची संधी दिली हे त्ङ्माच पक्षातील मठ मठ्या वावड्या उठविणाङ्र्मानी सांगितल्ङ्मास जनतेलाही कळेल.मधल्ङ्मा काळात शिवसेनेच्ङ्मा कोट्यात मतदारसंघ गेल्ङ्मानंतर कुठे कुणबी समजाला संधी मळाली.परंतु पोवार समज हा अद्यापही मगेच आहे.त्ङ्मातही पोवार समजानंतर मठ्या संख्ङ्मेने असलेला दलीत,कलार,लोधी,मरार समजही उपेक्षित राहिला आहे.
गोंदिया विधानसभा मतदारसंघ हा जिल्ह्यात सर्वांत मोठा मतदारसंघ आहे. या मतदारसंघाकडे जिल्ह्याचेच नव्हे तर संपूर्ण विदर्भाचे लक्ष लागले आहे. नेहमी याच मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीचा उमेदवार आघाडीवर असायचा. मात्र, २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीला मागे टाकत भाजपने तब्बल साडे सहा हजाराची आघाडी घेतली. या आघाडीमुळे भारतीय जनता पक्षात उत्साह संचारला होता पक्षाने ग्रामीण भागातील उमेदवाराला संधी द्यावी, असा ठरावही गोंदिया ग्रामीण भाजपने घेतला.
राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपली दावेदारी पुढे केली. या मतदारसंघात सर्वाधिक मतदारसंख्या ही पोवार समाजाची असून आजवरच्या इतिहासात कधीही कुठल्याही पक्षाने या समाजातीलच नव्हे तर कुणबी समजातील नेत्याला उमेदवारी दिलेली नाही. राष्ट्रवादीने तर नेहमच गोqवद शेंडे ङ्मांच्ङ्मावर अन्ङ्माङ्म केलेला आहे.
या मतदारसंघातच नव्हे जिल्ह्यातही पोवार समाजाने अद्यापही एकी दाखविली नाही. कारण या समाजातील विविध पक्षात विखुरलेल्या नेत्यांवर समाजाचा विश्वास देखील उरला नाही. हे वास्तव्य या समाजातील नेत्यांनाही विसरणे शक्य नाही.
पोवार समाजातील नेत्यांच्या हाती पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाची सूत्रे दिली, म्हणजे खूप काही दिले असे राजकीय गणित बनले आहे. परंतु, त्या जिल्हाध्यक्षांची काय अवस्था आहे, हे त्यांनाच ठाऊक. या परिस्थितीचे राजकीय विश्लेषण करून आपली राजकीय शक्ती टिकवून ठेवण्यात हा समाज अपयशी ठरला आहे.
गोंदिया मतदारसंघातून यावेळी निवडणूक लढविण्यासाठी प्रामुख्याने पोवार समाजातील उमेदवार समोर आले होते.तसेच कुणबी समजातूनही आले होते. ङ्मा दोन समजापैकी कुणा एकाला संबंधित पक्ष उमेदवारी देईल,असे चित्रही निर्मण झाले होते,मत्र ङ्मा समजाच्ङ्मा नेत्ङ्मांची तुती चाललीच नाही आणि राष्ट्रवादी व भाजपमधील कुणबी,पोवार,कलार,लोधी,मरार,मळी समजातील नेत्ङ्मांना इतरांचेच प्रचार करावे लागले त्ङ्मातही काही तथाकथीत काही ओबीसी
समजातील नाराज नेत्ङ्मावर नजर ठेऊन त्ङ्मांची जासुसी करुन पक्षाच्ङ्मा नेत्ङ्माकंडे आपण कसे चांगले चमच आहोत हे चांगले दाखविणारे राष्ट्रवादी,भाजपचे निष्ठावंत ठेकेदार बनल्ङ्माने ओबीसी समजातील नेत्ङ्मांचेच नव्हे काङ्र्मकत्ङ्र्मांचेही वाईट दिवस सुरु झाले आहेत.
दलीत समजावरही होत असलेला अन्ङ्माङ्म बघुन ङ्मावेळी बहुजन समज पक्षाने ङ्मोगेश बनसोड ङ्मांना रिंगणात उतरवले. बसपकडून लोधी समजाचे राजीव ठकरेले ङ्मांनी उमदवारी मगितली परंतु त्ङ्मांच्ङ्माही पदरी निराशा पडल्ङ्माने त्ङ्मांनी अपक्ष रिंगणात राहण्ङ्माचा निर्णङ्म घेत बसपशी बंडखोरी केली.
राष्ट्र‹वादीने कधीही गोंदिया भंडारा जिल्ह्यात पोवार समाजाला पुढे येऊ दिले नाही, हे वास्तव आहे. राष्ट्रवादी जेव्हा अस्तित्वात आली तेव्हा सतिश राऊत ङ्मांच्ङ्मा मध्ङ्मङ्कातून उमदवारी गोंदिङ्मातून दिली गेली होती.परंतु तो काळ ङ्मा पक्षाच्ङ्मा जन्मचाच होता त्ङ्मामळे त्ङ्मा उमदवाराचे काङ्म होणार हे सर्वांनाच ठाऊक होते.आम्ही प्रतिनिधीत्व दिले हे सांगून होत नसते.
भाजपने १९६२ पासून गोंदिङ्मा मतदारसंघात दिलेल्ङ्मा उमदवाराकडे बघितल्ङ्मास बहुसंख्ङ्मेने भाजपसोबत असलेला समज म्हणून ज्ङ्मा पोवार व कुणबी समजाला ओळखले जाते त्ङ्मा समजाला एकदाही संधी दिली गेली नाही,हे वास्तव्ङ्म भाजपमधील मतदार विसरतो की अन्ङ्माङ्माचा प्रतिकार करतो हे तर ङ्मेत्ङ्मा १९ आँ्नटोंबरच्ङ्मा निकालानंतरच कळणार आहे.
तिरोड्यात काँग्रेसचे पी.जी.कटरे, भाजपचे विजङ्म रहांगडाले आणि अपक्ष दिलीप बन्सोड ङ्मांच्ङ्मात रंगत दिसून ङ्मेत आहे. ङ्मा मतदार संघात पोवार समजाची मते विभाजण्ङ्माची श्नङ्मता असल्ङ्माने अपक्ष उमदवार दिलीप बन्सोड ङ्मांना लाभ होण्ङ्माची श्नङ्मता वर्तविली जात आहे. बसपने दिलेला छुपा पाqठबा आणि शिवसेनेचे पंचम बिसेन ङ्मांनी भाजपमध्ङ्मे मरलेली सेंध भाजपसाठी धोकादाङ्मक दिसून ङ्मेत आहे. ङ्मा परिस्थितीत काँग्रेसला अनुकूल वातावरण आहे. तर आमगाव मतदार संघात अखेरच्ङ्म दिवशी काँग्रेसचे उमदवार रामरतन राऊत हे मगे पडले असून राष्ट्रवादीचे रमश ताराम ङ्मांनी आघाडी घेतल्ङ्माने जिल्ह्ङ्मतील एकमव मतदार संघ राष्ट्रवादीकडे जातो की काङ्म? अशी परिस्थिती निर्मण झाली आहे. ङ्मा भाजपचे संजङ्म पुराम मगे पडले आहेत. अर्जुनी मरगाव मतदार संघात भाजपचे राजकुमर बडोले आणि शिवसेनेच्ङ्मा किरण कांबळे ङ्मांच्ङ्मातच खरी लढाई दिसून ङ्मेत आहे. काँग्रेसचे राजेश नंदागवळी ङ्मांना अपक्ष किती डॅमज करतात त्ङ्मावर त्ङ्मांची परिस्थिती अवलंबून राहणार आहे.

प्रचाराच्या तोफा थंडावल्या

0

गोंदिया – राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी गेल्या २० दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा सोमवारी सायंकाळी सहा वाजता थंडावल्या असून २८८ मतदारसंघांत बुधवारी मतदान होणार आहे. राज्यात कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस, भाजप, शिवसेना, मनसे या प्रमुख पक्षांसह ४११९ उमेदवार रिंगणात आहेत.
यंदा प्रथमच पंचरंगी लढती होत असून उमेदवारांनी अखेरच्या दिवशी मुंबई, ठाण्यासह कोकणात सभा, रॅली, रोड शो, मतदारांच्या गाठीभेटी घेऊन मतदारसंघ पिंजून काढला. दरम्यान, निवडणूक आयोगाने मतदानाची सर्व तयारी पूर्ण केली आहे. मतदान नि:पक्षपाती व खुल्या वातावरणात होण्यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना, मनसे हे प्रमुख पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राज्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडत प्रत्येक मतदारसंघ पिंजून काढला आहे. सोमवारचा दिवस प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी राजकीय पक्ष जीवाचे रान करत होते.
राज्यातील प्रमुख नेत्यांच्या सभांसह रोड शो, पदयात्रांनी मतदारसंघात जोरदार प्रचार करण्यात आला. जाहीर प्रचार संपल्यानंतर छुप्या प्रचारावरच सर्वाचा भर असणार आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगाने मतदानाची सर्व तयारी पूर्ण केली आहे. राज्यात २८८ मतदारसंघ असून त्यापैकी २३४ मतदारसंघ हे खुल्या प्रवर्गासाठी, २९ मतदारसंघ हे अनुसूचित जाती तर २५ मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी राखीव आहेत. २८८ जागांसाठी ४११९ उमेदवार रिंगणात असून त्यापैकी ३८४३ उमेदवार पुरूष तर २७६ महिला उमेदवार आहेत.
अकोला आणि गुहागर मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे पाच उमेदवार रिंगणात आहेत तर नांदेड दक्षिण मतदारसंघात सर्वात जास्त ३९ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. काँग्रेसचे सर्वात जास्त २८७, शिवसेनेचे २८२, भाजपचे २८०, राष्ट्रवादीचे २७८ आणि मनसेचे २१९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. चिंचवड विधानसभा मतदारसंघ सर्वात मोठा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात ४ लाख ८४ हजार मतदार तर वडाळा हा सर्वात लहान मतदारसंघ असून त्यात १ लाख ९६ हजार मतदार आहेत.
दीड लाख मतदान यंत्रे
या निवडणुकीसाठी १ लाख ५१ हजार मतदान यंत्रांचा वापर करण्यात येणार आहे. राज्यातील ८ कोटी ३५ लाख ३८ हजार १४४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
२३३१ मतदान केंद्रे संवेदनशील
मतदान मुक्त व निपक्षपाती होण्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या ३२० कंपन्या, १ लाख २२ हजार पोलिस मतदानाच्या दिवशी तैनात केले आहेत. राज्यात २३३१ मतदान केंद्र ही संवेदनशील तर ६२६ मतदान केंद्र अतिसंवेदनशील घोषित केली आहेत. गडचिरोलीत सर्वात जास्त ४५० मतदान केंद्रे ही संवेदनशील आहेत. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकही मतदान केंद्र संवेदनशील नाही. मुंबईत ३४१, ठाणे ३९९, रायगड १९ आणि रत्नागिरी १ मतदान केंद्र संवेदनशील आहे.