मोटार सायकल चोरास अटक, चोरीच्या दोन मोटर सायकल हस्तगत

0
12

गोंदिया,दि.18ः-जिल्ह्यात वाढत्या चोरीच्या घटना, घरफोडी, मोटर सायकल चोरीचे प्रमाण पाहता स्थानिक गुन्हे शाखेस तसेच जिल्ह्यातील सर्व ठाणे प्रमुखांना चोरी, घरफोडी, मोटर सायकल चोरी करणार्या गुन्हेगारांचा शोध घेऊन गुन्हे उघडकीस आणून गुन्हेगारांना जेरबंद करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी दिले होते.त्यांच्या निर्देशानुसार अप्पर पोलीस अधीक्षक, कॅम्प देवरी अशोक बनकर यांचे आदेशांन्वये जिल्ह्यात चोरी, घरफोडी , मो. चोरी करणाऱ्या गुन्हेगारांना जेर बंद करण्या करिता शोध मोहीम राबवून गुन्हेगार प्रवुत्तीच्या इसमांना पायबंद घालण्यात येत आहे.
या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक गोंदिया शहर , रामनगर, ग्रामीण,रावणवाडी,परिसरात चोरी,घरफोडी, मोटर सायकल चोरी करणाऱ्या गुन्हेगारांचा शोध w गस्त करीत असताना पथकास गुप्त बातमीदारा कडुन खात्री लायक माहीती मिळाली की. एक ईसम हा चोरी ची मो.सा. होंडा शाईन सी. जी. पासिंग असलेली घेवून छोटा गोंदिया परिसरात विक्री करीता फिरत आहे.अश्या प्राप्त माहितीवरुन पोलीस पथकाने संशयीत ईसमाचा शोध घेऊन छोटा गोंदिया चावडी चौक येथून ईसम नामे- वाल्मीकी उर्फ बाळू लोकचांद हरिंनखेडे वय 38 रां. पाथरी त. गोरेगांव यास मोटर सायकलसह ताब्यात घेतले.

ताब्यात घेण्यात आलेल्या ईसमास त्याचे ताब्यातील मोटर सायकल बाबत विचारपूस केली असता त्यानी मोटर सायकल रायपूर ( छ. ग.) येथुन चोरी करून आण ल्याचे तसेच त्यांनी पो. ठाणे रामनगर गोंदिया हद्दीतून एक मो.सा. चोरल्याचे सांगितल्याने त्याचे ताब्यातून चोरीच्या दोन मोटर सायकली हस्तगत करून जप्त करण्यात आलेल्या आहेत.
जप्त मोटार सायकल चे वर्णन खालील प्रमाणे
१) एक होंडा कंपनीची शाईन मो.सा. क्र.CG 04 KZ 9114 किमती अंदाजे 45000/- रूपये

२) एक होंडा कंपनीची ड्रीम युगा मो.सा. क्र. MH 35 AF 5232 किमती अंदाजे 45000/-
अश्या दोन्ही मो. सा. किंमती अं. 90,000/- च्या चोरीच्या गुन्ह्यात जप्त करण्यात आल्या आहेत.

पोलीस ठाणे रामनगर येथे मो. सा. चोरी बाबत गुन्हा दाखल असल्याने आरोपी यास चोरीच्या दोन्हीं मोटर सायकल सह रामनगर पोलीसांचे स्वाधीन करण्यात आले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहेत.

सदरची कामगीरी मा. वरिष्ठांचे आदेशानुसार पोलीस निरिक्षक  दिनेश लबडे, स्थानिक गुन्हे शाखा, यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप. नि. महेश विघ्ने,पो.हवा. राजेंद्र मिश्रा, अर्जुन कावळे, भूवनलाल देशमुख, लक्ष्मण बंजार , पोशि संतोष केदार , यांनी केलेली आहे.