नक्षल सर्मथकास एक वर्ष तीन महिन्याचा कारावास

0
12

गडचिरोली,दि.12ः-स्फोटक साहित्य नक्षल्यांना पुरविण्याच्या कारणावरून अटक करण्यात आलेल्या नक्षल सर्मथकास गडचिरोली येथील जिल्हा सत्र न्यायालयाने एक वर्ष तीन महिन्याचा सर्शम कारावास व ५00 रुपये दंडाची शिक्षा सुनावली. बुधराव दस्सा उसेंडी, रा. पेरमालभट्टी, ता. भामरागड असे शिक्षणा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार,बुधराम दस्सा उसेंडी हा १७ ऑक्टोबर २0१७ रोजी भामरागडवरून स्फोटक साहित्य लाहेरीकडे नक्षलवाद्यांना पुरविण्यासाठी घेवून जात असताना भामरागड बाजार चौकात पोलिसांनी स्फोटक साहित्यासह पकडले व सहा. पोलिस निरीक्षक संदीप रमेश भांड यांनी भामरागड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. आरोपीला तत्काळ अटक करण्यात आली व त्याच्याविरोधात अपराध क्रमांक ३00३/२0१६, कलम ४,५ भारतीय स्फोटक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदर प्रकरणाचा तपास पूर्ण करून पोलिस उपनिरीक्षक भूषण बैसाने यांनी दोषारोपत्र न्यायालयात दाखल केले.
११ जानेवारीला सरकारी पक्षाचे साक्षीदार तपासून व सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीला कलम ४,५ भारतीय स्फोटक कायद्यान्वये १ वर्ष ३ महिने सर्शम कारावास व ५00 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अनिल प्रधान यांनी काम पाहिले.