गोंदिया पंचायत समितीवर काँग्रेसच्या श्रीमती हरिणखेडे तर गोरेगावमध्ये भाजप बंडखोर टेंभरे विजयी

0
24

गोंदिया,दि.१२ गोंदिया जिल्ह्यातील पंचायत समिती सभापतीसाठी आज निवडणुका पार पडल्या यात गोंदिया पंचायत समितीच्या सभापती काँगे्सच्या माधुरी अंकेश हरिणखेडे तर उपसभापती पदी चमणलाल बिसेन यांची बिनविरोध निवड करण्यात आली.आमदार गोपालदास अग्रवाल यांनी काँग्रेसचा गड कायम राखण्यासाठी पुर्ण प्रयत्न केले कारण राष्ट्रवादीने दोन सदस्य पळविल्याचा आरोप झाला होता.परंतु आज राष्ट्रवादी व भाजपकडून सभापती व उपसभापतीपदासाठी अर्ज दाखल न करण्यात आल्याने काँग्रेसचे दोन्ही उमेदवार निर्विरोध निवडून आले.सभापती माधुरी हरिणखेडे व उपसभापती चमन बिसेन यांनी आमदार अग्रवाल,प्रफुल अग्रवाल,जिल्हा अध्यक्ष पुरुषोत्तम कटरे,तालुकाध्यक्ष रामकिसन रहमतकर यांचे आभार मानले आहे.नवनिर्विचीत सभापती व उपसभापतीचे मावळते सभापती व उपसभापती यांनी अभिनंदन केले.

सडक अर्जुनी – राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व गोंदियाचे पालकमंत्री राजकुमारजी बडोले यांच्या मतदार संघातील सडक अर्जुनी पंचायत समितीवर भाजपने वर्चस्व कायम ठेवले आहे. सडक/ अर्जुनी पंचायत समिती सभापतीपदी गिरीधारी हत्तीमारे व उपसभापतीपदावर राजेस कठाने यांची बिनविरोध निवड झाली.राष्ट्रवादी व काँग्रेसने याठिकाणी आपला उमेदवार न देत राजकीय तडजोड स्विकारल्याची चर्चा आहे.तर पालकमंत्री या राजकीय समीकरणात विजयी झाल्याचेही बोलले जात आहे.त्यातच पालकमंत्री बडोले यांनी अर्जुनी मोरगाव येथेही भाजपचे वर्चस्व कायम ठेवण्यात यश मिळविले आहे.

आमगाव पंचायत समिती सभापतीपदी श्रीमती वंदना बोरकर यांचीही बिनविरोध निवड झाली आहे.तर उपसभापती पदासाठी राष्ट्रवादीचे भगवान बावनकर व भाजपचे जयप्रकाश शिवणकर रिंगणात असून दोघांनाही 6 मते पडल्याने ईश्वरचिठ्टीवर निकाल लागणार आहे. काँग्रेस 3,राष्ट्रवादी 5 व भाजप 4 अशी सदस्य संख्या आहे.काँग्रेसच्या 2 सदस्यांनी भाजपला मतदान केले. तिरोडा पंचायत समितीच्या सभापती पदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वडेगाव गणाच्या सद्या निताबाई हिवराज रहागंडाले व तर मुंडीकोटाचे मनोहर राऊत यांची उपसभापतीपदी निवड झाली आहे.

सडक अर्जुनीच्या सभापती पदी भाजपचे गिरधारी हत्तीमारे तर उपसभापती पदी राजेश कठाणे यांची निवड झाली.सालेकसा पंचायत समितीच्या अर्जुनी मोरगावच्या सभापती अरविंद शिवणकर तर उपसभापती काॅंग्रेसच्या करूणा नांदगावे  विजयी झाल्या.शिवणकर यांना भाजपने पुन्हा संधी दिली आहे.सालेकसा पंचायत समिती सभापती पदी अर्चना राऊत तर उपसभापतीपदी दिलीप वाघमारे विजयी झाले आहेत.देवरी पंचायत समिती सभापती पदी भाजपच्या सुनंदा बहेकार व उपसभापतीपदी गणेश सोनभोईर हे निवडून आले आहेत.देवरी-आमगावचे आमदार संजय पुराम यांनी यावेळी उपसभापतीपद सुध्दा भाजपकडेच कायम ठेवत काँग्रेसला हटकले.

गोरेगाव सभापतीपदावर भाजपच्या बंडखोर माधुरी टेंभरे विजयी

गोरेगाव पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपमध्ये बंडखोरी झाली असून भाजपच्या माधुरी रिषीपाल टेंभरे या काँग्रेसच्या गटात जाऊन सभापती पदासाठी रिंगणात राहिल्याने भाजपचे सभापती पदाचे उमेदवार विद्यमान उपसभापती सुरेंद्र बिसेन यांच्यासमोर आवाहन उभे झाले होते.या निवडणुकीत बंडखोर माधुरी टेंभरे या 5 मते घेऊन काँग्रेसच्या गटातून सभापती पदावर तर अपक्ष सदस्य लिना बोपचे या उपसभापती पदी विजय झाल्या आहेत.भाजपचे उपसभापती पदाचे उमेदवार पु्ष्पराज जनबंधू यांचा पराभव झाला.काँग्रेसचे सदस्य रामा चर्चे हे आजारी असल्याने गैरहजर होते.भाजप 5,अपक्ष 1, काँग्रेस 3 व राष्ट्रवादी 1 अशी सदस्य संख्या होती.राष्ट्रवादीने यावेळी काँग्रेसला सहकार्य केले आहे.