खुर्शीपार,मानेगावच्या जंगलात तीन हरीणांची शिकार

0
13
गोंदिया,दि.१६- आमगाव वनपरिक्षेत्रातंर्गत येणाNया मानेगाव क्षेत्रातील खुर्शीपार जंगलात तीन हरणाची शिकार अज्ञात शिकाNयांनी केल्याची घटना आज १६ पेâब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजताच्या  सुमारास उघडकीस आल्याने जिल्ह्यात खळबळ माजली आहे.
सविस्तर असे की, मानेगाव दहेगाव हे जंगलव्याप्त क्षेत्र असून आज दुपारी एक शेतकरी जंगलाच्या मार्गाने शेतात जात असताना त्याला तीन हरीण मृतावस्थेत आढळून आले. दरम्यान त्यांनी ही माहिती वनविभागाचे अधिकाNयांच्या लक्षात आणून देताच वनविभागाचे अधिकारी आपल्या ताफ्यासह खुशीaपार भागातील  जंगलात पोहचले असता, त्यांना तीन हरीण मृतावस्थेत असल्याचे दिसून आले. त्यापैकी दोघांचे शिंग कापलेले होते. हरणांची स्थिती पाहता, विजेच्या प्रवाहाने त्यांचा मृत्यू झाला नसावा. विषबाधेमुळे असू शकते असा अंदाज वनपरिक्षेत्राधिकारी प्रदिप चन्ने यांनी वर्तविला असून अज्ञात आरोपींचा शोध घेण्यास सुरूवात करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र,तीन हरीणांपैकी दोन हरिणांचे शिंग गायब असल्याने कदाचित जादूटोण्यासाठी या हरीणांची शिकार करण्यात आल्याची चर्चा तालुक्यात आहे.