कनिष्ठ लिपिक जांभुळकर एसीबीच्या ताब्यात

0
10

तिरोडा,दि.05 : स्वस्त धान्य दुकानाच्या जुलै २०१८ या महिन्याकरीता लागणार्या रेशनच्या परवान्यासाठी १७०० ™पये लाच घेताना कनि‰ लिपीक अभिषेक शालिकराम जांभुळकर (३५) याला (दि.४) रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई गोंदिया लाचलुचपत विभागाने केली. याप्रकरणी तिरोडा पोलिस ठाण्यात लाचलुचपत कायद्यान्वये आरोपी अभिषेक जांभुळकर विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तक्रारदार विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचा अध्यक्ष असून तो स्वस्त धान्य दुकान चालवितो. तक्रारदाराने जुलै २०१८ या महिन्याचे रेशनासाठी तिरोडा तहसील कार्यायातील अन्न पुरवठा विभागात जावून परवान्यासाठी अर्ज केले. दरम्यान गोडावूनमधून माल घेवून जाण्याच्या परवान्याकरीता कनिष्ठ लिपीक जांभुळकर यांनी तक्रार दाराला १७०० रूपयांची लाच मागितली. १७०० रूपये द्या अन् परवाना घेवून जा, असे स्पष्ट तक्रारदाराला म्हटले. तक्रारदाराला लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्याने गोंदिया लाचलुचपत विभागाकडे फिर्याद नोंदविली. लाचलुचपत विभागाने ३ जुलै रोजी तक्रारी शहनिशा केली असता कनिष्ठ लिपीक जांभुळकर लाच मागत असल्याचे निदर्शनास आले. यावरून आज (ता.४) दुपारी सापळा रचण्यात आला. दरम्यान कनिष्ठ लिपिक अभिषेक जांभुळकर याने तक्रारदाराकडून परवान्याच्या नावावर पंचासमक्ष १७०० रूपयाची लाच स्विकारली. सापळा कारवाईत आरोपी अभिषेक जांभुळकर लाच घेताना अडकल्याने तिरोडा पोलिस ठाण्यात त्याच्याविरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधिक्षक पी.आर.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधिक्षक रमाकांत कोकाटे, पो.नि.दिलीप वाढणकर,स.पो.दिवाकर भदाडे, राजेश शेंदरे, रंजित बिसेन, नितीन रहांगडाले, वंदना बिसेन, चालक देवानंद मारबते यांनी केली.