धापेवाडा प्रकल्पाच्या जलसाठ्याची नोंदच होईना

0
49
गोंदिया दि.५ :: खरीप हंगाम सुरू  होताच जिल्हा प्रशासनाच्या वतीने कार्यकारी अभियंता बाघ इटियाडोह पाटंबंधारे विभाग गोंदिया यांच्याकडून १ जून ते ३० सप्टेंबर जिल्ह्यात पडलेल्या सरासरी पावसाची नोंद तसेच जिल्ह्यातील प्रमुख धरणांतील एकूण उपलब्ध जलसाठयाची माहिती दररोज पुरविण्यात येते. मात्र, तिरोडा तालुक्यातील कवलेवाडा नदीघाटावर तयार करण्यात आलेल्या धापेवाडा सिंचन प्रकल्पातील एकूण जलसाठा उपलब्धतेची नोंदच या विभागाच्या माध्यमातून दाखविण्यात येत नसल्याने प्रशासनाचा खेळ हा शेतकèयांना अडचणीत आणणारा ठरत आहे.
दुसरीकडे जलसाठयाची नोंद दाखविण्यात येऊ नये, अशी माहिती विभागाच्या संबंधिताकडे चौकशी केल्यानंतर मिळाली आहे. यामुळे हा प्रकल्प शेतकèयांसाठी की उद्योगासाठी? असा सवालही उपस्थित होत आहे.धापेवाडा सिंचन प्रकल्पाचे काम जेव्हा हाती घेण्यात आले, तेव्हा या प्रकल्पाच्या माध्यमातून गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा,गोरेगाव, सडक अर्जुनी, गोंदिया व अर्जुनी मोरगाव या तालुक्यासह भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल, असे आश्वासन देण्यात आले. मात्र, तिरोडा तालुक्यातील गुमाधावडा येथील एमआयडीसी येथे अदानी विद्युत प्रकल्प साकार झाल्यानंतर या प्रकल्पाचे पाणी विद्युत प्रकल्पाला देणे सुरू झाले. विद्युत प्रकल्पाला जात असलेल्या पाण्यामुळे शेतकèयांनी आंदोलनात्मक भूमिकाही घेतली. मात्र, त्याचाही लाभ काही झाला नाही. उलट सिंचन प्रकल्प असलेल्या कवलेवाडा परिसरातील शेतकèयांनाही खरीप व रब्बी हंगामातील धानपिकासाठी आजही पाण्यासाठी सिंचन प्रकल्प विभागाच्या पायèया जवाव्या लागतात. त्यातच खरीप हंगामात बाघ इटियाडोह पाटबंधारे विभागाच्या वतीने जिल्ह्यात पडणाèया दररोजच्या पावसाची नोंद तसेच जिल्ह्यातील इटियाडोह, शिरपूर,पुजारीटोला, कालीसराड व धापेवाडा या धरणांतील एवूफ्ण उपलब्ध साठ्याची नोंद दाखवावी लागते. परंतु, मागील काही वर्षांपासून धापेवाडा सिंचन प्रकल्पातील एवूफ्ण उपलब्ध जलसाठ्याची नोंदच दाखविण्यात येत नसल्याने यावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. तर दुसरीकडे विभागाच्या माध्यमातून मध्य प्रदेश राज्यातील संजय सरोवर तसेच भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द व बावनथडी या प्रकल्पाचा एवूफ्ण उपलब्ध साठा दाखविला जातो. मात्र, धापेवाडा सिंचन प्रकल्पाचा का नाही? असा सवालही उपस्थित होत आहे. या सर्व धरणांपैकी फक्त धापेवाडा सिंचन प्रकल्पाचे पाणी विद्युत प्रकल्पाला जात असल्याने हा डाव खेळला जात असल्याचा संशयही निर्माण होऊ लागला आहे. एवंफ्दरीत ज्या उद्देशाने हा प्रकल्प तयार करण्यात आला, त्या उद्देशाची पूर्तता फक्त विद्युत प्रकल्पालाच होत असल्याने दोन्ही जिल्ह्यातील शेतकरी या प्रकल्पाच्या लाभापासून वंचितच राहणार, अशी स्थिती दिसून येत आहे.
धापेवाडा सिंचन प्रकल्पातील एवूफ्ण उपलब्ध जलसाठयाची नोंद का दाखविण्यात येत नाही, याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाशी विचारपूस केली असता, त्यांनी प्रकल्पात रेनगेज सिस्टम (पर्जन्यमापक यंत्र) लावले नसल्याने ही नोंद घेता येत
नसल्याचे सांगितले. तसेच संबंधित विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनीही एवूफ्ण उपलब्ध जलसाठा दाखवण्यास मनाई केल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे शासनस्तरावर हे सिंचन प्रकल्प फक्त विद्युत प्रकल्पासाठी तयार करण्यात आला का, अशी चर्चा सुरू झाली आहे
सिंचन प्रकल्पाची क्षमता ४४.०५ दलघमी
कार्यकारी अभियंता बाघ इटियाडोह पाटबंधारे विभाग यांच्याकडून देण्यात येणाèया मोठया धरणातील पाण्याच्या साठयाबाबतच्या माहिती पत्रात धापेवाडा सिंचन प्रकल्पाची क्षमता ४४.०५ द.ल.घ.मी. दाखविण्यात येत आहे. तर साठा १४.९१ दाखविण्यात येत आहे. तर मागील वर्षाची टक्केवारी ०.९६ टक्के दाखविण्यात येत आहे. विशेष म्हणजे,अद्यापही या प्रकल्पाचे पाणी तिरोडा तालुका वगळता इतर कोणत्याही तालुक्यात गेलेले नाही. त्यातच आता प्रशासनाने एकूण उपलब्ध साठयाचा सुरू केलेला खेळ हा शेतकèयांना या प्रकल्पाच्या लाभापासून वंचित तर ठेवण्याचा प्रकार नाही, असा आरोप होत आहे.त्यातच गेल्यावर्षीचा आकडाच दिला गेलेला नाही.तर धापेवाडा उपसा qसचन योजना ज्याठिकाणी आहे त्याठिकाणी पर्जन्यमापक यंत्र नसून त्याची त्या ठिकाणी पडलेल्या पावसाची नोंद ही भंडारा येथे घेतली जात असल्याची माहिती धापेवाडा उपसा qसचन योजनेचे कार्यकारी अभियंता यांनी दिली.