पांडुरंग आंबटकर आणि त्यांच्या मुलावर बलात्कार, गर्भपात व अॅट्रोसिटीचा गुन्हा

0
59
पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार पियुष आंबटकर यांच्याशी नागपूर येथील पीडित मुलीशी ओळखी झाली होती. ओळखीचे प्रेमात रूपांतर झाले. यानंतर पियुषने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून तरुणीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. हा प्रकार मागील दीड वर्षांपासून सुरू होता. याच दरम्यान तरुणी गर्भवती राहिली. त्यामुळे तिने लग्नाचा तगादा लावला. यावेळी, पियुष आणि पांडुरंग आंबटकर मुलीच्या घरी गेले. त्यांनी तरुणीला गर्भपात करण्यास सांगितले. मात्र, तिने गर्भपात करण्यास नकार दिला. पीडितीने  याविरोधात तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली. ही माहिती मिळताच आंबटकर यांचे धाबे दणाणले. त्यांनी तरुणीची समजूत करून तिला तिच्या घरी आणले. आपण लग्नासाठी तयार आहोत. मात्र, तरुणीची तब्येत ठीक नसल्याचे सांगत आधी तिने उपचार घ्यावे, असे पीडितेला सांगण्यात आले. यानुसार आंबटकर यांचा जावई तरुणीला नागपूर सदर येथील व्हिम्स रुग्णालयामध्ये घेऊन गेला. येथे पीडितेला गुंगीचे औषध देऊन तिचा गर्भपात करण्यात आला. शुद्धीवर आल्यावर ही गोष्ट तिच्या लक्षात आली. तिने मनसेच्या महिला कार्यकर्त्या प्रतिमा ठाकूर यांच्याशी संपर्क करुन घडलेल्या प्रकाराची माहिती दिली.त्यानंतर मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी हे प्रकरण लावून धरल्याने अखेर पोलिसांनी गुन्हा नोंदविला. पियुष आंबटकर याच्या विरोधात बलात्कार तर पांडुरंग आंबटकर आणि त्यांच्या मुलासह इतर सर्वांवर गर्भपात, अट्रोसिटी चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.