बेरडीपार/खुर्शीपार येथे दारुबंदी मेळावा

0
10

तिरोडा,दि.17-तालुक्यातील बेरडीपार/खुर्शीपार येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या परिसरात दारुबंदी व गुटखाबंदीकरीता महिला मेळाव्याचे आयोजन लायनेस क्लब तिरोड्याच्यावतीने करण्यात आले होते.या मेळाव्याला लायनेस कल्ब व ह्युमन राईटसच्या अध्यक्षा माधुरी रहागंडाले,प्रमुख अतिथी म्हणून पोलिस उपनिरिक्षक इंगळे,तहसिलदार रविंद्र चव्हाण,नगरपरिषद उपाध्यक्ष ममता बैस,मंदाताई गाढवे,माया पारधी,जिल्हा परिषद सदस्य रजनी सोयाम आदी मान्यवर उपस्थित होते.गावातील महिलांनी संघटित होऊन गावातील दारु आणि गुटखा विक्रीवर बंदी आणावी अशी ठोस भूमिका यावेळी मेळाव्यात व्यक्त केली.यावर उपस्थित मान्यवरांनी महिलांचा पाठिशी खंबीरपणे प्रशासन उभे असल्याचे आश्वासन देत दारुबंदी व गुटखाबंदी करण्याचा निर्णय घेतला.मेळाव्याला शालेय शिक्षक व विद्याथीर् उपस्थित होते.आभार श्री ठाकरे यांनी मानले संचालन श्री खोब्रागडे यांनी केले.