शिक्षणाधिकार्‍यांशी शिक्षक भारतीची चर्चा

0
8

गोंदिया दि.२१-: आपल्या विविध मागण्यांना घेऊन प्राथमिक शिक्षणाधिकारी यु.के. नरड यांच्याशी माध्यमिक व प्राथमिक शिक्षक भारतीच्या पदाधिकार्‍यांनी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांचे प्रलंबित समस्या मार्गी लावण्याची विनंती करण्यात आली. यावेळी यु.के. नरड यांचा शिक्षक भारतीतर्फे सत्कार ही करण्यात आला. शिक्षक भारती राबवित असलेल्या उपक्रमाची माहिती त्यांना दिल्यामुळे नरड यांनी शिक्षक भारतीचे कौतुक केले. याप्रसंगी शिक्षक भारती माध्यमिकचे जिल्हाध्यक्ष महेंद्र सोनवाने, विभागीय अध्यक्ष प्रकाश ब्राह्मणकर, पी.पी. बिसेन, संतोष मेंढे, प्रफुल ठाकरे, ए.बी. जांगडे, संजय धामोरीकर, उमेश टेंबरे, दिलीप रहांगडाले, एल.एच. पटले, एन.एम. कापगते, जे.जी. चक्रे, एम.एम. बिसेन, एम.एम. बहेकार, मडावी व मेश्राम यांनी चर्चेत भाग घेतला होता.