१७ हजार कुटुंबांना मिळाले गॅस

0
6

चंद्रपूर दि.२१-:: वनालगतच्या गावात राहणाऱ्या नागरिकांचे वनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी, वृक्षतोड थांबविण्यासाठी तसेच वन्यप्राणी-मानव संघर्ष टाळण्यासाठी वनविभागाने महत्त्वपूर्ण उपाययोजना केल्या असून वृक्षतोड कमी व्हावी यासाठी सन २०१०-११ ते २०१४-१५ या वर्षात १७ हजार ५०४ कुटूंबांना घरगुती गॅसचा पुरवठा करण्यात आला आहे. तर वन्यप्राण्यांच्या हल्यात झालेल्या नुकसानीपोटी चालू वर्षांत एप्रिल ते आॅगष्ट पर्यंत विविध ३ हजार ९७१ प्रकरणात १ कोटी ७९ लाख २० हजार रुपयाचे आर्थिक सहाय्य वनविभागातर्फे वितरीत करण्यात आले आहे.

चंद्रपूर वनवृत्तांतर्गत असलेल्या मध्य चांदा, चंद्रपूर व ब्रह्मपुरी वनविभागाच्या कार्यक्षेत्रात ४३३ संयुक्त वनव्यवस्थापन समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या सदस्यांना, ग्रामस्थांना सवलतीच्या दरात ७५ टक्के अनुदानावर गेल्या तीन-चार वर्षात शासनाच्या विविध योजनेतून आदिवासी अनुसूचित जमाती इतर प्रवर्गातील कुटुंबांना स्वयंपाक गॅसचे पुरवठा करण्यात आलेला आहे.